Home > हेल्थ > तंबाखू सेवनामुळे शुक्राणुंवर परिणाम

तंबाखू सेवनामुळे शुक्राणुंवर परिणाम

तंबाखू सेवनामुळे शुक्राणुंवर परिणाम
X

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, त्यामुळे होणारे आजार आणि त्याचा थेट सेक्सलाईफशी असलेला संबंध उलगडून सांगत आहेत डॉ. चेतन दरणे

तंबाखू ही एका वनस्पतीच्या पानाला सुकवून त्यावर प्रक्रिया करुन बनवली जातो. भारतात दररोज 2500 लोकांचा मृत्यु तंबाखूमुळे होतो. जगात तंबाखूमुळे होणार्‍या तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 2030 पर्यंत जगात तंबाखूमुळे मरणार्‍याचे प्रमाण वाढून एक कोटी होईल. तंबाखूमुळे होणार्‍या म्रुत्युचे प्रमाण AIDS, अपघात, दारू, ड्रग्स, आत्महत्या याच्या एकंदरीत संख्ये पेक्षाही जास्त आहे.

तंबाखू सेवनाची सवय ही अतिशय घातक आहे, तंबाखू सेवनामुळे व्यसन लागायची शक्यता ही दारु व कोकेन पेक्षा जास्त आहे. एका परीक्षणानुसार 10% भारतीय स्त्री व 57% पुरुष हे व्यसनाधीन आहेत. तंबाखूचे मुख्यत्वे धुररहीत व धुम्रपान हे दोन प्रकार आहेत. तंबाखू चघळणे, खैनी, गुट्खा, नस हे धुररहीत तर सिगारेट, बिडी, चिलम हे ध्रुम्रपाणाचे काही प्रकार आहेत. ध्रुम्रपाणामुळे ‘निकोटिन’ फुफुसाद्वारे रक्ताभिसरीत होवून मेंदूपर्यंत पोहचते व व्यक्तीला तंबाखूची किक लागते तसेच या निकोटिनच्या रक्तातील पातळीची मेंदूला सवय होते, ही पातळी खालावल्यास तंबाखूकडे व्यक्ती आकृष्ठ होतो. तंबाखूचे दुष:परिणाम हे जाणून घेणे हा त्याच्या प्रतीबंधावरील सर्वात महत्वाचा भाग आहे.

तंबाखूमध्ये पुढील कुप्रसीद्ध रसायन असतात व त्याचे सेवन आरोग्यास घातक ठरते

  • निकोटिन : हे अत्यंत विषारी व नशा आणणारे रसायन आहे
  • हाईड्रोजन सायनाईड : विषगृहात प्रयोगात येणारा विषारी वायु
  • अमोनिया: फरशी, स्वच्छतागृह ई. स्वछ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या द्रव्यातील रसायन.
  • प्थेलीन: कपड्यातील कीटाणूना मारण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गोळ्यातील रसायन.
  • क़ॅडमीयम : कारच्या बॅटरीत आढळनारे रसायन
  • कार्बन मोनोक्साईड : कारच्या धुरातील विषारी वायु
  • डीडीटी: किड्याना मारण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन
  • असिटोन: भिंतीवरील रंग काढण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन
  • बुटेन : इंधन म्हणून वापरण्यात येते

आपला मेंदू हा कोट्यवधी मज्जातंतू पासून बनला आहे, हे तंतु संदेश वहनाचं काम हे विशेष संदेश वाहकाद्वारे करतात, हे वाहक जेव्हा विशिष्ट समावेशक तंतुवर बसतात तेव्हा संबधीत नस कर्यांवीत होते. निकोटीन हे रक्तात अभिसरून अद्रेनल ग्रंथीना जागृत करतात व अद्रेनालिन या रसायनाचा स्त्राव होतो. अद्रेनालिन रसायन हे आनंद देणारे रसायन आहे. ते स्त्रावीत झाल्याने व्यक्तीला आभासी आनंदाची अनुभुती येते. त्यामुळे तो वारंवार तंबाखुकडे आकृष्ट होतो.

तंबाखू सेवनामुळे शरीरावर होणारे दुष:परिणाम म्हणजे केसाना व तोंडाला दुर्गंधी येते. तंबाखूजन्य पदर्थामुळे दाताची झीज होते, हिरड्या सुजतात, दातांवर डाग पडतात. वास घेण्याची शमता कमी होते, डोळ्याची जळजळ होते, डोळ्याभवती काळी वर्तुळे येतात, चित्त स्थिर राहत नाही. तंबाखू मुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, नाक, पोट, गर्भाशय आणि मुखाचा कर्करोग होतो. पुरुषाचे शुक्राणू कमी होतात. ज्या स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थ खातात त्यांची प्रजनन शक्ती कमी होते.

तंबाखू पासून सुटका व्हावी यासाठी दंतवैद्य सर्वात महत्वाचे सहकारी ठरतात, त्यांच्या सल्ल्यानुसार विविध औषधी व उपचार पद्धतीनी या सवयीवर मात करता येऊ शकते. तंबाखू मुक्तीसाठी तांबाखू सोडण्याची तारीख घोषित करावी. आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, सहकार्‍यांना याबद्द्ल कल्पना द्यावी. जेव्हा जेव्हा तंबाखू खाण्याची इच्छा होते तेव्हा तेव्हा 1 ते 100 अंक मोजणे. प्राणायाम करणे, बडिशेप खाणे, पाणी पिणे ईत्यादी गोष्टी उपयोगी पडतात. अनेकदा तंबाखू सोडताना थोडा त्रास होतो. पण हा त्रास कमी होण्यासाठी दंतवैद्यकांचा सल्ला घेणे उत्तम राहते.

डॉ. चेतन दरणे, यवतमाळ

Updated : 13 April 2017 6:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top