Home > हेल्थ > हा घ्या राज्याच्या आजारी आरोग्य व्यवस्थेचा पुरावा !

हा घ्या राज्याच्या आजारी आरोग्य व्यवस्थेचा पुरावा !

कोरोना संकटाने आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा उघड केल्या आहेत. आता काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनीच आरोग्य व्यवस्थेचे वास्तव आरोग्य मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून समोर आले आहे.

हा घ्या राज्याच्या आजारी आरोग्य व्यवस्थेचा पुरावा !
X

कोरोना संकटाने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पण आता आरोग्य व्यवस्थेची काय अवस्था झाली आहे याची माहिती काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी स्वत: आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून दिली आहे.

श्री राजेश टोपे जी,
आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई,

दि.02/04/2021

विषय : कोरोना वायरस ट्रीटमेंट संबंधात मला आलेला वाईट अनुभव, सुधारणा करण्यासाठी आपल्या बरोबर शेअर करीत आहे

मी मा. खा. हुसेन दलवाई, आणि माझी पत्नी शमा दलवाई, दोघे ही कोरोना वायरसने आजारी आहोत. ट्रीटमेंट घेऊन आम्ही घरी आलो आहोत. माझे दोन्ही ड्रायवर 1) नेत्रराम निषाद वय 37, कोरोना वायरस ने आजारी BKC सेंटर मध्ये दाखल बेड नंबर C 27.2) संतोष यादव, बेड क्र C 21 BKC कोरोना वायरस ने आजारी.

या दोघांना पॉझिटिव्ह आल्या नंतर होम कोरंटाईन केल होत डॉ च्या सल्ल्याने. एक आठवड्या नंतर त्यांना त्रास होऊ लागला म्हणून H/East वॉर्ड मधील वॉर रूम मध्ये संपर्क करून त्यांना हॉस्पिटल किव्हा सेंटर मध्ये शिफ्ट करण्यासाठी विनंती केली.

त्या विनंतीनंतर 3 तासांनी एम्ब्युलन्स आली त्यांना BKC कोविड सेंटर मध्ये सोडण्यासाठी. त्याना तिथे 3 तास ताटकळत उभे ठेवण्या आले. तक्रार केल्यानंतर त्यांना सेंटरमध्ये प्रवेश दिला आणि खुर्चीवर बसवून ठेवले 3 तास त्यानंतर त्यांना बेड देण्यात आला.

हे सगळं करण्यासाठी, ,मी स्वतः संबंधित विभागात पाठपुरावा करीत होतो.आणि प्रमुख अधिकाऱ्यांन सोबत बोलत होतो आणि माझ्या ऑफिस मधून प्रत्येकाला डिटेल्स पाठवले जातं होते. आज दुपारपासून नेत्रराम निषाद वय 37, बेड नंबर C 27 असून त्याला स्वास घेण्यासाठी त्रास होत आहे आणि सुका खोकला देखील आहे. त्याला तिथे ड्युटीवर असलेल्या नर्स सांगतात की आम्हाला इन्स्ट्रक्शन नाही आम्ही औषधं देऊ शकत नाहीं.

BKC सेंटर तर A /c देखील नाहीं, एप्रिलचा महिना सुरु आहे कडक उन्हाळा असल्यामुळे गर्मी खूप वाढली आहे. त्या सेंटरमध्ये दुपारी पेशंट हैराण होतात उकाड्याने. आपण पगार कमी करायचा GR काढला आहे त्यामुळे देखील खूप नाराजी आहे. डॉ, नर्स, वॉर्ड बॉय यांचा डायरेक्ट कोविड सेंटरमध्ये पेशंट बरोबर डायरेक्ट संबंध येतो. त्यांचा जीव धोक्यात घालून काम करतात आणि आपण त्यांना नक्की केलेल्या मानधनात कपात करून त्यांना नाराज करतोय.

अशामुळे आपल्याला डॉ, नर्स, वॉर्ड बॉय मिळणार नाहीत आणि पेशंट वाढत आहेत आपण कशी सर्व्हिस देऊ शकतो पेशंटना त्याचा विचार व्हावा. BKC सेंटर मधील तसेच H/East वार्ड मधील आलेला अनुभव शेअर केला यावरून सर्व सामान्य माणसाची किती सासेहोलपट होत असेल याचा विचार करणे कठीण आहे. कोरोना वायरसच्या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी पैशाची काटकसर करून हा प्रसंग निभावून नेता येणार नाहो. ही मी स्वतः अनुभवलेली शहरातील परिस्थिती आहे मग ग्रामीण भागातील कोविड सेंटरची आणि हॉस्पिटल ची परिस्तिथी काय असेल याचा विचार करूनच भीती वाटते.

आपले
मा. खा.हुसैन दलवाई
बांद्रा पूर्व, मुंबई






Updated : 2 April 2021 2:40 PM GMT
Next Story
Share it
Top