Home > हेल्थ > कोरोना अजून संपुष्टात आलेला नाही; सर्व नियमांचे पालन करा - राजेश टोपे

कोरोना अजून संपुष्टात आलेला नाही; सर्व नियमांचे पालन करा - राजेश टोपे

महाराष्ट्रातील आता टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरू करण्यात येत असल्या तरी कोरोना अजून संपुष्टात आलेला नाही. आजही महाराष्ट्रात ४० हजार रुग्ण अॅक्टिव्ह असून प्रत्येक जिल्ह्यात १० ते १५ रुग्ण मिळत आहेत त्यामुळे त्यामुळे सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

कोरोना अजून संपुष्टात आलेला नाही; सर्व नियमांचे पालन करा - राजेश टोपे
X

महाराष्ट्रातील आता टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरू करण्यात येत आहेत. 6 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 1 फेब्रुवारी पासून रेल्वे, मुंबईची जीवनवाहिनी 'मुंबई लोकल' देखील सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पण कोरोना संपुष्टात आला आहे असं नाही महाराष्ट्रात ४० हजार रुग्ण अॅक्टिव्ह असून प्रत्येक जिल्ह्यात १० ते १५ रुग्ण मिळत असून कोरोना रुग्णांचा आकडा शून्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना अजून सगळा संपला नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाळण्यातील एक कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

कोरोना असताना आपण कस वागायचं, कोणत्या गोष्टींची काळजी घायची या सगळ्या सवयी आपण स्वत:ला लावून घेतल्या पाहिजे. तरच आपण कोरोनाला आटोक्यात आणू शकू. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन टोपे यांनी यावेळी केले.

Updated : 31 Jan 2021 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top