Home > Fact Check > Fact Check: कोरोना लस घेतलेले 2 वर्षात मरतील, नोबेल पारितोषिक विजेत्या डॉक्टरच्या व्हायरल दाव्याचं सत्य काय?

Fact Check: कोरोना लस घेतलेले 2 वर्षात मरतील, नोबेल पारितोषिक विजेत्या डॉक्टरच्या व्हायरल दाव्याचं सत्य काय?

Fact Check: कोरोना लस घेतलेले 2 वर्षात मरतील, नोबेल पारितोषिक विजेत्या डॉक्टरच्या व्हायरल दाव्याचं सत्य काय?
X

एका व्हायरल व्हाट्सएप मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, नोबेल पारितोषिक विजेते ल्यूच मॉन्टॅनियरच्या मते, कोरोना लस घेणाऱ्यांसाठी जगण्याची कोणतीही आशा नाही. या मेसेजसह त्यांचे अनेक कोट लिहिले गेले आहेत आणि lifesitenews.com https://www.lifesitenews.com/news/nobel-prize-winner-mass-covid-vaccination-an-unacceptable-mistake-that-is-creating-the-variants/

या वेबसाईटची लिंक देखील देण्यात आली आहे. सोबतच, मॉन्टॅनियरच्या विकिपीडियाची लिंक https://en.m.wikipedia.org/wiki/Luc_Montagnier देखील जोडण्यात आली आहे.

काय आहे सत्य?

नोबेल पारितोषिकाच्या वेबसाइटनुसार, फ्रेंच व्हायरलॉजिस्ट ल्यूच मॉन्टॅनियर यांना Human Immunodeficiency Virus (HIV) च्या शोधात दिलेल्या योगदानाबद्दल 2008 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. मात्र, त्यानंतर ते त्यांच्या अशास्त्रीय विचारांमुळे चर्चेत येऊ लागले. फ्रेंच आउटलेट सायन्स फीडबॅकने गेल्या वर्षी दिलेल्या अहवालानुसार, मॉन्टॅनियरने दावा केला होता की, कोरोनाव्हायरस एक कृत्रिम व्हायरस आहे ज्यात एचआयव्हीचे जेनेटिक मटेरियल आहेत.

दरम्यान, लाईफ साईट नावाच्या वेबसाईट्वर असलेल्या 19 मे च्या "Nobel Prize winner: Mass COVID vaccination an 'unacceptable mistake' that is 'creating the variants'" या शीर्षकाच्या रिपोर्टमध्ये, मॉन्टॅनियरचा हवाला देत असा कोणताही दावा केला जात नसल्याचं म्हटलं आहे. तसंच व्हायरल मेसेजमध्ये केला जात असलेल्या दाव्याचं खंडन करण्यात आलं आहे.

लाइफ साईट न्यूजवरील हा लेख अमेरिकन एनजीओ 'rair foundatin' च्या लेखावर आधारित आहे जो 18 मे ला प्रकाशित करण्यात आला होता. दरम्यान, या लेखामध्ये, मॉन्टॅनियरच्या मुलाखतीची 2 मिनिटांची क्लिप आहे. तर, 11 मिनिटांची संपूर्ण मुलाखत फ्रेंच वेबसाइट प्लॅनेट 360 वर अपलोड केली आहे. दरम्यान, मॉन्टॅनियरचा असा विश्वास आहे की, कोव्हिडचे नवे व्हेरिएन्ट वॅक्सीनमुळे तयार झाले आहेत. त्यांच्या 2 मिनिटांच्या क्लिपमध्ये त्यांना विचारण्यात आलं की, "एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण होतंय, तुम्ही याकडे कसे पाहता ?

यावर मॉन्टॅनियरने उत्तर दिले, "ही एक मोठी चूक आहे, नाही का? वैज्ञानिक दृष्ट्या देखील आणि वैद्यकीय दृष्ट्या देखील. ही अशी चूक आहे जी सहन केली जाऊ शकत नाही. इतिहासातील पुस्तके हे दाखवतील, कारण लसीकरणामुळेच नवीन व्हेरिएन्टचा जन्म झालाय."

दरम्यान, यातलाच काही भाग व्हाट्सअँपवर शेअर केला जात आहे.

वाचकांनी हे लक्षात घ्यावे की, मॉन्टॅनियर हे त्याच्या लसीकरण विरोधी विचारांसाठी ओळखले जातात.

ऑल्ट न्यूज सायन्सच्या संस्थापक संपादक डॉ. सुमैया शेख यांनी त्यांचं मत मांडल. त्या म्हणाल्या –

"मॉन्टॅनियरने जे सांगितले आहे. वास्तव त्याच्या उलट आहे. लसीमुळे व्हायरसची देवाणघेवाण कमी होऊ शकते. व्हायरस शरीरात स्वतःला वाढवण्याच्या हेतूने स्वतःला वाढवतो. या सगळ्या क्रियेला आपण विषाणूचं म्युटेशन म्हणतो. व्हायरसचं म्युटेशन झाल्यास याचा प्रसार अधिक होतो. म्हणूनच, लसीकरण आणि संसर्गाचा प्रसार कमी केल्यास व्हायरसचा प्रसार थांबू शकतो आणि त्याद्वारे नवीन म्युटेशन रोखता येऊ शकते. लस केवळ मोठ्या लोकसंख्येमध्ये व्हायरसची म्युटेशन रोखू शकते आणि त्याचप्रमाणे नवीन व्हायरसच्या व्हेरिअन्टची निर्मिती सुद्धा रोखू शकते."

