Home > हेल्थ > कोड : समज-गैरसमज

कोड : समज-गैरसमज

कोड : समज-गैरसमज
X

पांढरेदाग कोड, Leucoderma, Vitiligo म्हणजे काय, तो कसा होतो, अनुवांशिक आहे का ? यावर उपचार करायला हवेत इतका गंभीर आजार आहे का ? या आणि अशा अनेक नानाविध प्रश्नांनी रुग्ण गोंधळला जातो. अशावेळी रुग्णांची कोंडी होते. काय करावे हेच सुचत नाही. अनेक उपचार करूनही फरक न झाल्यामुळे आगदी सुशीक्षीत रुग्णसुद्धा अंधश्रधेला बळी पडतात. आणि शेवटी निराशाच वाट्याला येते.

गोऱ्या रंगाचे आकर्षण तर सर्वांनाच असते, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लहान मोठ्ठा पांढरा डाग दिसू लागतो त्यावेळी मात्र आपण त्याला टाळतो. त्याचे वैगुण्य त्याला दाखवतो. कळत नकळत आपण त्याला दुखावतो. खरे तर ती व्यक्ती आधीच काळजीत आणि दुखात असते पण आपण विचार न करता दुखावत असतो. तो पाहिलाच मनाने खचलेला असतो आशा व्यक्तींना खरे तर मानसिक सामाजिक आधाराची गरज असते. पण असे होत नाही त्यांना आधार देण्याऐवजी दुखावले जाते ही खेदाची बाब आहे. मित्रांनो, प्रत्येक माणसात काही ना काही व्यंग, कमतरता असतेच. काही दिसतात तर काही दिसत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींना जमले तर सहकार्य करा त्यांचे वैगुण्य दाखवुन त्यांना दुखवू नका.

जागतिक vitiligo Research Foundation समितीने कोड विषयी असणाऱ्या गैरसमजुती दूर करून समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी २५ जून हा जागतिक कोड दिन म्हणुन पाळावयाचे ठरवले आहे. या दिवशी विविध सामाजिक संघटना या दिवशी विविध जनजागृती पर योजना कार्यक्रम राबवतात किबहुना त्याचे अविरत कार्यक्रम चालूच आसतात. कोड. पांढरे डाग. leucoderma, vitiigo या नावाने वैद्यकीय शास्त्रात संबोधले जाते. तसा हा काही मोठ्ठा शािररीक आजार नाही. पण एक मोठ्ठी सामाजिक समस्या आहे. विशेषतः मुलींमध्ये त्यातच, उपवर मुलींमध्ये तसेच मुलांमध्येसुद्धा विवाह जुळण्यास फार मोठ्ठी अडचण आहे. त्याशिवाय ज्या व्यक्तींना पंढरेडाग कोड या आजाराने त्रास आहेत त्या समाजापासून दूर उपेक्षित राहतात. या लोकांमध्ये एकलकोंडेपणा, शापित आयुष्य व्यतीत करतात.

कोडावर, पांढरे डागांवर कुठलेही औषधी नाही, हा दैवी कोप आहे वगैरे समजुतीही आपणाकडे रूढ आहेत. पांढरे डाग, कोड, Leucoderma, Vitiligo म्हणजे काय, तो कसा होतो, अनुवांशिक आहे का ? यावर उपचार करायला हवेत इतके गंभीर आजार आहे का ? या आणि अशा अनेक नानाविध प्रश्नांनी रुग्ण गोंधळला जातो. काय करावे आणि काय नाही यातून तो पूर्ण गोंधळला जातो. आशावेळी रुग्णाची कोंडी होते काय करावे हेच सुचत नाही. अनेक उपचार करून ही फरक न झाल्यामुळे आगदी सुशिक्षीत रुग्णसुद्धा अंधश्रध्देला बळी पडतात आणि शेवटी निराशाच वाट्याला येते.

