Home > हेल्थ > घातक आहारपद्धतींची हजेरी

घातक आहारपद्धतींची हजेरी

घातक आहारपद्धतींची हजेरी
X

कॅन्सर म्हटलं की सगळ्यांच्याच अंगावर काटा येतो. भीती असते. कारण कॅन्सरबद्दल अजूनही लोकांच्या मनात खूप समज गैरसमज आहेत आणि त्यामागची कारणंही तशीच आहेत. कॅन्सरवरच्या उपचारांमध्ये किमोथेरपी व रेडिओथेरपी अशा दोन उपचारपध्दती असतात. परंतु त्या दोहोंचा शरीरावर उपयोग कमी आणी साइड इफेक्ट्स जास्त असा प्रकार घडतो. कॅन्सर पेशींसोबतच चांगल्या पेशींवर किमोथेरपी परिणाम करते. अमेरिकेतील कॅन्सरतज्ज्ञ रॉबर्ट राईट हे अँटिकॅन्सर इन्स्टिट्यूटचे प्रमुख असून त्यांच्या ‘किलिंग कॅन्सर, नॉट पीपल' या पुस्तकात किमोथेरपीच्या परिणामांबाबत चर्चा केली आहे.

नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ ओट्टो हेन्रिच वॉरबर्ग यांच्या १९२३ व १९३१ या दोन वर्षांमधील महत्त्वपूर्ण संशोधनाचा येथे उल्लेख करावा लागेल. कॅन्सर उद्भवण्यामागची कारणे व तो टाळण्याबाबतचे उपाय यांसदर्भात हे संशोधन होते. आज त्यांबाबत चर्चा करू...

1. शरीररचना व घातक पेशी

A- अॅसिडोसिस : शरीरातील अॅसिडिक वातावरण वाढल्यास कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. रक्तातील ph value 7.35 ते 7.45 असल्यास ते योग्य समजले जाते. गर्भावस्थेतील मनुष्यशरीराबद्दल सांगायचे तर गर्भजल हे अल्कलाइन असते. त्या अर्थाने मुळात आपले शरीर अल्कलाईन असतो. मात्र विपरित आहारामुळे व आहारपद्धतींमुळे शरीरातील आम्लता वाढत जाते. त्यातच आधुनिक काळात धान्ये व भाज्या यांवर कीटकनाशके फवारणीचे प्रमाण अतोनात वाढले आहे. अशा रसायनांमुळे शरिरातील ph अॅसिडिक होतो.

B- हायपॉक्सिया : शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर कॅन्सरजन्य पेशींना वाढण्यासाठी तसेच पसरण्यासाठी पोषक वातावरण मिळते.

2 – मूळ तत्त्वाचा उपयोग :

कॅन्सर किंवा कुठलीही व्याधी शरीरातील अल्कलाईन वातावरणात टिकू शकत नाही कारण मुळातच मानव शरीर जन्मत:च अल्कलाइन असते, या तत्त्वाचा कसा उपयोग करून घेता येतो, ते पाहू. आधुनिक माणसाने इतक्या प्रचंड प्रमाणात केमिकल्स व कीटकनाशकांना स्थान दिलेय की त्याचेundoing आता मुश्किल झाले आहे. त्यातल्या काही बाबी पुढीलप्रमाणे :

1- साखर : साखरेचा अतिवापर आपल्या आयुष्यात एवढा झालाय की अनेक प्रकारच्या केमिकल्समुळे आपले शरीर अॅसिडिक व्हायला लागते. परिणामी शरीरात कॅन्सर किंवा इतर विकार घर करू लागतात. जुन्या काळात लोक घरोघरी गुळाचा वापर करायचे. त्यात रसायने कमी प्रमाणात असायची. त्याचा दुष्परिणामही कमी प्रमाणात असायचा. पाहुणचार हा चहानेच करायचा, असा पायंडा पडल्यापासून शरीरात साखर अति प्रमाणात जायलाही सुरुवात झाली. हेच पूर्वीच्या काळी पाहुणचार हा गूळ शेंगदाण्याने व्हायचा. आजही हा बदल सहज शक्य आहे.