दरम्यान, आसाम पोलिसांनी देखील फेसबुकवर एक पोस्ट प्रकाशित करत व्हॉट्सअँप संदेश दिशाभूल करणारा असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, फ्रेंच व्हायरोलॉजिस्ट लुच मॉन्टॅनियर असं म्हणाले नव्हते की, "ज्यांचं आधीच लसीकरण झालं आहे त्यांच्यासाठी कोणतीही आशा नाही तसेच शक्य उपचार नाही. आपण मृतदेह जाळण्यासाठी तयार असलं पाहिजे." यासोबतच, ते असंही म्हणाले नव्हते की, ज्या लोकांनी लसीकरण केले आहे. ते येत्या दोन वर्षांच्या आत मरतील. मात्र, त्यांनी लसीकरणाला विरोध नक्कीच दर्शवला होता.

लुच मॉन्टॅनियर आणि त्यांचा छद्म-विज्ञान वाद...

2010 मध्ये जर्मनीत नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या मेळाव्यात मॉन्टॅनियरने धक्कादायक भाषण केलं होतं. यामध्ये त्यांनी व्हायरल इन्फेक्शन शोधण्याच्या अशा पद्धतीबद्दल सांगितलं होतं की, ते होमिओपॅथीच्या अगदी जवळच वाटू लागलं. 'द ऑस्ट्रेलियनने' हे वृत्त दिलं आहे. मॉन्टेनियरच्या या विधानावर लिंडाऊ नोबलच्या अधिकृत वेबसाइटवर एक ब्लॉग देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

दरम्यान, अल्ट न्यूज सायन्सने 2018 मध्ये एक लेख प्रकाशित केला होता – "होमिओपॅथी उपचारांचा एक प्रभावी प्रकार आहे का?" ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की, आधुनिक वैज्ञानिक स्पष्टीकरणानुसार, होमिओपॅथिक औषधे केवळ प्लेसीबो इफेक्ट आहेत. 2012 मध्ये, फोर्ब्सने एक लेख प्रकाशित केला होता - 'Nobel laureate joins anti-vaccination crowd at Autism One'. दरम्यान, या लेखामध्ये असं सांगण्यात आलं होतं की, मॉन्टॅनियरने त्यांचा लेख कोणत्याही नामांकित जर्नलमध्ये प्रकाशित केलेला नाही.
"स्वतःला बातम्यांमध्ये ठेवण्यासाठीचा हा एक डाव आहे आणि मॉन्टॅनियर वैज्ञानिक आधाराशिवाय गोंधळलेल्या सिद्धांताला प्रोत्साहन देत आहेत. आणि आता तर ते, पालकांच्या वाईट परिस्थितीचा फायदा घेत आहेत आणि ऑटिज्म असलेल्या मुलांना ऐंटीबायोटिक ट्रीटमेंटचा सल्ला देऊन त्यांच्या सिद्धांताला पुढे नेत आहेत."

गेल्या वर्षी, मॉन्टॅनियर प्रसिद्धीझोतात आले होते कारण, त्यांनी सांगितलं होतं की, कोरोना व्हायरस चीनमधील लॅबमध्ये बनवला गेला आहे. मॉन्टॅनियरने फ्रान्सच्या C News ला सांगितलं की, कोविड -19 "नैसर्गिक नाही" ते असंही म्हंटले की, 'एड्स लस बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आण्विक जीवशास्त्रज्ञांच्या कार्यामुळे हा रोग उद्भवला आहे.' जपान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

अमेरिकन फॅक्ट चेकिंग संस्था स्नोप्सने म्हटले आहे की, शास्त्रज्ञांनी मॉन्टॅनियरच्या विधानाला वादग्रस्त असल्याचं म्हटलं आहे. रिपोर्टनुसार, पॅरिसमधील पेस्चर इन्स्टिट्यूटचे व्हायरोलॉजिस्ट 'Etienne Simon-Lorière' ने म्हंटल आहे की, "याचा काही अर्थ निघत नाही. हे अगदी लहान घटक आहेत जे एकाच कुटुंबातील इतर विषाणूंमध्ये आढळतात, जसे की कोरोनाव्हायरसच्या इतर विषाणूंमध्ये ... ते जीनोमचे भाग आहेत जे कधीकधी जीवाणू, विषाणू आणि वनस्पतींच्या अनुवांशिक सामग्रीच्या अनुक्रमांसारखे दिसून येतात. जर आपण एखाद्या पुस्तकातून एखादा शब्द उचलला आणि म्हटलं की, हा इतर कोणत्यातरी पुस्तकातील शब्दाची प्रत आहे?…हे विचित्र आहे."

अशा शब्दात मॉन्टॅनियरचा दावा फेटाळला होता.

निष्कर्ष:

कोरोना लस घेतलेले 2 वर्षात मरतील, असा कोणताही दावा नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर मॉन्टॅनियर यांनी केलेला नाही. मात्र, त्यांनी लसीकरणाबाबत शंका घेतल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. तसंच त्यांनी लसीकरणाबाबत मांडलेला विचार देखील असत्य असल्याचं जगभरातील वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते.

या संदर्भात अल्ट न्यूज ने Fact check केलं आहे. https://www.altnews.in/hindi/whatsapp-hoax-claims-nobel-laureate-said-all-vaccinated-people-will-die-within-2-years/

Updated : 18 Oct 2021 5:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top