Home > हेल्थ > असा टाळाल कॅन्सर

असा टाळाल कॅन्सर

असा टाळाल कॅन्सर
X

जागतिक स्तरावर अनेक मोठ्या WHO सारख्या संस्था , वेगवेगळ्या देशाची सरकारं, NGO, राज्य सरकारं आपापल्या पातळीवर कॅन्सर विरोधात मोहीम चालवीत आहेत. पण, अजूनतरी एकत्रितपणे काम होत नाहीये. यावर उपाय काय? तर सर्वांनी एकत्र येऊनसंघटीत पणे सर्वसमावेशक अशी कॅन्सर प्रतिबंधात्मक मोहीम राबवणे.

असा टाळाल कॅन्सर

  • नियमित व्यायाम करा
  • स्थूलपणा किंवा वजन वाढू देऊ नका
  • ध्रुम्रपान आणि मद्यपान अतिरेक टाळा
  • ताज्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा
  • मटणा ऐवजी मासे खा
  • कडधान्य आणि कंदमुळांचा आहारात समावेश करा

राजकीय इच्छा शक्ती

भारत हा लोकशाही देश असल्यामुळे येथील राजकीय नेतृत्व हे जनमानसाचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांच्या हितानुसार निर्णय घेण्यास बांधील असते. जोपर्यंत राजकीय वर्ग तंबाखू बंदीचा ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत पूर्णपणे तंबाखू बंदी शक्य नाही.

सामाजिक आणि सांस्कृतीक दृष्टीकोन

आपल्याकडे अनेक आजारांबाबत अनेक गैरसमजुती असतात. कॅन्सर देखील याला अपवाद नाही. अनेक जण अजूनही असे ठाम समजतात की वाईट कर्माचे फळ म्हणून देवाने हा आजार शिक्षा म्हणून दिलेला आहे. किंवा पूर्वीच्या जन्मातील पापाची किंमत भरावी लागत आहे. सामाजिक गैरसमजुती, गरिबी, अज्ञान या अनेक कारणांमुळे भारतीय महिला आपल्या शारीरिक त्रासाबद्दल बोलायला उदासीन असतात. आर्थिक अडचणी शिवाय कॅन्सरचे निदान उशिरा होण्यामागचे हे एक खूप महत्वाचे कारण आहे.

सामाजिक मान्यता

कुणालाही सहसा या आजाराबद्दल बोलण्याची इच्छा नसते. कारण मुलांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होईल या बद्दल साशंकता असते. जातीनिहाय सामाजिक परिस्थितीमुळे सामाजिक बहिष्काराची भीती अनेकांच्या मनात असते. म्हणून सामाजिक आरोग्य राखण्यासाठी शाळांमधून आरोग्य शिक्षण देणे फार गरजेचे आहे. सामाजिक आणि आर्थिक घडी व्यवस्थित असलेल्या सामाजिक घटकांनी एकत्र येऊन कॅन्सर निदान शिबिरांचे आयोजन करावे. कॅन्सर उपाय योजना राबविण्याकरिता सरकारला हातभर लावावा. खाजगी कंपन्यांनी त्यांचा CSR फंड या कामासाठी वापरावा.

जागतिक स्तरावर अनेक मोठ्या WHO सारख्या संस्था , वेगवेगळ्या देशाची सरकारं, NGO, राज्य सरकारं आपापल्या पातळीवर कॅन्सर विरोधात मोहीम चालवीत आहेत. पण, अजूनतरी एकत्रितपणे काम होत नाहीये. यावर उपाय काय? तर सर्वांनी एकत्र येऊनसंघटीत पणे सर्वसमावेशक अशी कॅन्सर प्रतिबंधात्मक मोहीम राबवणे.

मध्यवर्ती प्रयोगशाळेची गरज

आपण आता सामान्य कॅन्सरच्या ढोबळ उपाययोजनेपर्यंत मर्यादित न राहता विशिष्ट भागाच्या कॅन्सर प्रतीबंधक ट्रिटमेंटपर्यंत मजल गाठली आहे. कॅन्सर उपचाराची मुलभूत अंग असलेली ओंको सर्जरी, केमोथेरपी, रेडियोथेरपी ही तंत्र आता बरीच प्रगत झालेली आहेत.

ओंको सर्जरी, केमोथेरपी डिपार्टमेन्ट चालविण्यास जास्त सुविधा असण्याची गरज नाही. पण, कुशल मनुष्यबळाची मात्र गरज असते. ज्यांच प्रशिक्षण मेडिकल कॉलेजमध्ये होऊ शकते. रेडियोथेरपी कक्ष ओंकोलोजी करिता अत्यावश्यक असतो. पण, त्याच्या उभारणीकरिता भरपूर भांडवल आणि पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतात. म्हणून सरकारनं मेडिकल कॉलेजांमध्येच या डिपार्टमेन्टसची उभारणी करावी. जेणेकरून हा खर्च वाचेल. किंवा राजीव गांधी योजने अंतर्गत एक अत्याधुनिक तंत्राचा समावेश असलेली समांतर रेडियोथेरपी सिस्टीम उभी करावी. ज्याचे मुख्यालय एका ठिकाणी असेल आणि त्याला जोडून असलेली समांतर सिस्टीम पूर्ण राज्यभरातील जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध राहील. याच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना मुख्यालयात ठरवल्या जातील आणि त्याची अंमलबजावणी जिल्हा पातळीवरील रुग्णालयांमध्ये होईल. यामुळे कॅन्सर ट्रिटमेंटसाठी व्यापक आणि सशक्त यंत्रणा कमी भांडवलात आणि कमी मानुष्यबळाच्या मदतीनं उभी करता येऊ शकेल.

