Home > हेल्थ > कोलोरेक्टल (ColoRectal) कॅन्सर 

कोलोरेक्टल (ColoRectal) कॅन्सर 

कोलोरेक्टल (ColoRectal) कॅन्सर 
X

मोठी आतडी इलिओसिकल जंक्शन ते गुदद्वारपर्यंत साधारणपणे १.५ मीटर इतकी लांब असून तिचे खालील प्रमाणे भाग असतात सिंकम,असेंडिंग कोलोन, ट्रान्सवर्स कोलोन, दिसेन्डीग कोलोन, सिग्म्मोईड कोलोन, रेक्टम, अनल कॅनल. या सर्वांना मिजो कोलोन पोटाशी बांधून ठेवतो. मोठी आतडीचे मुख्य काम लहान आतडीकडून आलेले अन्न साठवून शरीराबाहेर काढणे तसेच जीवन आवश्यक पाणी व जीवनसत्व शरीरात शोषुन घेणे हे होय.

कोलोरेक्टल (ColoRectal) कॅन्सर

जगामध्ये दर वर्षी 13 लाखापेक्षा अधिक लोक या रोगाने पीडित होत असून ७ लाख पेक्षा जास्त लोक मृत पावतात. भारतामध्ये ७० हजारापेक्षा जास्त लोक दर वर्षी या रोगाने पीडित होतात. आपल्या कडील खाण्यापिण्याच्या सवईमुळे भारतीय लोकामध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण कमी आहे परंतु एरवी पन्नाशी नंतर उदभवणारा रोग आपल्याकडे पन्नाशी पूर्वीच उदभवण्याचे प्रमाण वाढत आहे आणि असा रोग अग्रेसिव्ह असून तो शरीरात इतरत्र झपाट्याने पसरतो त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. भारतात सर्वात जास्त रुग्ण तिरुअनन्थपूरम् मध्ये आहेत. त्या खालोखाल बेंगलुरू आणि मुंबईमध्ये आढळतात.

कोलोरेक्टल कॅन्सर मध्ये अडीनो कार्सिनोमा (adenocarinoma) पाथोलोजी असते. शास्त्रज्ञांनी कॅन्सर बनण्याची गुंतागुंतीची जनुकीय प्रक्रिया उलगडली असून क्रोमोजोम इन्स्टाबिलीटी (CIN), मैक्रोसाटेलाइट इन्स्टाबिलीटी (MSI) व CIMP पाथवे असे तीन प्रमुख मार्ग शोधून काढले आहेत.

कोलोरेक्टल कॅन्सर होण्याची काय कारणे आहेत ?

साधारणपणे कोलोरेक्टल कॅन्सर प्रगत देशांमध्ये आढळतो याचे मुख्य करणे म्हणंजे प्रोसेस केलेले अन्न, चरबी युक्त मास व nitrate असणारे अन्न पदार्थ खाण्याच्या सवई, व्यायाम न करणे, लट्ठपणा, मद्यपान, आणि स्मोकिंग इत्यादी कारणे आहेत.

अनुवंशिक

साधारणपणे ५ते १०टक्के कोलोरेक्टल कॅन्सर हा अनुवंशिक असू शकतो. एफ.ए.पी. (FAP) सिन्ड्रोम, तर्कोट सिन्ड्रोम, लिंच सिन्ड्रोम (HNPCC) अशा रोगामध्ये हा कॅन्सर आढळतो.

अनुवंशिकतेसाठी कुणी तपासण्या कराव्या?

१. तीन किंवा जास्त परिवारातील व्यक्तींना कोलोरेक्टल कॅन्सर असल्यास.

२. दोन पिढ्यांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर असल्यास.

३. वयाच्या ५० वर्षापूर्वी कोलोरेक्टल कॅन्सर असल्यास.

(परिवारात वडील, चुलते, भाऊ, आई,मावशी, बहीण यापैकी कोणाला कॅन्सर असल्यास किंवा वयाच्या ५० वर्षापूर्वी कोलोरेक्टल कॅन्सर झाल्यास अनुवंशिकतेसाठी तपासण्या अवश्य कराव्या.)

कोलोरेक्टल कॅन्सर स्क्रिनिंग तपासण्या - २१ वर्ष किंवा अधिक वय असल्यास दर वर्षी स्टूल occult blood test, ५वर्षांनी sigmoidoscopy, १० वर्षांनी colonoscopy.

कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-

१. पोटात दुखणे

२. जुलाब होणे/पोट साफ न होणे.

३. वजन कमी होणे.

४. रक्त जाणे.

५. उलटी होणे.

६. भूक न लागणे.