कोड विषयी समज-गैरसमज

वैद्यकीयदृष्ट्या कोड हा काही आजार नाही. कारण यापासून कुठलाही त्रास होत नाही. किंवा जीविताला काही धोका नाही. तरीसुद्धा कोड हा भयंकर सामाजिक आजार आहे. पांढरे डाग असलेल्या मुला-मुलींचे लग्न होणे कित्ती आवघड आसते हे त्या कुटुंबालाच ज्ञात असते. त्या कुटुंबावर कलंक लावला जातो. समाजात त्यांची आवहेलना केली जाते. ज्या व्यक्तीला कोड आहे, त्या व्यक्तीला आपल्यात काहीतरी कमतरता आहे. आपणास काहीतरी असाध्य भयानक आजार झाला आहे. या न्युनगंडात तो वावरत आसतो. किंबहुना तो समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आसतो. त्याचा आत्मविश्वास पूर्णपने ढासळलेला असतो. हे सर्व सर्व विसरून जर त्याने समाजात कर्तुत्व करून दाखवले तर समाज त्यांना मानवंदना देतो अशी अनेक उदाहरणे आहेत. उदा. मायकल जॅक्सन भारताचा विख्यात क्रिकेटपट्टू एकनाथ सोनकर याने तर विश्वविक्रम घडून दाखवला.

भारतीय समाजात अनेक गैरसमजुती आहेत. समाजातील काही भोंदू बाबा, देवालाशी, मंत्रीक तांत्रिक कोड आसलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांना याबाबद वाट्टेल ते सांगतात, कुलदेवतेचा किंवा अन्यदेवाचा कोप, त्यामुळे हे संकट कोसळल्याची भीती घालतात. त्यामुळे अनेक धार्मिक विधी, उपवास, व्रत वैकल्ये, मंत्र तंत्र आणि धार्मिक विधी उपचारामुळे कोड बरा होईल असा सल्लाही देतात. त्यासाठी प्रचंड पैसा ही उकळतात. काही झाडपाल्यावाले वैदू, तुमडी, जळवा आदी अघोरी उपचार ही करतात. तसेच काही झाडपाल्याची औषधी ही देतात. याचाही काहीही उपयोग होत नाही. कोडावर योग्य वैद्यकीय उपचार करून घेणेच योग्य आहे. ग्रामीण भागात तर कोडच्या. पांढरे डागाच्या बाबतीत खुपच गैरसमज आहेत. यासाठी सामाजिक प्रबोधन फार महत्वाचे व गरजेचे आहे. प्रबोधन करून त्यांना सामान्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.

कोड बाधित व्यक्तींना आपल्याला काहीतरी असाध्य आजार झाला आहे असा मनोगंड आसतो. त्याचे त्यांना योग्य शास्त्रीय मार्गदर्शन व कारण समजावून सांगून मनोगंड दूर करणे करणे इष्ट आहे. मुलींच्या बाबतीत पांढरे डागांचा, कोडचा त्रास खूप जाणवतो. अशा मुलींचे विवाह जुळणे खुपच आवघड जाते. काही वेळा तर पूर्वजांनी केलेल्या पापांमुळे या पिढीत हा रोग आल्याचा अपप्रचारही समाजात केला जातो. अशा मुलींचे आयुष्यही बरबाद झाल्याची उदाहरणे समाजात आहेत. बऱ्याच वेळा उतारवयात ही लक्षणे दिसू लागतात. परंतु योग्य उपचार घेतले की हा असाध्य आजार असाध्य नाही.

मंगळी मुलगी तशीच कोडची मुलगी कुटुंबाला शाप ? आसा आक्रोश करूनही काही उपयोग नाही, मांत्रिक तांत्रिककडे जाऊन ही काही फारसा उपयोग नाही. ज्या व्यक्तींना कोड आहेत त्या व्यक्ती शापित आहेत किंवा काही वेगळया आहेत असा समज करून घेऊ नये. या आजाराने शाररिक, बौद्धिक, मानसिक क्षमतेवर कुठलही परिणाम होत नाही. त्यांची बुद्धीमत्ता ही अन्य व्यक्तीप्रमानेच असते. भारतीय समाजात कोड म्हणजे महाभयंकर आजार आहे. हा गैरसमज आंध्रश्रद्धा रुढी परंपरेतून कायम राहिली आहे. ही बाब दुर्दैवी बाब आहे. आगदी सुशिक्षित माणसेही गंडेदोरे आणी अंगारा-धुपार्याचा मार्ग या कोड निवारण्यासाठी स्वीकारतात हे मी पाहिले आहे. हे योग्य नाही कोड असणाऱ्या व्यक्तींनी समाजात यशाची शिखरे गाठली आहेत. हे लक्षात घेऊन आपण सर्वजण मिळून या कोडची कीड दूर करूया.

