Home > हेल्थ > पंचकर्म आणि आयुर्वेद

पंचकर्म आणि आयुर्वेद

पंचकर्म आणि आयुर्वेद
X

पंचकर्माने आजार बरा होईल असे डाॅक्टर सांगतात. परंतु सर्वसामान्यांच्या मनात

अशा वेळी प्रश्न उठतो की, सर्वच आजार या पंचकर्माने कसे बरे होतील? सर्व डॉक्टर मंडळी ही पंचकर्मे म्हणजे काय व कोणत्या आजारात काय पंचकर्मे करावीत इतकेच सांगतात. पंचकर्मामुळे आजार बरे करण्यासाठी शरीरात नेमके कोणते बदल होतात व ते कसे याबद्दल कळले तर लोकांचा पंचकर्मावरील विश्वास वाढेल. ते स्वत:हून पंचकर्म करण्यास उद्युक्त होतील.

पंचकर्म म्हणजे शरीराची शुद्धी होय. जशी आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे

शरीराची सर्व्हिसिंग म्हणजे पंचकर्म. थोडक्यात गाडिला जसे आपण 'आॅयलिंग', 'ग्रिसिंग' करतो, कार्बोरेटर मधला कचरा काढतो. गाडीचे आयुष्य वाढवतो. गाडी जास्त दिवस टिकावी म्हणुन आपण प्रयत्न करतो. अगदी त्याप्रमाणे शरिररुपी गाडीचे 'आॅयलिंग' 'ग्रिसिंग' सर्व शरीरातील अगदी पेशींमधली घाण ज्याला 'toxins' किंवा 'debris' म्हटले जाते. ते काढुन टाकले जाते.सोबतच शरीरातील अवयवांची झालेली झीज भरुन काढणे व शरीराच्या महत्वाच्या अवयवांचे पोषण करणे हेही पंचकर्माद्वारे साध्य होते.

शरीरात होणाऱ्या आजाराला कारणीभूत असतात ते शरीरात वाढलेले वात, पित्त व कफ हे त्रिदोष. पंचकर्मामुळे शरीरातील हे वाढलेले दोष शरीराबाहेर फेकले

जातात व यामुळे सर्व आजार बरे होतात.आपण मराठीत म्हणतो आणि सर्वसामान्य व्यक्तिलाही माहीत असलेली गोष्ट म्हणजे 'सगळे आजार पोटापासुन सुरु होतात'.

शरीरातील 'जठराग्नी' म्हणजे पचनशक्ती जर बिघडली तर अनेक आजार होतात. उदा. अम्लपित्त, अजीर्ण, सर्दी, आमवात इत्यादी.

अशा वेळी जर पंचकर्म केले तर जठराग्नी वाढतो व पचनशक्तीची (metabolism) प्रक्रिया सुधारून विविध आजार बरे होतात. विशेषकरून मेटॅबॉलिक डिसिजेसवर

याचा खात्रीशीर परिणाम होतो. विरेचन हे पंचकर्म केल्याने आतड्याला ज्या मृतपेशी चिकटून बसलेल्या असतात त्या बाहेर फेकल्या जातात. शिवाय शरीरातील चयापचय प्रक्रियेत तयार झालेले toxins ही बाहेर फेकले जाते. त्यामुळे आतड्याचे शोषण सुधारते आणि आपण खाल्लेल्या अन्नाचे पोषणत्त्व व्हिटॅमिन्स, मिनरल्स, इत्यादी मिळतात. यामुळे

आजारातून सुटका होते. मांसपेशी, स्नायू ज्या आजारात दुर्बल होतात अशा आजारांत

विशेष पंचकर्माने त्याचे बल वाढवले जाते. शरीराची झीज भरून निघते. इमर्जन्सी अवस्थेत व काही दुर्धर आजारात आपणास नाइलाजास्तव अत्यंत उपयोगी स्टिरॉइड्सचा वापर करावा लागतो. ते जास्त दिवस वापरल्यास शरीराच्या सगळ्याच अवयवांवर दुष्परिणाम होतात. अशा अवस्थेत पंचकर्म केल्याने हे सगळे दुष्परिणाम घालवले जातात.

पंचकर्माने शरीर शुद्ध झाल्यामुळे आपण ज्या औषधीचे सेवन करतो त्या योग्य ठिकाणी कमी वेळेत व कमी कोर्समध्ये पोहोचतात. त्यामुळे आजार लवकर बरे होतात. हा पंचकर्माचा मुख्य फायदा आहे. अँटिबायोटिक्सचा रुग्णांकडून अनावश्यक अतिवापर

झाल्याने शरीरातील मित्र जिवाणू मरतात, परंतु गरज पडल्यास हे वापरावे लागतात. त्यामुळे अंगात शोषण क्रिया, चयापचय क्रिया बिघडते, अशा वेळी पंचकर्माने हे जिवाणू वाढवता येतात. बस्ती या पंचकर्माने लिव्हरमधील congested bile तरल करून लिव्हर सेलची कार्यक्षमता वाढवली जाते. असे केल्याने लिव्हरचे जे कार्य आहे ते म्हणजे शरीरातील हार्मोन्स, इंझाइम्स इतर घटकात रूपांतरित करून शरिरातिल अनावश्यक घटक बाहेर फेकण्याची क्षमता वाढते. पंचकर्मानंतर 4-5 दिवस विशेष संसर्जन चिकित्सा केल्याने metabolism rate वाढतो. यामुळे हळूहळू शरीरातील पाचक रस

उत्तम रीतीने तयार होतात व पचनशक्ती सुधारते. संसर्जन क्रमाशिवाय पंचकर्माचे कार्य पूर्णच होत नाही.

घृतपान, रसायन या क्रियेने पेशी पुनरुज्जीवित होतात. असे एवढे सगळे फायदे असल्यास हे नक्कीच म्हणता येईल की, पंचकर्म ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. पंचकर्म नक्कीच आपणास मिळालेले आयुर्वेदाचे एक वरदान आहे.

Updated : 11 May 2017 6:42 PM GMT
Next Story
Share it
Top