पुरूषांसाठी नवा गर्भनिरोधक पर्याय
X
काँडमला एक नवा पर्याय आता लवकरच बाजारात येण्याच्या तयारीत आहे. ही कुठलीही गोळी किंवा लेटीक्सची वस्तू नाही तर हे आहे एक प्रकारचं ' जेल '!
‘वासल जेल’ हया नावाने हे जेल जगभरत उपलब्ध होणार असून पुरूषांसाठी 100 टक्के गर्भनिरोधक म्हणून हा पर्याय आता पुढे येत आहे.
‘वासल जेल’ हे एक प्रकारचे हायड्रो जेल असून ते इंजेक्शनद्वारे पुरूषांच्या पेनिसमध्ये (लिंगामध्ये) सोडलं जातं. शरीरात प्रवेश करताच या जेलचं रुपांतर पातळ मुलायम आवरणामध्ये होतं. परिणामी प्रत्यक्ष समागमाच्यावेळी हे जेल स्पर्म्सना बाहेर येण्यापासून अटकाव करतं. हे हायड्रो जेल एक प्रकारच्या चाळणी सारखं काम करतं. ज्यामुळे स्पर्म्सना अटकाव होतो, पण इतर उत्सर्जित होणारं द्रव मात्र बाहेर सोडलं जातं.
काँडम वापरामध्ये ते फेल होण्याचे प्रमाण १५% आहे. पण या वासल जेलच्या प्रयोगांमध्ये १०० % यश मिळालं आहे. विशेष म्हणजे एक ते दोन वर्षाच्या निरोधाकरिता हे जेल प्रभावी आहे. तसंच शस्त्रक्रियेद्वारे होणार्या पुरुष नसबंदीसारख्या पर्यायासारखं त्रासदायक आणि कायमस्वरूपी नाही.
‘बेसिक आणि क्लिनिकल अन्ड्रोलॉजी’ नियतकालिकामध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. ऐन प्रजनन काळात १६ नर वानरांना मादी वानरांशी समागम करण्याअगोदर या वासल जेलचे इंजेक्शन्स दिले गेले होते. त्यातल्या १६ पैकी एकाही मादेला गर्भधारणा झाली नाही. तसेच नर वानरांमध्येही त्याचे कुठलेच दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत.
पर्सिमस फाउंडेशन ही अमेरिकन फार्मा कंपनी वर्षभराच्या आत हे जेल बाजारात उपलब्ध करण्याच्या तयारीत आहे. महत्त्वाचं म्हणजे गेली तीस वर्षे भारतातच यावर संशोधन झालं आहे. पण, त्याचं पेटंट मात्र पर्सिमस फाउंडेशन या फार्मा कंपनीला मिळालेले आहे.