Home > Fact Check > Fact Check: नरेंद्र मोदींची 153 देशांच्या अध्यक्षपदी निवड?

Fact Check: नरेंद्र मोदींची 153 देशांच्या अध्यक्षपदी निवड?

Fact Check: नरेंद्र मोदींची 153 देशांच्या अध्यक्षपदी निवड?
X

नरेंद्र मोदी के स्टेज पर आने का एक वीडियो सोशल मीडिया पर शेयर किया जा रहा है जिसमें दर्शक उनका अभिवादन करते दिख रहे हैं. दावा किया जा रहा है कि नरेंद्र मोदी को '153 देशों का अध्यक्ष' चुना गया है.

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्टेजवर येण्याचा एक व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक नेटिजन्स हा व्हिडिओ शेअर देखील करत आहेत. या व्हिडिओत सामान्य जनता नरेंद्र मोदींना अभिवादन करत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओद्वारे असा दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी यांची '153 देशांच्या अध्यक्ष'पदी निवड केली आहे.
हा व्हिडिओ या दाव्यासह 2018 पासून फेसबtक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


हा व्हिडिओ शेअर करताना वेगवेगळे मजेदार असे Interesting कॅप्शन देखील दिलं आहे. "मोदीजी के विरोधक ये विडियो देख नहीं पाएंगे और मोदीजी के समर्थक इस विडियो को लाइक और शेयर किये बिना निचे नहीं जा पाएँगे"

सोशल मीडियावर हा व्हिडिओ धुमाकूळ घालत असताना अल्ट न्यूजला मोबाईलवर या व्हिडिओची सत्यता पडताळण्याची रिक्वेस्ट आली. त्यानुसार अल्ट न्यूजने या व्हिडिओची सत्यता पडताळली.Fact Check: काय आहे सत्य?

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओची एक फ्रेम यान्डेक्सवर रिवर्स इमेजवर सर्च केली असता या सर्चद्वारे आम्ही युट्यूबवर 2018 मध्ये अपलोड केलेल्या एका व्हिडिओपर्यंत पोहोचलो. ही व्हिडिओ क्लिप नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत युट्यूब अकांऊटवर अपलोड केली होती.हा कार्यक्रम सप्टेंबर 2015 मध्ये लाईव्हस्ट्रीम करण्यात आला होता. जेव्हा नरेंद्र मोदी भारतीय अमेरिकन कम्युनिटी ला कॅलिफोर्नियाच्या SAP सेंटरमध्ये संबोधित करण्यासाठी गेले होते.

बिजनेस स्टॅण्डर्ड च्या रिपोर्टनुसार नरेंद्र मोदी यांच्या वेस्ट कोस्टच्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता. रिपोर्टमध्ये लिहिलंय... 'नवी दिल्ली ते सैन फ्रांसिस्को च्या दरम्यान आठवड्यातून तीन वेळा एअर इंडियाचं फ्लाईट उड्डान करेल'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तासाभराच्या भाषणाच्या शेवटी ही घोषणा केली आहे.

व्हायरल मेसेजमध्ये दुसरा दावा असा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 153 देशांचा अध्यक्ष बनवलं गेलं आहे. हा दावाच मुळात विचित्र आहे. असं कोणतंही पद सध्यातरी जगभरात नाही ज्यात एका देशाचा पंतप्रधान अनेक देशांचा अध्यक्ष बनेल किंवा बनवलं जाईल.

दरम्यान कोराचीची एक 3 वर्षांपूर्वीची जुनी पोस्ट मिळाली ज्यात विचारलं गेलं होतं की, खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असं कुठलं पद मिळालं आहे का? यावरून तर हे स्पष्ट होत आहे की, ही व्हायरल होणारी व्हिडिओ क्लिप जुनी असून ती वारंवार शेअर केली जात आहे.

द क्विंट या वृत्तसंस्थेने एक फॅक्ट चेक देखील पब्लिश केलं होतं. ज्यात ते या व्हायरल होणाऱ्या दाव्याची सत्यता सांगत आहे की, खरंच नरेंद्र मोदी यांना एका फोरमचं अध्यक्ष केलं गेलं आहे. ज्यात 53 देशांचा समावेश आहे.

काय आहे सत्य?

हा जुना व्हिडिओ आहे जो शेअर केला जात असून असा दावा करत आहेत की, नरेंद्र मोदींना 153 देशांचा अध्यक्ष बनवलं गेलं आहे. खरंतर 2015 हा व्हिडिओ ज्यात नरेंद्र मोदी कॅलिफोर्नियामध्ये भारतीय-अमेरिकन समुहाला संबोधित करत होते.

Updated : 24 Jun 2021 5:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top