Home > हेल्थ > ...तर बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसणार :वैद्यकीय अधिकारी संघटना

...तर बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसणार :वैद्यकीय अधिकारी संघटना

राज्‍यातील १८ वैदयकिय महाविदयालय व रूग्‍णालयातील वैदयकिय अधिकारी हे कोरोनाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करत आहेत.कोरोना वॉरियर्स म्‍हणून त्‍यांना गौरविण्यातही येऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या कडे वर्षानुवर्षे राज्यशासनाने दुर्लक्ष केल्याने नाईलाजास्तव आज काम बंद आंदोलन केले, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बेमुदत आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे.

...तर बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसणार :वैद्यकीय अधिकारी संघटना
X

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे आज पर्यंत कधीही वैद्यकीय अधिकारी पदाची भरती प्रक्रिया झालेली नाही. त्या पदांवर आजपर्यंत वर्षानुवर्षे १२० दिवसांच्या तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी आहेत, असे वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे मुंबई प्रतिनिधी डॉ.रेवत कानिंदे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना दिले.

अपघात विभाग,पोस्ट मॉर्टेम,मेडिको लीगल केसेस,कोर्ट केसेस,ब्लड बँक,महात्मा जोतीराव फुले जण आरोग्य योजना, जणांनी शिशु सुरक्षा योजना, नैसर्गिक आपत्ती दरम्यानचे नियोजन अश्या अतिमहत्वाच्या ठिकाणी हे वैद्यकीय अधिकारी काम करत असतात.

राज्‍यातील १८ वैदयकिय महाविदयालय व रूग्‍णालयातील वैदयकिय अधिकारी हे कोरोनाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करत आहेत.कोरोना वॉरियर्स म्‍हणून त्‍यांना गौरविण्यातही आले.मात्र त्‍यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या तशाच प्रलंबित ठेवण्यात आल्‍या राज्य शासनाकडून नेहमीच या कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करू अशे पोकळ आश्वासन देण्यात आले.

सद्य परिस्थितीतल्या कोव्हिडच्या महामारी मध्ये सुद्धा हे वैद्यकीय अधिकारी फ्रंटलाईन वर एक दिवसही सुट्टी न घेता काम करत आहेत.रुग्णाचे स्वँब कलेक्शन पासून ते कोव्हिड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या शवाची योग्य ती विल्हेवाट लावण्याच्या नियोजना पर्यंतचे अति महत्वाचे काम करून सुद्धा पर्मनंट तर करणे नाहीच पण त्यांना सातव्या वेतन आयोगा पासून दूर ठेवण्यात आले आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवे मध्ये नियमित करून त्यांना सातवा वेतन आयोग लावावा अशी माफक आणि रास्त मागणी वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने मागणी केलेली आहे. या मागणीसाठी शासकीय वैदयकिय महाविदयालय व रूग्‍णालयातील वैदयकिय अधिकारी यांनी १ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत काळया फिती लावून काम सुरू केले आहे.

त्याचीही दखल शासनाने न घेतल्यामुळे आज दि. ११ जानेवारी सकाळी ८.०० ते १२ जानेवारी सकाळी ०८.०० वाजे पर्यंत एक दिवस काम बंद आंदोलन करत आहेत.त्यांच्या प्रलंबित मागण्याची तात्काळ पूर्तता व्हावी ही त्यांची मागणी आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.Updated : 11 Jan 2021 12:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top