Home > Fact Check > Fact Check: तालिबानने पंतप्रधान मोदींना धमकी दिली?

Fact Check: तालिबानने पंतप्रधान मोदींना धमकी दिली?

Fact Check: तालिबानने पंतप्रधान मोदींना धमकी दिली?
X


सध्या सोशल मीडियावर तालिबानने पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, ट्विटर यूजर @itsmebonggirl ने हा व्हिडिओ शेअर केला असून तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "तालिबान पंतप्रधान मोदींना युद्धाची धमकी देत म्हणत आहे की, काश्मीर हा अफगाणिस्तानचा भाग असून पश्तुनींचा आहे. ते दावा करत आहेत की त्यांच्याकडे जे काही आहे ते साध्य करतील."



व्हाट्सअँपवर सुद्धा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.




दरम्यान, फेसबुकवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पवन सक्सेना नावाच्या फेसबुक यूजरने लिहिलं आहे की, "ही धमकी भारतासाठी नाही, मोदींसाठी नाही, ही धमकी तुमच्यासाठी आहे, तुमच्या भावी पिढीसाठी आहे. #जागोहिंदूजागो" काही पाकिस्तानी यूजर्सने देखील हा व्हिडिओ याचं दाव्यासह शेअर केला आहे.














काय आहे सत्य...?

दरम्यान, व्हिडिओतील एका फ्रेमचं रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर, हा व्हिडिओ 2019 पासून इंटरनेटवर असल्याचं आम्हाला आढळून आलं. ऑगस्ट 2019 मध्ये यूट्यूबवर अनेकांनी हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि लिहिलं होतं.





अफगाण मुजाहिद्दीन भारताच्या विरोधात आणि पाकिस्तानसोबत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती म्हणतो, "मी अनेक दिवसांपासून ऐकत आहे की भारत पाकिस्तानला युद्धाची धमकी देत आहे. मला भारताच्या हिंदू सरकारला सांगायचे आहे की, आम्ही पाकिस्तानी लष्कर आणि जनतेसोबत आहोत. तुम्ही आमचं काहींच नुकसान करू शकत नाहीत." दरम्यान, २०१९ ला अनेकांनी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला होता. 27 फेब्रुवारी 2019 रोजी सिटी मोबाईल कम्युनिकेशन नावाच्या फेसबुक पेजने तसेच पाकिस्तानी सैनिक जनरल जावेद बाजवा यांच्या एका फॅन पेजने देखील 21 फेब्रुवारी 2019 रोजी हा व्हिडिओ अपलोड केला होता.






मात्र, या व्हिडिओबद्दल कोणताही मीडिया रिपोर्ट सापडला नाही. तसेच व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख सुद्धा मिळाली नाही.


निष्कर्श :

एकंदरीत, हा व्हिडिओ अलीकडचा नसून, २ वर्ष जुना आहे. मात्र, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने भारताला धमकी दिल्याचा दावा करत शेअर केला जात आहे.

या संदर्भात Alt news ने फॅक्ट चेक केलं आहे.https://www.altnews.in/hindi/two-year-old-video-shared-as-taliban-threatening-india/

Updated : 21 Aug 2021 2:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top