Home > हेल्थ > अल्कलाईन आयोनाइज्ड वॉटर

अल्कलाईन आयोनाइज्ड वॉटर

अल्कलाईन आयोनाइज्ड वॉटर
X

कॅन्सरसारखे आजार दूर ठेवायचे तर शरीरातील रासायनिक स्थिती अल्कलाइन ठेवावी, असे गेल्या वेळच्या लेखात विशद केले होते. या भागात आयोनाइज्ड वॉटरविषयी माहिती घेऊ.

‘कँगेन वॉटर’चे फायदे

1- शरीराचा इलेक्ट्रिकल चार्ज पुन्हा प्राप्त होतो. म्हातारपणामुळे व शरीरातल्या पेशींचा इलेक्ट्रिकल चार्ज गेल्याने ऑक्सिजन नि न्युट्रिशनची झालेली कमतरता पूर्ववत होते.

2- पेशींना जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळावा म्हणून आपण योगा, मेडिटेशन करतो. तोच ऑक्सिजन पाण्यातून कितीतरी जास्त पटीने मिळतो.

3- अँटिऑक्सिडंट हा या पाण्याचा गुणधर्म एवढा प्रभावी आहे की आपण तीन वर्षं न चुकता एक ग्लास ग्रीन टी रोज प्यायलो, तर तेवढा परिणाम साधेल. तोही फक्त एक दिवस कँगेन वॉटर पिण्याचा परिणाम. हे पाणी शरीरातील फ्री रॅडिकल्स डॅमेज, सेल्युलर डॅमेज भरून काढते. याने म्हातारपण लवकर येत नाही व आजार लवकर बरे होतात.

4- कँगेन वॉटर अल्कलाईन वॉटर सुध्दा आहे. अल्कलाईन शरीरात कुठलेच आजार होत नाहीत! अगदी कन्सरसुध्दा.

5 - सगळ्या विकारांचे मूळ कारण असते आपला आहार. त्यातही तेल. ते शरीरातून काढून टाकायचं काम हे पाणी करते. सर्व आजारांचं मूळ पोटात असते. मात्र आजार बरे करण्याची क्रियाही पोटातूनच सुरू केली जाते. कँगेन वॉटरमुळे शरीरशुध्दीचं काम खूप चांगल्या प्रकारे होते.

6 - शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढायचं काम कँगेन वॉटर करते.

7 - घरात आणले जाणारे पेस्टिसाईड, केमिकलयुक्त पदार्थ कँगेन वॉटरमध्ये धुतल्याने केमिकलफ्री होतात.

8 - टॉयलेट क्लिनर, डिसइन्फेक्टंट, फिनाईल, टुथ पेस्टच्याऐवजी आपण अॅसिडिक वॉटर 2.5 पी.एच.चा वापर करतो. वॉशिंग पावडरच्या ऐवजी 11.5 पी.एच.च्या पाण्याचा वापर होतो.

9 - त्वचा तरूण ठेवण्यासाठी ब्यूटी वॉटरचा उपयोग होतो.

10 - हंजा वॅली (hunza valley) च्या लोकांचे सरासरी आयुष्य 120 वर्ष आहे. ते जास्तीत जास्त 145/160 वर्षांपर्यंत जगतात. त्यांच्या पाण्यात अॅक्टिव हायड्रोजन असतो, ज्यामुळे आजार होत नाहीत. कँगेन वॉटरमध्येही अॅक्टिव हायड्रोजन असतो, हा अत्यंत गुणकारी ठरतो.

डॉ. सतीश सूर्यवंशी

Updated : 15 Sep 2017 12:00 PM GMT
Next Story
Share it
Top