Home > हेल्थ > राज्याचे आरोग्य खातं डबघाईला!

राज्याचे आरोग्य खातं डबघाईला!

राज्याचे आरोग्य खातं डबघाईला!
X

जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करणाऱ्या फडणवीस सरकारकडे औषधांचा पुरवठा नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपजिल्हा रुग्णालयात मागील ६ महिन्यापासून औषध पुरवठा बंद झाला असल्यानं डॉक्टर आपल्या जबाबदारीवर खाजगी केमिस्टमधून उधारीने औषध खरेदी करत आहे. यामुळे खाजगी औषधांचे बिल 2 लाख रुपयांच्यावर आहेत. राज्य स्तरावर औषधी खरेदी झाली नसल्यामुळे हा त्रास होत असल्याचं कारण डॉक्टर देत असल्यानं जाहिरातीवर करोडो रूपये खर्च करणाऱ्या सरकारला सामान्य लोकांच्या औषधांचा खर्च परवडणारा नाही का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थितीत होत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

भंडारा जिल्हातील तुमसर उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे असून या रूग्णालयात तालुक्यातील शिवाय मध्यप्रदेश राज्य लागून असल्यामुळे या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्ण येत असतात. मात्र या रुग्णालयात मागील ६ महिन्यापासून औषधी पुरवठा होत नसल्यानं रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या जबाबदारीवर बाहेरील केमिस्टमधून औषध खरेदी करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत २ लाख रुपयांची औषध उधार खरेदी करण्यात आली आहे.

रुग्णालयात औषधांचा पुरवठा होत नसल्यानं काही रुग्णांना बाहेरील केमिस्टमधून स्वस्त दरात औषध खरेदी करावे लागते परंतु अनेक गरीब रुग्णांकडे औषधांसाठी पैसे नसल्यामुळे औषध खरेदी करु शकत नाही. अशा रुग्णांना रुग्णालयातील डॉक्टर उधारीवर औषध घेत आहे. काही वेळा अनेक रुग्णांना आल्या पाऊली परत जावे लागत आहे. अतिशय गांभीर्याची बाब आहे की जाहिरांवर करोडे रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे औषधांचा पुरवठा करण्यासाठी पैसा नाही. राज्यातील आरोग्य विभाग धूळ खात असून जनतेच्या जीवाशी खेळ खेळण्याचे काम हे सरकार करत असल्याची टीका रुग्णांकडून होत आहे.

काय म्हटले रुग्णालयातील अधिक्षक?

या विषयी रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता, कल्पना म्हैसकर यांनी वरिष्ठांकडे या बाबतीत तक्रार केली असता राज्य स्तरावर औषधांची खरेदीच झाली नसल्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून औषधांचा पुरवठा बंद असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, एकीकडे सरकार सर्व सामान्य जनतेच्या सोबत असल्याची बतावणी करत रुग्णांसाठी 'आयुष्यभारत योजने'चा देशभरात मोठा बोलबाला करत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रसारख्या प्रगत राज्याकडे रुग्णांसाठी औषधांवर खर्च करण्यासाठीच राज्य सरकारकडे पैसे नाहीत. राज्याचे आरोग्य खातं धोक्यात आले आहे का? की सरकार लोकांच्या जीवावर उठले आहेत का? असे अनेक प्रश्न याठिकाणी उपस्थितीत होत आहेत.

Updated : 9 Feb 2018 1:28 PM GMT
Next Story
Share it
Top