News Update
Home > Fact Check > पाकिस्तानात लग्नात नाचणाऱ्या लोकांचा व्हिडीओ TV9 भारतवर्षने तालिबान्यांचा आनंदोत्सव म्हणून दाखवला...

पाकिस्तानात लग्नात नाचणाऱ्या लोकांचा व्हिडीओ TV9 भारतवर्षने तालिबान्यांचा आनंदोत्सव म्हणून दाखवला...

पाकिस्तानात लग्नात नाचणाऱ्या लोकांचा व्हिडीओ  TV9 भारतवर्षने तालिबान्यांचा आनंदोत्सव म्हणून दाखवला...
X

अफगाणिस्तानातून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी 11 सप्टेंबर 2021 पर्यंत अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर अफगाणिस्तानवर तालिबानने पुन्हा ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक माध्यमं हे व्हिडीओ सत्य असल्याचं सांगत टीव्हीवर दाखवत आहेत. असाच एक व्हिडीओ टीव्ही 9 भारतवर्षने दाखवला आहे. असॉल्ट रायफलसह नाचणाऱ्या लोकांचा एक व्हिडिओ tv9 भारतवर्ष ने दाखवला आहे. या व्हिडीओचं शिर्षक "तालिबानने मैदान वरदक ताब्यात घेतल्यानंतर उत्सव साजरा केला. मात्र, हा व्हिडिओ चॅनेलच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नंतर काढून टाकण्यात आला आहे.
फेसबुक आणि ट्वीटरवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तसेच या व्हिडिओचे मिम्स देखील बनवले जात आहेत. ज्यामध्ये, लोक वेगवेगळी गाणी टाकून अपलोड करत आहे.

दरम्यान, एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी 19 ऑगस्टला हाच व्हिडिओ ट्वीट केला होता. B R 24.COM या बंगाली वेबसाईटने देखील हा व्हिडिओ याच दाव्यासोबत शेअर केला होता.

अमेरिकन ट्वीटर यूजर केसी डिलननेही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

काय आहे सत्य... ?

गुगल की - वर्ड सर्च केले असता, हा व्हिडिओ यूट्यूबवर २ ठिकाणी असल्याचं पाहायला मिळालं.(पहिला, दुसरा) हे दोनही व्हिडिओ एप्रिलमध्ये अपलोड करण्यात आले होते. पाक मिक्स 2021 या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ अपलोड झाला असून यामध्ये अनेक गाण्यांसोबत व्हिडिओ आहेत, तसेच यामध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा देखील समावेश आहे.

आम्हाला आणखी एक यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ सापडला जो 20 एप्रिल रोजी शेअर केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "बन्नू डीजे" असं लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार इफ्तिखार फिरदौसने टीव्ही 9 वर निशाणा साधत म्हटलं आहे... "अविश्वसनीय एक भारतीय चॅनेल पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या एका लग्नाचा व्हायरल व्हिडिओ दाखवत आहे. लग्नामध्ये नाचणारे मास्करेडिंग करत आहेत. आणि अँकर सांगत आहे की, तालिबानने मैदान वरदक ताब्यात घेतल्यानंतर उत्सव साजरा केला. ही उच्चस्तरीय बकवास आहे."


दरम्यान, व्हिडिओसाठी की-वर्ड सर्च केले असता, खैबर पख्तूनख्वा येथील एक फेसबुक यूजर वहाब पख्तूनने टीव्ही 9 चा एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ निरखून पाहिल्यानंतर, आम्हाला संशय आला की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा निळ्या पठाण सूटमधील माणूस हाच आहे.

दरम्यान, अल्ट न्यूजने फेसबुक मेसेंजरवर त्यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले, "निळ्या रंगाच्या सूटमध्ये मीच आहे. 18 मार्च 2021 रोजी बन्नू जिल्ह्यात माझ्या चुलत भावाच्या लग्नात हा व्हिडिओ माझ्या फोनवरून काढण्यात आला होता. बन्नू पाकिस्तानच्या दक्षिण खैबर पख्तूनख्वा प्रांतात येतं."

निष्कर्श:

एकूणच, टीव्ही 9 भारतवर्षने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर तालिबानी उत्सव साजरा करत असल्याचा खोटा दावा करत मार्चमध्ये पाकिस्तानमधील एका लग्नात बंदुका घेऊन नाचणाऱ्या लोकांचा चार महिन्यांअगोदरचा व्हिडिओ प्रकाशित केला. या संदर्भात alt news ने Fact check केलं आहे.

Updated : 22 Aug 2021 9:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top