- नेदरलँड्समधे रंगला मिलान समर फेस्टिव्हल
- शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागाच्या आरोपावर सत्तार यांचे उत्तर
- बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले झाड पडले...
- सुप्रीम कोर्टाकडून कोणतीही आशा नाही- कपील सिब्बल
- भंडारा बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
- #Muskanbulletin : महागाईने सामान्यांचा संताप, विस्तार रखडल्याने शिंदे सरकार अडचणीत
- मंत्र्यांचे सर्वाधिकार सचिवांना?, अखेर सरकारचे स्पष्टीकरण
- महागाई आणि दडपशाही सहन करणार नाही – यशोमती ठाकूर
- शपथपत्र का गरजेचे आहे, उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण..
- Priyanka Gandhi सिलेंडर घेऊन उतरल्या रस्त्यावर

राज्यातील ४ जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्हीटी दर जास्त, लसीकरण वाढवण्याच्या सूचना
X
मुंबई : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर जास्त आहे. या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, तसेच यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चारही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त प्रमाणात आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला जात आहे. या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
तिसऱी लाट कशी थोपवणार?
जागतिक स्तरावर ज्या देशांमध्ये लसीकरण जास्त झाले तेथे तिसरी लाट आली तरी तिचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत असून लस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात असल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे.
झिका व्हायरसमुळे घाबरु नका
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये झिकाचा एक रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून तीन सदस्यांचे पथक पाहणीसाठी राज्यात आले आहे. या भागात डास उत्पतीचे ठिकाणे नष्ट करण्यावर भर देण्यात येत असून लक्षणानुसार उपचार केले जात आहे. या आजाराचे संक्रमण झाले नसून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत उपाययोजना केल्या जात आहे. झिका वायरसमुळे घाबरुन जाऊ नये असेही आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.