Home > मॅक्स ब्लॉग्ज > भाषेआडून चीनची दादागिरी

भाषेआडून चीनची दादागिरी

फोन उचलल्यानंतर हॅलो म्हणण्याचा शिष्ठाचार जगानं मान्य केला आहे. येत्या काही काळानंतर हॅलो किंवा नी हाओ हे शब्द देखील ऐकू येतील अशी परिस्थिती हळूहळू निर्माण होत आहे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की नी हाओ या शब्दाचा अर्थ काय, हे शब्द आले कुठून इत्यादी इत्यादी. नि हाओ हा चीनी शब्द आहे. याचा अर्थ सोपा आहे. हॅलो. आता तुमच्या मनात नवीन प्रश्न निर्माण झला असेल. हा शब्द आपण का म्हणून वापरु. हॅलो चांगला आहे की. पण एखाद्या गोष्टीच्या वैश्विकीकरणाच्या प्रक्रियेत आपण कधी खेचलो जातो. हे आपल्यालाच कळत नाही. अगदी आजचं उदाहरण घ्या. आपण भारतीय भषांचा वापर किती प्रमाणात कमी केलाय. अगदी आपली मुंबईत वाढलेली पिढी देखील इंग्रजी शिवाय संभाषण करण्यास ना कबूल असते. आहो यालाच तर सांस्कृतीक जागतिकीकरण म्हणतात.

ंस्कृतीच्या जागतिकीकरणाच्या माध्यमातून जगातील पाश्चात्य देशांनी आपलं प्रभाव क्षेत्र वाढवलंय. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता चीनही आपली संस्कृती साता समुद्रापार लोकप्रिय करण्याच्या प्रयत्नातून जगावर सत्ता गाजवण्याची स्वप्न बघत आहे. बेल्ट ऍण्ड रोड प्रकल्प जाहीर करण्याच्या काही वर्षांपूर्वीच चीननं कॉन्फिक्यूस न्सटिट्यटच्या माध्यमातून आपल्या भाषेची आणि संस्कृतीची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. मुत्सद्देगिरीच्या भाषेत याला हळवी (सॉफ्ट) मुत्सद्देगिरी म्हणतात. पण चीन या माध्यतूनही आपल्या बलाचा वापर करत जगाचं मन वळवण्याच्या प्रयत्नात आहे असंच दिसतंय.

चीननं गेल्या दशकात जगभरात भाषा आणि संस्कृतीचा प्रसार करण्याच सुरुवात केली होती. मी अमेरिकेत गेलो असतांना काही अफगाणी नागरिकांच्या तोंडी नी हाओ हा शब्द ऐकला. एखाद्या मिचमिचे डोळे असणाऱ्या मुलींकडे बघून ही अफगाणी मुलं नी हाओ म्हणत होती. प्रथमत: मला हे करटे खेळतांना म्हटले जातात ते हा हू हे शब्द हे असं वाटलं होतं. मात्र काही वेळानं एका मुलीनं त्या अफगाणी मुलांकडे रागानं बघत मी चीनी नाहीय असं ठणकावून सांगितल्यावर मग मला समजलं की हा एक चीनी शब्द आहे. त्यानंतर मग पुढे मी त्याचा अर्थ शोधून जाणून घेतला. असो. मुख्य म्हणजे त्या वेळी समजलं की सेंट्रल एशियामध्ये चीनी भाषेच्या प्रसाराकरिता चीननं व्यवस्था करुन ठेवली आहे.

सेंट्रल आशियातील हे देश गरीब आहेत. पैशांच्या मोबदल्यात चीननं त्यांच्याकडून अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. सेंट्रल आशियातील ताजिकीस्तान या देशाचा तर काही भाग देखील चीननं हडप केला आहे. याच ताजिकीस्तानमध्ये चीननं सुमारे दहा वर्षा पूर्वी चीनी भाषेचा प्रसार सुरु केला. ताजिक फिक्सर निर्माण करणे हा त्या मागील मुख्य उद्देश होता. ताजिक जनता देखील आपल्याला दुभाषा किंवा फिक्सर म्हणून काम करन दोन पैसे जास्त कमावता येतील म्हणून चीनी भाषा शिकू लागले. चीनी भाषा शिकण्यास लोक पुढे येत आहेत हेच चीनकरिता विजयाच चिन्ह होतं. चीन अशाच पद्धतीनं ताजिकीस्तानचा आणखी काही भूभाग लाटण्याच्या प्रयत्नात आहे, असं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचं मत आहे. टांझानियामध्ये देखील चीननं अशाच प्रकारे आपली संस्कृती पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय.

