300 प्रवाशांना घेऊन जाणारं तुर्की विमान बालबाल बचावलं…

हे जग आता जमीन, पाणी आणि हवेत, कुठेच सुरक्षित राहिलेलं नाही. विमानाच्या लँडींगच्या वेळेत इंधनाने भरलेला टॅँक थेट धावपट्टीवर आणून 300 लोकांचा जीव घेण्याचा अतिरेक्यांचा कट होता. तुर्की एअरलाइनच्या विमानाच्या लँडींगच्या वेळेचा हा थरारक व्हिडीयो, विमान धावपट्टीवर उतरत असताना अचानक इंधनाचा टँक रनवे वर आला आणि थांबला, मात्र निष्णात पायलट ने लगेच टेक ऑफ घेतलं आणि अवघ्या काही इंचाच्या फरकाने हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या लक्षात यायच्या आतच सगळं काही घडलं. सुरक्षा रक्षक आणि कंट्रोल टॉवरच्या अनुमती शिवाय हा टँकर रनवे वर आलाच कसा असा प्रश्न आता नेटवर विचारला जात आहे. अतिरेकी ड्रायवर ला कुठल्या वेळी टार्गेट उडवायचं हे माहित होतं. निष्पाप माणसं-बायका-लहान मुुलं यांचा जीव घ्यायचा होता. या लोकांचा अतिरेकी द्वेष करत असलेल्या कुठल्याच धोरण आणि नेत्यांशी संबंध नव्हता. हे जग सुरक्षित राहिलेलं नाही..
अशा आशयाची पोस्ट तुमच्या मोबाईल वर आली असेल तर ती व्हायरल करण्याआधी सावधान. त्या आधी ही बातमी पूर्ण वाचा..
खरं तर हा व्हिडीयो खरा नाहीय. हे तुर्की विमानाची व्हिडीयो फिल्म नाही. हा आहे एक व्हिडीयो गेम. त्या व्हिडीयो गेम मधली क्लिप सध्या खरी म्हणून व्हायरल करण्यात येत आहे. अतिशय बारकाईने जर का ही क्लिप पाहिली तर लक्षात येईल की हे ऍनिमेशन आहे. अगदी खरं वाटेल असं .
आता ही क्लिप आली कुठून. व्हिडीयो गेम मधली ही क्लिप एका पाकिस्तानी युट्यूब चॅनेल वर पहिल्यांदा अपलोड झाली होती. तिथून ही क्लिप जगभर पसरली आहे.