Home > News Update > धक्कादायक: देशातील कोरोना रुग्णांची संख्या १८ हजारांवर

धक्कादायक: देशातील कोरोना रुग्णांची संख्या १८ हजारांवर

धक्कादायक: देशातील कोरोना रुग्णांची संख्या १८ हजारांवर
X

देशभरात गेल्या २४ तासात कोरोनाचे १ हजार ३३६ नवीन रुग्ण आढळल्याने रुग्णांच्या संख्येने आता १८ हजारांचा टप्पा पार केला आहे. आता ही संख्या १८ हजार ६०१वर पोहोचली आहे. तर गेल्या २१४ तासात ४७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ५९० वर गेली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे ३ हजार २५२ रुग्ण बरे झाले असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असूनही संख्या सद्. ४ हजार ६६६वर पोहोचली आहे. तर त्यानंतर दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

Updated : 21 April 2020 4:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top