Home > हेल्थ > आरोग्य क्षेत्राला बुस्टर डोस, केंद्राकडून 23 हजार कोटींच्या मदतीची घोषणा

आरोग्य क्षेत्राला बुस्टर डोस, केंद्राकडून 23 हजार कोटींच्या मदतीची घोषणा

आरोग्य क्षेत्राला बुस्टर डोस, केंद्राकडून 23 हजार कोटींच्या मदतीची घोषणा
X

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीमधून अखेर केंद्र सरकारने धडा घेतल्याचे सिद्ध झाले आहे. उशिका का होईना पण केंद्र सरकारने आता आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी २३ हजार १२३ कोटींच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या पहिल्याच बैठकीत अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याने लहान मुलांसाठीच्या पायभूत आरोग्य सुविधा, ICU बेड, ऑक्सिजन बेड, औषधांची उपलब्धता यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

देशातील ७३६ जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार.

सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये २ लाख ४४ हजार जाजदा खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. २० हजार अतिरिक्त ICU बेड्सची सोयदेखील केली जाणार आहे. विशेष म्हणजे यामधील २० टक्के बेड हान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यासह जिल्हा स्तरावर अतिरिक्त औषध साठा, जादा अँब्युलन्स यांचीदेखील सोय केली जाणार आहे.

या अंतर्गत केंद्र सरकारकडून १५ हजार कोटी आणि राज्यांकडून ८,१२३ कोटींची तरतूद केली जाणार आहे. येत्या ९ महिन्यांमध्ये आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सोयीसुविधा भक्कम केल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. मांडवीय यांनी आरोग्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच या पहिल्या मोठ्या निर्णयाची घोषणा केली.

Updated : 9 July 2021 12:59 AM GMT
Next Story
Share it
Top