७. हेमोग्लोबिन कमी होणे.

८. अशक्तपणा येणे.

तपासणी:- रक्त तपासणी, CEA, छातीचा एक्सरे, सी. टी. स्कॅन करावा. खरोखरीच कॅन्सर आहे की नाही व तो किती पसरलेला आहे हे पाहण्यासाठी कोलोनोस्कोपी करून तुकडा काढावा.

कोलोन कॅन्सरचे उपचार कसे करावे?

कोलोन मधील सिंकम, असेंडिंग कोलोन, ट्रान्सवरसिंग कोलोन, दिसेन्डीग कोलोन, सिग्म्मोईड कोलोन इत्यादी उपप्रकारचे उपचार सारखे असल्या कारणाने इथे एकत्रित दिले आहेत.

कोलोन कॅन्सरचा रोग तिसऱ्या टप्प्यापर्यंत असल्यास सर्व रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून कोलोनच्या ज्या भागाला मुख्या रोग आहे तो भाग तसेच बाजूच्या लिम्प नोडच्या गाठी काढणे गरजेचे असते. काढलेला रोग पाथोलोजी कडे पाठवून त्या रिपोर्ट नुसार रुग्णाला पुढे किमोथेरपी उपचारांची गरज आहे की नाही ते ठरवले जाते. काही वेळा रोगाची मात्रा जास्त असल्यास किमोथेरपी उपचार करून मग शस्त्रक्रिया केली जाते.

केमोथेरपीचे उपचार तिसऱ्या आणि पुढील टप्प्यात असणाऱ्या रोगसाठी वापरले जातात. केमोथेरपीचे उपचार दर दोन आठवड्याने दिले जातात. शस्त्रक्रियेचे टाके भरून येण्यासाठी किमान तीन ते चार आठवड्यांचा अवधी देवून जखम भरल्यास किमोथेरेपीचे उपचार सुरु करावे. किमोथेरपी जलद गतीने वाढणाऱ्या कॅन्सर पेशी तसेच रक्त पेशी, केस, अन्न नालीकेच्या पेशीना देखील अटकाव करते त्यामुळे रोग बरा होण्या बरोबर काही दुष्परिणाम देखील होतात. किमोथेरपीचे उपचार चालू असताना मळमळ होणे, उल्टी होणे, तोंडाला छाले येणे, भूक न लागणे, जुलाब होणे, केस जाणे, रक्त कमी होणे, इन्फेक्शन होणे, इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात

'रेक्टम कॅन्सर'चे उपचार

रेक्टम कॅन्सर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात असल्यास शक्य असल्यास सर्व रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून मुख्या रोग तसेच बाजूच्या गाठी काढणे गरजेचे असते. काढलेला रोग पॅथोलोजीकडे पाठवून त्या रिपोर्ट नुसार रुग्णाला पुढे रेडीओथेरपी/ किमोथेरपी उपचारांची गरज आहे की नाही ते ठरवले जाते.

काही वेळा रोगाची मात्रा अधिक असल्यास किंवा तिसऱ्या टप्प्या पेक्ष्या जास्त असल्यास रेडीओथेरपी/ किमोथेरपीचे उपचार करून सहा आठवड्यानंतर शस्त्रक्रिया केली जाते.

रेडिओथेरपीमध्ये जास्तीत जास्त रेडीएशन रोगास व कमीत कमी रेडीएशन बाजूंच्या महत्वाच्या अवयवांना ठेवून त्यांच्याशी संबंधित दुष्परिणाम कमी ठेवण्यासाठी किमान ३डी- सी. आर. टी किंवा आय एम.आर.टी. उपचार पध्दती अनुसरावी. रेडीओथेरपी साधारणपणे दररोज, आठवड्यातून पाच वेळा असे दीड महिन्यापर्यंत दिली जाते. रेडीओथेरपीचा आसर वाढवा म्हणून सोबत किमोथेरपीच्या गोळ्या दिल्या जातात.

रेक्टम कॅन्सर गुदद्वाराच्या अगदी जवळ असल्यास शस्त्रक्रिया करून पोटामध्ये स्टोमा/पिशवी बनवली जाते. काही रुग्णांमध्ये ती तात्पुरत्या स्वरुपात बनवून उपचार पूर्ण झाल्यानंतर बंद केली जाते तर दुर्दैवाने कांही रुग्णांमध्ये ती कायम स्वरूपी असते. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांना याची पूर्ण कल्पना देवून त्यांची मानसिकता बनवणे फार गरजेचे असते तसेच आयुष्यभर पिशवी साठी खर्च देखील खूप असतो.

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 27 April 2017 6:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top