Home > हेल्थ > Omicron : महाराष्ट्रात तिसरी लाट निश्चित? निर्बंधांबाबत आज निर्णय

Omicron : महाराष्ट्रात तिसरी लाट निश्चित? निर्बंधांबाबत आज निर्णय

Omicron  :  महाराष्ट्रात तिसरी लाट निश्चित? निर्बंधांबाबत आज निर्णय
X

Omicron व्हेरिएंटचा देशात प्रसार वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांनी निर्बंध लागू करण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातही Omicronच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार निर्बंधांबाबत शुक्रवारी निर्णय जाहीर कऱण्याची शक्यता आहे, तशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली, तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक झाली. या बैठकीत कोरोना आणि निर्बंधांबाबत काय चर्चा झाली याची माहिती नवाब मलिक यांनी दिली, ते विधिमंडळ अधिवेशनाला जाण्याआधी पत्रकारांशी बोलत होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती मलिक यांनी दिली. राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे मलिक यांनी सांगितले. पण कोरोनाची तिसरी लाट जानेवारीमध्ये येऊ शकते, असे वक्तव्य देखील त्यांनी केले.

राज्यात कोरोनाच्या दोन लाटा राज्य सरकारने चांगल्या पद्धतीने हाताळल्या आहेत. Omicronचा धोका असताना आता आणखी एक नवीन व्हेरिएन्टचा धोका आहे, त्यामुळे राजकारण न करता, लोकांचा जीव वाचवण्यासाठी राज्य सरकार निर्बंधांबाबत निर्णय घेईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले आहे. पण भाजपला यामागे राजकारण दिसत असेल तर सरकारला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असे उत्तर देखील त्यांनी दिले. दरम्यान शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री कोविड टास्क फोर्सशी चर्चा केली, तसेच राज्यात कोणत्या स्वरुपात निर्बंध लावले जाऊ शकतात यावर चर्चा झाल्याचे समजते आहे. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या कार्यक्रमांवरही निर्बंध येण्याची शक्यता आहे.

Updated : 24 Dec 2021 7:47 AM GMT
Next Story
Share it
Top