टार्गेट थेरपी आणि कॅन्सर इम्युनो थेरपी

हायब्रीडोमा टेक्नोलोजी पहिल्यांदा कोल्हर आणि मिल्स्तेन या दोघा शास्त्रज्ञांनी शोधून काढली. ज्याद्वारे अँटीबॉडी बेस्ड ट्रीटमेंट देणे शक्य झाले आहे. ‘रीतुझीमाब‘ ही पहिली मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे जीला FDA ने लिम्फोमा कॅन्सर ट्रीटमेंट करिता परवानगी दिलेली आहे. तसेच ब्रेस्ट कॅन्सरकरिता ‘ट्रस्तुझुमाब’ ही मोनोक्लोनल अँटीबॉडी मैलाचा दगड ठरलेली आहे. अमेरिकन फूड ऍन्ड ड्रग असोशियेशन(USFDA) ने 14 पेक्षा जास्त मोनोक्लोनल अँटीबॉडीना आतापर्यंत मान्यता दिली आहे.

मोलीक्युलर मेडिसिन

जेम्स वॉटसन आणि फ्रान्सीस क्रिक या शास्त्रज्ञ जोडगोळीला मानवी जीन्समधील डीएनएच्या अंतर्गत रचनेचा शोध लावल्याबद्दल 1962 चे नोबेल पारितोषिक देण्यात आले. डीएनए शरीरातील पेशींना सूचना देऊन त्या पाळण्यास बाध्य करतो आणि जेनेटिक कोड ठरविण्यात भूमिका बजावतो. या कोड्सचे चालचलन आणि आंतरिक स्थायी भाव समजून घेऊन जीन्सचा शरीरातील संचार आणि त्यातील बदलामुळे संभाव्य धोक्यांचा अभ्यास शास्त्रज्ञांना यामुळे करता आला. रसायनशास्त्र आणि जीव वैज्ञानिक शास्त्रातील या आधुनिक तंत्रज्ञांनामुळे कॅन्सर संबंधित अनेक प्रश्नांची उकल होण्यास मदत झाली आहे.

सत्तरच्या दशकात शास्त्रज्ञाना कॅन्सरशी संबंधित ओंको जीन्स आणि ट्यूमर सप्रेसर जीन्स या दोन महत्वाच्या जीन्स रचनांचा शोध लागला. ओंको जीन्समुळे कॅन्सर पेशींची भरमसाठ वाढ होते. ओंको जीन्सची निर्मिती पेशीतील सामान्य प्रोटो ओंको जीन्समधील बदलांमुळे होते. प्रोटो ओंको जीन्स हे पेशीतील जीन्सचे वर्गीकरण करतात आणि त्यांच्या कार्यावर नियमित नियंत्रण ठेवतात.

ट्यूमर सप्रेसरजीन्स हे सुद्धा सामान्य जीन्स असतात जे पेशींच्या वर्गीकरणाचा वेग मंद करतात. तसंच डीएनएच्या कार्यातील व्यत्ययास दूर करतात आणि जुन्या पेशींना मृत होण्याची आज्ञा देतात. ट्यूमर सप्रेसरजीन्सच्या कार्यात अडथळा आल्यास त्यांचे कार्य थांबते आणि पेशींची अनियंत्रित वाढ होऊन शरीरात कॅन्सर ची सुरवात होते.

बायोटेक्नोलोजीतील आधुनिक संशोधनामुळे व्यापक प्रमाणात डीएनए, आरएनए, प्रोटीन्स, क्रोमोसोम्स इत्यादी मोलेक्युलर मार्केर्स चा शोध लागला. ज्यामुळे कॅन्सरचे निदान सहज शक्य झाले. 2% पेक्षा कमी आजार हे मोनोजेनिक असतात. म्हणजे एकाच पेशीतील बद्लांमुळे उत्पन्न होतात तर जवळजवळ ९८% आजार हे पोलीजेनिक असतात म्हणजे अनेक पेशीतील बदलांमुळे ते उत्पन्न होतात. जीन्स मधील बदलांचा अभ्यास करून त्याच्या अनुषंगाने कॅन्सर पिडीताला अनुरूप ट्रीटमेंट देणे शक्य होते. भविष्यात, क्लिनिकल प्रोटोमिक्समुळे कॅन्सर निदान अधिक लवकर होईल, पेशींच्या मार्गातील अडथळे किंवा बिघाड शोधण्यास आणि ते दूर करण्यास देखील यामुळे खूप मदत होईल. तसेच पेशंटच्या आजाराच्या प्रमाणानुसार शरीराच्या विशिष्ट कॅन्सरग्रस्त भागावर इलाज करता येऊ शकेल. तसेच आवश्यक असल्यास इलाजाची प्रक्रिया परत सुरु करता येऊ शकेल.

दिलीप निकम

लेखक मुंबईतील प्रतिष्ठीत कामा रुग्णालयात कॅन्सर तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

संपर्क - [email protected]

Updated : 16 Feb 2017 6:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top