Home > Fact Check > Fact Check: मॅन हॉलमध्ये पडलेल्या मुलाचा व्हिडिओ खरा आहे का?

Fact Check: मॅन हॉलमध्ये पडलेल्या मुलाचा व्हिडिओ खरा आहे का?

Fact Check: मॅन हॉलमध्ये पडलेल्या मुलाचा व्हिडिओ खरा आहे का?
X

पावसाळा सुरु झाला की अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, त्यातील किती व्हिडीओ खरे असतात. याची खात्री न करता आपण व्हायरल करत असतो. सध्या महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुसळधार पाऊस पडणार असल्याचं सांगितलं आहे. त्यातच मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओ?

या व्हिडिओमध्ये एक मुलगा मॅन होल मध्ये पडताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ मुंबईचा असल्याचा दावा केला आहे. मुंबईमध्ये पावसात अनेक ठिकाणी पाणी साचत तर कुठे खड्डे होतात. अनेकांनी हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर तसेच व्हॉट्सअँप वर 'पावसाळ्यात जरा सांभाळून' असं म्हणत शेअर केला आहे.

व्हिडिओ खरा की खोटा...

जर व्हिडिओ निरखून पहिला तर काही गोष्टी शंकास्पद दिसून येतात. एक तर पाण्यात पडलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही, तो पूर्णपणे काढून टाकला गेला आहे. दुसरं म्हणजे तो व्यक्ती पाण्यात पडण्यापूर्वीच छत्री खाली पडते. तसेच खड्ड्यात पडताना, त्याच्या शरीराची कोणतीच हालचाल होतांना दिसत नाही.

एखादा व्यक्ती पडतांना धडपड करणार नाही हे शक्य नाही. त्यामुळे या व्हिडिओवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं साहजिकच आहे.

एसएम होक्स स्लेयर ने पिछले साल सितम्बर में इसका फ़ैक्ट-चेक किया था और एक वीडियो ट्यूटोरियल भी अपलोड किया जिसमें की मदद से ऐसा वीडियो बनाना सिखाया गया. ये वीडियो आप नीचे देख सकते हैं.

एस एम होक्स स्लेयर यांनी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अशा प्रकारच्या व्हिडिओ बद्दल एड़ोबे आफ्टर इफेक्टच्या मदतीने असे व्हिडिओ कशाप्रकारे बनवले जातात यावर एक व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला होता.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एकंदरीत, शेअर केला जाणारा व्हिडिओ Edit केलेला असल्याचं स्पष्ट होते.

Updated : 12 Jun 2021 1:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top