Home > हेल्थ > स्वाईन फ्लू : उपचार

स्वाईन फ्लू : उपचार

स्वाईन फ्लू : उपचार
X

स्वाईन फ्लूविषयक या लेखमालेत, याआधीच्या दोन भागांत आपण रोगाची माहिती व निदान कसे करतात ते पाहिले. आता उपचारांविषयी जाणून घेऊ.

वॅक्सीन घ्यावं का ?

सामान्य फ्लूसाठी जे वॅक्सीन वापरतात तेच स्वाइन फ्लूपासूनही संरक्षण देतं. रोग्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी आणि रुग्णालय कर्मचारी अथवा सोशल वर्कर्सनी वॅक्सीन घेणं गरजेचं आहे. इतरांनी आपली रोगप्रतिकार शक्ती बळकट करून विशेष काळजी घेतल्यास निरोगी राहता येणं शक्यं आहे.

होमिओपॅथीत /आयुर्वेदात वॅक्सीन आहे का?

होमिओपॅथीत वॅक्सीन नाही. पण उपचार नक्कीच आहेत. जे लक्षणे दिसताच सुरू केल्यास आजार बळावण्यापासून संरक्षण देते. इंन्फ्लूएंझीनम ही औषधी स्वाईन फ्लूवर एकमेव उपाय नाही. लक्षणांचा अभ्यास केल्याशिवाय कुठलेही होमिओपॅथिक औषध उपयुक्त ठरत नाही. पण इंन्फ्लूएंझीनमसारखीच बरीचशी औषधं जसे की ब्रायोनिया,जलसेमिअम, मर्क सॉल इ. फ्लूसदृश लक्षणांचा अभ्यास करून दिली जाऊ शकतात. पण डॉक्टरी सल्ला अनिर्वाय आहे. अन्यथा औषधांचा परिणाम शून्य.

होमिओपॅथीमध्ये Tamiflu (oseltamivir phosphate) हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून जाहीर झालय. जर तुमच्या परिसरात स्वाईन फ्लूची साथ असेल किंवा तुम्ही रोग्याच्या संपर्कात आला असाल तर हे औषध घेतेले जाऊ शकते. पण टॅमिफ्लू या औषधाचा इतिहास पाहता ते १००% उपयुक्त म्हणता येणार नाही. जपानमध्ये या औषधावर बंदी घातली गेली कारण १८ वर्षाखालील मुलांच्या मनावर अगदी एक दोन डोसनंतरच विचित्र परिणाम झाल्याच, अगदी काहींनी वेडाच्या भरात आत्महत्या केल्याची उदाहरणे नजरेस आली.

म्हणूनच प्रतिबंधात्मक उपाय योजनाच जास्त सुरक्षित आहेत असे मला वाटते.

१) दिवसभरात शक्य असेल तेव्हा स्वच्छ पाणी आणि साबणाने हात धुवा. घाईघाईत नाही तर निदान ४० सेकंद तरी वेळ द्या. २) ते शक्य नसल्यास अल्कोहोल मिश्रित सॅनिटायजर हात स्वच्छ करण्यासाठी वापरा. ३) रोग्याच्या संपर्कात जाणं टाळा ४) प्रवासातून किंवा अस्वच्छ ठिकाणाहून आल्यावर नाका-तोंडात बोटं घालणं किंवा डोळे चोळणं टाळा.

घाबरू नकात. पण सर्दी तापाकडे दुर्लक्ष ही करू नकात. स्वच्छता पाळा आणि आजार टाळा. ज्ञान वाढवा. ज्ञान पसरवा. आणि स्वाइन फ्लूला आळा घाला.

यासंबंधी घरगुती आयुर्वेदिक उपचार आहेत का, याचीही विचारणा होते. याबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करता येईल.

Updated : 28 Oct 2017 12:54 PM GMT
Next Story
Share it
Top