संस्कृती आणि भाषेचा प्रसार करतांना अंगिकारलेल्या कठोर हुकुमशाही पद्धतीमुळे चीनचा नक्की काय मानस आहे. या विषयी शंका निर्माण होते. काही अभ्यासकांनी पाश्चात्य देश आणि चीन यांच्यामधील वैचारिक मतभेदांमुळे पाश्चात्य देशच चीनच्या संस्कृती प्रसाराला कलुषित करत असल्याची टीकाही केलीय. चीन निर्मळ मनानं आपल्या संस्कृतीचा प्रसार करत असता तर त्यानं सेट्रल आशियातील गरीब राष्ट्रांचा भूभाग हडपला नसता.

चीनी भषेचा प्रसार करण्याकरिता चीननं जगातील अनेक विद्यापिठांना आर्थिक मदत देत वर्ग सुरु केलेत. त्याच बरोबर चीननं शिक्षकांच्या नेमणुकाही केल्या. काही देशांमध्ये माध्यमिक शांळांमध्ये देखील चीनी भाषा शिकवली जाते. ही भषा शिकतांना मात्र चीनी शिस्त अंगी बाळगण्याची गरज आहे. चर्चा, वादविवाद या गोष्टींना बिलकूल महत्त्व नाहीय. शिक्षक सांगेल ते प्रमाण मानून ही भाषा शिकायची असते. यामुळे चीनी समाज व्यवस्थेतील हुकुमशाहीचा अनुभव विद्यार्थ्याला चीनी भाषा शिकतांना येतो. तसंच ही भाषा शिकतांना टी या अक्षरानं सुरु होणारे तीन शब्द वर्जित आहेत हे भानही राखण्याची आश्यकता आहे. ते तीन शब्द आहेत. तायवान, तिबेट आणि तियानानमाईन. या विषयावरील कुठलाही प्रश्न विद्यार्थ्यानं विचारल्यास तो गुन्हा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही वर्षापूर्वी पर्तुगलमध्ये एक्षणिक चर्चासत्रचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रथे प्रमाणे चर्चा सत्राच्या योजकांनी प्रायोजकांची माहिती आपल्या कार्यक्रम पुस्तिकेत छापली होती. यामध्ये तैवानी शैक्षणिक संस्थेची माहिती असल्यानं कॉनफिक्यूस न्सटिट्यूटनं धमकावून त्या तैवानी शैक्षणिक संस्थेचं नाव कार्यक्रम पुस्तकातून काढून टाकण्यास भाग पाडलं. या प्रसाराला सौम्य मुत्सद्देगिरी म्हणणार का? भाषेच्या प्रसाराच्या आडून चीन आपली राजकीय विचारसरणी जगाच्या गळी उतरवू बघत आहे. भूतकाळात मानवाधिकारांचं केलेलं उल्लंघन पुसण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत बळकावलेल्या भूभागवरही चीनचा औरस भाग असल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाषा प्रसाराच्या माध्यमातून चीनच्या या प्रयत्नांमुळे आपले प्रभाव क्षेत्र वाचवण्याचे प्रयत्न अमेरिका, चीन आणि भारतानं सुरु केले आहेत. भाषा आणि संस्कृतीच्या आडून चीन संपूर्ण जग लाल रंगानं रंगवण्याचे स्वप्न बघत आहे. जगातील जवळपास सर्वच भागात त्यांनी या लाल रंगाच्या शैक्षणिक संस्था सुरु केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी बी.बी.सीनं या संस्थेच्या प्रमुखाची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीच्या माध्यमातून बी.बी.सीनं चीनचा खोटारडडेपणा बाहेर आणला. मात्र या सर्व टीकांवर चीनचं सदैव एकच उत्तर असतं. आम्ही चीनी संस्कृती आणि भाषेचा प्रसार करत आहोत. राजकारणाचा या संस्थेशी काही संबंध नाही. सौम्य मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच वसाहतवादानं आपलं स्थान निर्माण केलं होतं. याचाच आधार घेऊन वसाहतवाद संपुष्टात आणणारा हा मानव समाज पुन्हा चीनी वसाहत वाद आणि गुलामगिरीमध्ये आडकणार काय अशी शंका वाटते. सुमारे दशकभरापूर्वी सुरु झालेला हा बुद्धीबळाचा डाव आणखी किती काळ रंगणार की याला नवं वळण लागणार हे आता पहावं लागेल.

कौस्तुभ कुलकर्णी

Updated : 2 Jun 2017 4:52 PM GMT
Next Story
Share it
Top