2- कोल्ड ड्रिंक्स : कोल्ड ड्रिंक्समुळेही शरीरात अॅसिडिक वातावरण वाढते. शरीर आजारांचे माहेरघर बनते. शीतपेयांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असते, हे आता सर्वश्रुत झाले आहे. आयुष्यातून कोल्डड्रिंक्स वजा करणे, हाच यावरचा उपाय. ताक, लिंबूपाणी, कोकम सरबत, फळांचे ताजे रस या पारंपरिक पेयांना त्यांचे स्थान पहिल्याप्रमाणे दिले गेले तर बाब गंभीर राहाणार नाही.

3- टूथपेस्ट : टूथपेस्ट किंवा शँपूसारख्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या पदर्थांमध्ये 'सोडियम लॉरेल सल्फेट’ हा घटक असतो. त्यामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मोठमोठ्या ब्रँडच्या पेस्टवर ठळक अक्षरात लिहलेले असते की, सहा वर्षांखालील मुलांना त्या देऊ नयेत. घेतलीच तर हरभऱ्याच्या आकाराएवढी पेस्ट घ्यावी, चुकूनसुध्दा खाऊ नये. चुकूनही पोटात गेली तर ती बाब गंभीर समजावी. अमेरिका, युरोपसारख्या देशांत पेस्टच्या पाकिटावर लिहिलेले असते... ‘पॉयझन. व्हिजिट कंट्रोल सेंटर इफ कंन्झ्युम्ड’. मात्र आपल्याकडे अशी जागरूकता नाही. पूर्वापार चालत आलेले दंतमंजन हे सगळ्यात उत्तम, असे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

4- तंबाखू : कुठल्याही प्रकारची तंबाखू जसे की सिगारेट, बिडी, गुटखा, पान मसाला इत्यादींमुळे कॅन्सरला आमंत्रण मिळते. बिडी, सिगारेट व्यक्तीने प्यायचीही गरज नसते. जे पितात त्यांनी सोडलेला धूरही अशा कारणास पुरेसा असतो.

याशिवाय प्रिझर्वेटिव्हज् पासून खतरनाक केमिकल्स असलेले अन्नधान्य यांपर्यंत अनेक घटक शरीरात घेऊन आपण कॅन्सर ओढवून घेत असतो. अमेरिकास्थित अँटिकॅन्सर इन्स्टिट्युट (www.americanaci.org) कॅन्सरवर मात करण्यासाठी १० महत्त्वाच्या (Recommended list) बाबी सुचवते. सर्वातमहत्त्वाची व पहिल्या नंबरवर सांगितली आहे ती म्हणजे अल्कलाईन आयोनाईज्ड वॉटर.

अल्कलाईन आयोनाईज्ड वॉटर : ज्यामध्ये 1- अँटि ऑक्सिडंट, 2- अल्कलाईन, 3- मायक्रोक्लस्टरिंग हे तीन गुणधर्म असतात असे म्हणजे अल्कलाईन आयोनाईज्ड वॉटर. हे पाणी वापरल्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकलचे प्रमाण कमी केले जाते. शरीर अल्कलाईन ठेवले जाते तसेच हायड्रेशन चांगले ठेवले जाते. न्यूट्रिशन व ऑक्सिजनमुळे अन्नपचन व रक्तात पोषक घटक शोषण्याच्या प्रक्रिया या उत्तमरीत्या होऊन घातक घटक शरीराबाहेर काढून टाकण्याचे कामही व्यवस्थितरीत्या केले जाते. यास डिटॉक्सिफिकेशन असे म्हणतात.

त्या प्रकारचे पाणी देणारे मशीन जपान, अमेरिकेप्रमाणे आता भारतातही उपलब्ध होऊ लागले आहे. त्यासाठी खालील ईमेल अॅड्रेसवर संपर्क करता येईल.

अन्य कारणांचा व उपायांचा विचार आपण पुढच्या लेखात करू.

डॉ. सतीश सूर्यवंशी

BAMS, PGDGM, CCH, PGDEMS

8433723567

[email protected]

Updated : 8 Sep 2017 9:44 AM GMT
Next Story
Share it
Top