Home > हेल्थ > मुंबई मधुमेहाच्या विळख्यात

मुंबई मधुमेहाच्या विळख्यात

गेल्या काही वर्षांमध्ये बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून मधुमेह आणि डायबेटीस आजार अनेकांच्या मागे लागले आहेत. त्यातच मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी मुंबई महापालिका अनेक उपाययोजना राबवत आहे. त्यापार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य दिनानिमीत्त मुंबईतील मधुमेहाच्या धगधगत्या वास्तवावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...

मुंबई मधुमेहाच्या विळख्यात
X

मुंबईकरांची (Mumbaikar) बदललेली जीवनशैली आणि वाढलेली दगदग यामुळे अनेक मुंबईकर मधुमेहग्रस्त आहेत. त्यातच मुंबई महापालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये 19 हजार 574, 2021 मध्ये 20 हजार 268, 2022 मध्ये 14 हजार 788 आणि फेब्रुवारी 2023 पर्यंत 14 हजार119 रुग्णांची नोंद झाली. तसेच 2020 मध्ये 16 हजार 21 रुग्णांचा मधुमेहाने मृत्यू झाला. 2021 मध्ये 15 हजार 566 रुग्णांचे मधुमेहाने निधन झाले. दोन वर्षात तब्बल 31 हजार 587 रुग्णांना मधुमेहामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मुंबई मधुमेहाच्या विळख्यात सापडल्याचं चित्र आहे. त्यामुळे आम्ही जे. जे हॉस्पिटलचे (J.J Hospital) मधुमेह तज्ज्ञ डॉ. विनायक सावर्डेकर (Dr. Vinayak Hardikar) यांच्याकडून मधुमेहाची कारणं जाणून घेतले.

डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितलं की, मुंबईतील लोकांच्या आहारात मोठा बदल झाला आहे. अनेकदा कामाची पध्दतीही बैठे काम अशीच असते. त्यामुळे स्थुलपणा येतो. त्याबरोबरच व्यायामाचा अभाव असल्याने मधुमेहाची शक्यता वाढते. तसेच दारु, तंबाखू, मिठाचा अतिवापर यासारख्या गोष्टींमुळेही लोकांना मधुमेह होण्याची शक्यता वाढते. तसेच आहारात जंक फुडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम शरीरावर होतो. मात्र शहरी भागाच्या तुलनेत ग्रामिण भागात आहारात सुसूत्रुता असते. शेती किंवा इतर कामांसाठी लोक चालण्यावर भर देतात. त्यामुळे ग्रामीण भागाच्या तुलनेत मुंबईत दोन वर्षात तब्बल 31 हजार 587 नागरिकांचा मधुमेहाने जीव गेला आहे.



मधुमेहावर मात कशी करावी?

लोकांनी आपलं वजन कमी करण्यासाठी आहारासोबत योग किंवा व्यायामाकडे लक्ष द्यायला हवे. कारण उच्च रक्तदाब असो वा मधुमेह व्यायामाने कमी करता येतो.

चालणे, पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे हे व्यायाम निरोगी राहण्यासाठी महत्वाचे आहेत. तसेच पोटाचा घेर आणि चरबी कमी करण्यासाठी जंक फुडचे सेवन कमी करायला हवे, असं मधुमेहतज्ज्ञ डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितलं.

Updated : 8 April 2023 4:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top