Home > हेल्थ > मास्कचा घटता वापर धोकादायक, टास्क फोर्सच्या अध्यक्षांचा गंभीर इशारा

मास्कचा घटता वापर धोकादायक, टास्क फोर्सच्या अध्यक्षांचा गंभीर इशारा

मास्कचा घटता वापर धोकादायक, टास्क फोर्सच्या अध्यक्षांचा गंभीर इशारा
X

देशात एकीकडे Omicronचे रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे लोकांमध्ये मास्कचा वापर करण्याबाबत गांभिर्य कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर निती आयोगाचे आरोग्य विषयक सदस्य डॉ. व्हीके. पॉल यांनी गंभीर इशारा दिला आहे. लसीकरण आणि मास्क हे दोन्ही कोरोना विरोधात लढण्यासाठी महत्त्वाचे आहे. सध्या आपण एका अत्यंत धोकादायक परिस्थितीमधून जात आहोत, त्यामुळे कोणताही निष्काळजीपणा करुन चालणार नाही. जगातील सध्याच्या परिस्थितीवरुन आपण धडा घेतला पाहिजे, असा इशारा पॉल यांनी दिला आहे.

दरम्यान दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी निर्बंधाबाबत माहिती दिली आहे. देशातील आणि जगभरातील कोरोना परिस्थितीवर टास्क फोर्स लक्ष ठेवून आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्क्यांच्यावर कोरोना संसर्गाचे प्रमाण असेल तिथे निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने देखील वारंवार मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने देखील मास्कचा आवश्यक असून मास्क न वापरणाऱ्यांना दंड केला जाईल असा इशारा दिला आहे. पण लोक अजूनही मास्कच्या वापराबाबत गांभिर्याने विचार करत नसल्याचे दिसते आहे.

Updated : 10 Dec 2021 3:22 PM GMT
Next Story
Share it
Top