News Update
Home > गोष्ट पैशांची > शेअर मार्केट म्हणजे काय?

शेअर मार्केट म्हणजे काय?

शेअर मार्केट म्हणजे काय?
X

आज आपण चर्चा करणार आहोत सगळ्याच्या आवडीच्या आणि उत्सुकतेच्या विषयावर ते म्हणजे शेअर / शेअर मार्केट या विषयावर

वर्तमान पत्र, रेडिओ, टीव्ही या माध्यमातून तुम्ही बहुतेकदा सेन्सेक्स ५०० अंशाने कोसळला किंवा मार्केट हाय पॉईंटला. अशा बातम्या तुम्ही पाहिल्या असणार. तसं पाहायला गेलं तर शेअर मार्केट हा तसा सगळ्याचा परिचयचा विषय. पण, प्रत्यक्षात गुंतवणूक करणारे खूप कमी आहेत. त्याचे कारणे वेगवेगळी असू शकतात. शेअर मार्केट याच विषयावर आपण या आणि पुढच्या आठवड्यात चर्चा करणार आहोत.

जेव्हा आपण एकद्या कंपनीचा शेअर विकत घेतो तेव्हा त्या कंपनीच्या मालकी मध्ये आपण हिस्सा घेतो. शेअर्सचे दोन प्रकार असतात

१) सामान्य शेअर्स (common shares)

२) प्राधान्य शेअर्स (preferential shares)

सामान्य शेअर्स जेव्हा आपण विकत घेतो त्यावेळी त्याच्यामाध्यमातून आपल्याला लाभांश आणि भांडवल वृद्धी या द्वारे परतावा मिळतो. प्राधान्य शेअर्स जेव्हा घेतो तेव्हा आपल्या ठराविक असा लाभांश कंपनीतर्फे दरवर्षी दिला जातो. प्राधान्य शेअर्स आपल्याला भांडवल वृद्धी देत नाहीत. सामान्य शेअर्सला वोटिंगचा अधिकार असतो आणि प्राधान्य शेअर्सला वोटिंगचा अधिकार नसतो .

मार्केट हे दोन प्रकारचे आहे

१) प्रायमरी मार्केट

२) सेकंडरी मार्केट

प्रायमरी मार्केट : प्रायमरी मार्केट म्हणजे जेव्हा कोणतीही नवीन कंपनी बाजारामध्ये नव्याने शेअर्स विक्रीला आणते ते व्यवहार. उदा IPO. (Initial Public Offering)

डी मार्टच्या IPO बद्दल तुम्ही तर तुम्हाला माहिती असेलच. हा IPO तर गुंतवणूकदारला लागलेली लॉटरीच म्हणावी लागेल. अवघ्या १५ दिवसा नंतर १०० % परतावा डी मार्टने दिला आहे.

सेकंडरी मार्केट : या मार्केटमध्ये आधीपासून बाजारात लिस्टेट असलेल्या शेअर्सची खरेदी-विक्री होते. हे व्यवहार दोन गुंतवणूकदारांमध्ये होतात.

मार्केटमधून आपण सामान्य शेअर्स घेताना आपण पुढील दोन पध्दतीनी अभ्यास करू शकतो.

१) मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis)

२) टेक्निकल विश्लेषण (Technical Analysis)

मूलभूत विश्लेषण : ही पद्धत कंपनीच्या मूलभूत मूल्याची आणि भविष्यातील वाढीची संभाव्यता निश्चित करण्यासाठी उत्पन्न, कमाई, भविष्यातील वाढ, इक्विटीवरील परतावा, प्रॉफीट मार्जिन आणि इतर डेटाचा वापर करते. शेअर्सच्या दृष्टीने मूलभूत विश्लेषणाचे मूल्यमापन करताना कंपनीच्या आर्थिक विधानावर लक्ष केंद्रीत केले जाते.

टेक्निकल विश्लेषण: टेक्निकल विश्लेषण किंमती आणि व्हॉल्यूम परिवर्तनांवर आधारीत, जसे की सापेक्ष शक्ती निर्देशांक, चलन सरासरी, रिग्रेशन, इंटर-मार्केट आणि इंट्रा बाजार किंमत सहसंबंध, व्यवसाय चक्र, स्टॉक मार्केट सायकल्स चार्ट द्वारे केले जाते.

मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis), टेक्निकल विश्लेषण (Technical Analysis) चा सखोल अभ्यास पुढच्या सदरा मध्ये करूया.

कमलेश भगत

(लेखक गुंतवणूक सल्लागार म्हणून हाईपॉइंट सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत आहे )

Updated : 2 Jun 2017 9:49 AM GMT
Next Story
Share it
Top