Home > हेल्थ > दातांची निगा कशी राखावी?

दातांची निगा कशी राखावी?

दातांची निगा कशी राखावी?
X

तोंडाला येणारी दुर्गंधी ही एक लाजिरवाणी आरोग्य-समस्या आहे. पान-तंबाखु-गुटखा खाणाऱ्या , धूम्रपान करणा-या माणसांबद्दल बोलत नसून सर्वसाधारण निर्व्यसनी लोकांबद्दल बोलत आहे व प्रमुख म्हणजे टूथपेस्ट नाही तर दात स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे . आम्ही नियमितपणे दात घासतो, म्हणजे आमचे मौखिक-आरोग्य उत्तम आहे”, अशाच गैरसमजामध्ये लोक असतात.एवढ्या मोठ्या संख्येच्या देशामधील लोक आपल्या तोंडाच्या आरोग्याबद्दल निष्काळजी असतील तर त्याचा फायदा उठवायला व्यापारी पुढे सरसावणार हे खरं आहे. ह्यासाठी हे करणं मुळात आपले पूर्वज खैर, करंज, वड, उंबर, पिंपळ, कडूनिंब, बाभूळ, वगैरे झाडाची लहानशी काडी घेऊन ती चावूनचावून अधिक मृदु करुन त्याने आपले दात व हिरड्या साफ करायचे. कडू-तिखट-तुरट चवीच्या त्या वनस्पतींची वास्तवात आजच्या स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या आजच्या समाजाला अधिक गरज आहे.रात्री झोपताना त्रिफळाच्या काढ्याने गुळण्या करा. सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे आठवड्यातून निदान एकदा कडुनिंबाची काडी चघळण्याची सवय लावा. इतकं केलंत तरी तुमचे दात आणि मौखिक आरोग्य तर सुधारेलच.

Updated : 17 Oct 2018 11:07 AM GMT
Next Story
Share it
Top