त्वचेवर बऱ्याच प्रकारचे पांढरट किव्हा पांढरे दाग येतात. सर्व पांढरे डाग म्हणजे कोड अथवा पांढरे डाग आसू शकत नाहीत. बऱ्याच वेळा अनेक आजारामध्ये जसे की पिटीरीयासीस अल्बा (pitiriasis Alba ) पोस्ट इंफ्लामेटरी (post inflamatory), हाय्पोपिग्मेंतातैओन (hypopigmentation), ईदिओ पथिक हायपो पिग्मेंतातीओन (Idiopathic Hypopigmentation), भाजल्यानंतर, जन्मजात, नँवस, पांढरे डाग यात समाविष्ट होतात. पांढरे डाग आहेत की बाकी काही याचे निदान तज्ञ डॉक्टर कडूनच करून घेणे योग्य आहे.

कोड म्हणजे काय ?

आगदी सोप्प्या भाषेत सांगायचे ठरले तर शरीरात असणारा रंग कमी झाल्याने त्वचा पांढरी दिसू लागते, यालाच पांढरे दाग म्हणतात. त्वचेमध्ये असणारया मेलानीन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणामुळे शरीरास काळा, सावळा, निम गोरा, गोरा रंग येतो. तो रंग तयार करणाऱ्या पेशी ज्यावेळी अकार्याक्षम होतात, व्यवस्थीत कार्य करत नाहीत, आथवा नष्ट होऊ लागतात त्यावेळी त्वचा पांढरट होते आणि पांढरे दाग दिसू लागतात. पांढऱ्या डागांचे विशेषतः प्रमाणानुसार चार प्रकार पडतात

१) लोकालईझड – यामध्ये एकाच ठिकाणी दाग येतात आणि स्थिर असतात

२) सेग मेंटल -- एका पट्ट्या मध्येच येतात .. दोन्ही बाजुं सारखेच असतात

३) अक्रोफेसिअल – या मध्ये शारीरच्या टोकाच्या भागाकडे हे दाग असतात म्हणजे हाताच्या बोटांकडे, ओठांवर, तळहात, टाळ पाय, आशा ठिकाणी आसतात

४) जनरल -- पूर्ण शरीरावर आसतात

कोडचे कारण

एखाद्याला कोड का होतो हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे. कोडमध्ये जंतू विषाणू नसतात. कोड कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात होऊ शकतो. हा काही दैव दैवतांचा शाप नाही की भूतबाधा ही नाही. याला शास्त्रीय कारण एवढेच सांगता येईल की मेलानीन हा रंग तयार करणाऱ्या मेलानोसाईट पेशींच्या विरोधात एँनटी मेलानोसाईट प्रतीद्रव्ये तयार होतात आणि ही प्रती द्रव्ये मेलानीन निष्क्रीय करतात व मेलानीन तयार होत नाही ही प्रतीद्रव्ये का तयार होतात हा संशोधनाचा विषय आहे . आणि त्याविषयी जगभरात संशोधन चालू आहे. आपल्याच शरीराती काही पेशी आपलीच ओळख विसरतात आणि अनोळखी पेशींना नष्ट करण्याची प्रक्रिया चालू होते आनि तेथूनच हा आजार बळावतो.

कोडावरील उपचाराचे यश अपयश

१) एकाच घरात दोन पेक्षा जास्त व्याकीनांना ही बाधा आसेल तर वेळ लागतो

२) बऱ्याच वर्षांपासून जुनाट झालेल्या आजाराला वेळ आगतो

३) पांढरे दगनावर काले केस असल्यास लवकर फरक पडतो

४) अंगावर जास्त प्रमाणात असल्यास वेळ लागतो

५) वयाच्या ४० वर्षांनतर उशिरा फरक पडतो

६) उपचारासाठी काही महिने वर्ष हा कालावधी आतो त्यामुळे रुग्ण बरोबरच डॉक्टरांनी ही संयम पाळणे हे गरजेचे आसते.

Updated : 25 Jun 2017 10:14 AM GMT
Next Story
Share it
Top