Home > मॅक्स ब्लॉग्ज > युद्ध आणि प्रोपोगंडा…

युद्ध आणि प्रोपोगंडा…

युद्ध आणि प्रोपोगंडा…
X

युक्रेन आणि रशिया यांच्या मध्ये सुरू असलेलं जमीनीवर कमी आणि मीडियात जास्त लढले जात आहेत का? युद्धामध्ये माध्यमांना हाताशी धरून कशा प्रकारे प्रोपोगंडा केला जातो? वाचा वैभव छाया यांचे विश्लेषण

२००१ साली ट्विन टॉवर पाडले गेले.

२००२ साली अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात घुसले.

२००३ साली अमेरिकेने निवांत चाललेल्या इराकवर हल्ला करून इराक कायमचं बेचिराख करून टाकलं. त्यात अफगाणिस्तान ही बेचिराख झालं.

या सर्वांत फॉक्स मिडीया गृपने पसरवलेल्या फेक न्यूज आणि प्रोपोगांडा जगभरातील मिडीयाने अधिक ताकदीने पसरवला होता. पहिलं दशक यातच संपलं. ओबामाला आणून संपवलं.

२०१० सालापासून जगभर इंटरनेट क्रांती सुरू झाली. २०११ साली NWOIC न्यू वर्ल्ड ऑर्डर ऑफ इन्फॉरमेशन अँड क्रायसिस या कॉन्स्पिरसी खाली इंटरनेटवर फेक प्रोपोगांडा पसरवण्याची सुरूवात झाली. झुकरबर्गवर अजून केस चालू आहे.

२०१२ साली अरब रिवोल्यूशन, स्प्रिंग रिवोल्यूश, जास्मीन रिवोल्यूशन सुरू झालं.

२०१२ पासून अमेरिकेने एक एक करत मध्य पूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील अनेक देश बेचिराख करून टाकले.

२०१२ ते २०१९ कधी किंम जोंग, कधी चीन, कधी रशियाची भीती दाखवत दाखवत कोरोनाही आला. मधल्या काळात ईबोला, सार्स, अँथ्रॅक्स बरंच काही बाही येऊन गेलं. पण कोवीड बेस्ट ठरलं. २०११ ते २०२१ चं दशक कोविड ने संपवलं.


२०२० नंतर पुतीन ने क्रायमिया (२०१४) पासून केलेली सुरूवात आता युक्रेनवर येऊन पोहोचली आहे. २०२२ मध्ये युद्ध जमीनीवर कमी मिडीयात जास्त लढलं जातंय.

आपल्याला येणाऱ्या बातम्या अँटी रशियन नरेटिव वाल्या आहेत. या युएस मिडीयाला युक्रेनचा पुळका आलेला नाही. ते सातत्याने तणावाची स्थिती आणि भीती निर्माण करू पाहतायेत. भीती इतर देशांसाठी जेणेकरून इतर देश स्वतःला अधिकाधिक शस्त्र सुसज्ज करतील.

हा प्रत्येक दशकाचा पॅटर्न आहे. हा फक्त मिडीया अँगल आहे. या स्थितीला खुप पदर आहेत. ते समजून घेणे गरजेचे आहे.

युद्ध थांबणार नाही. वाढतच राहणार. फक्त पद्धत बदलेल. पण आता उत्तर गोलार्ध कधी शांत राहणार नाही.

Updated : 2 March 2022 11:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top