Home > Fact Check > Fact Check: ब्रिटीश पोलीस चाबकाने मारत असलेला फोटो भगतसिंग यांचा आहे का?

Fact Check: ब्रिटीश पोलीस चाबकाने मारत असलेला फोटो भगतसिंग यांचा आहे का?

Fact Check: ब्रिटीश पोलीस चाबकाने मारत असलेला फोटो भगतसिंग यांचा आहे का?
X

सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमधील एका व्यक्तीचे हात बांधलेले दिसत आहेत. आणि बाजूलाच एक पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहे. जो त्या बांधलेल्या व्यक्तीला चाबकाने फटके देत आहे. दरम्यान, फोटोसोबत एक दावा केला जात आहे.

फोटोमध्ये मार खात असलेला व्यक्ती भगतसिंग आहेत. ज्यांना ब्रिटिश पोलिस चाबकाने मारत आहेत. व्हायरल होणाऱ्या ग्राफिकसोबत दावा केला जात आहे की, "भगतसिंग यांना स्वातंत्र्यासाठी चाबकाचे फटके मारले जात असल्याचा फोटो त्या वेळच्या वर्तमानपत्रात छापण्यात आला होता, जेणेकरून भारतात अजून कोणी भगतसिंग होऊ नये...

तुमच्याकडे गांधी-नेहरूंचा असा कोणता फोटो आहे का ? मग मी त्यांना कसं काय राष्ट्रपीता मानू? चरख्याने स्वातंत्र्य मिळवून दिलं यावर कसा विश्वास ठेऊ?





2020 मध्ये, ट्विटर यूजर उमंग यांनी हा फोटो भगतसिंग यांचा असल्याचं सांगत ट्विट केला होता.

ट्विटरवर अनेकांनी हा फोटो भगतसिंग यांचा असल्याचं सांगत शेअर केला आहे.











फेसबूक तसेच व्हाट्सअँप वर देखील हा दावा व्हायरल होत आहे.








काय आहे सत्य...?

रिव्हर्स इमेज सर्च केले असता हा फोटो 17 एप्रिल 2019 रोजी सबरंग इंडियाच्या एका आर्टिकलमध्ये सापडला. मात्र, या आर्टिकलमध्ये कुठेही भगतसिंग यांचा उल्लेख नाही. दरम्यान, हा लेख जालियनवाला हत्याकांडाबद्दल आहे. 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायर यांनी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे उपस्थित असलेल्या लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.





यासोबतच, 4 एप्रिल 2019 च्या हिस्ट्री टुडेच्या लेखात सुद्धा हा फोटो पाहायला मिळाला. लेखामध्ये या फोटोबद्दल सांगण्यात आलं आहे की, अमृतसर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीला चाबकाचे फटके मारण्यात आले होते.

या लेखामध्ये किम वॅग्नर यांच्या जालियनवाला हत्याकांडाबद्दल लिहिलेल्या पुस्तकाचा देखील उल्लेख आहे. दरम्यान, किम वॅग्नर यांनी या पुस्तकात सांगितले होते की, हे हत्याकांड हे ब्रिटिश राज पडण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते.

किम वॅग्नर, हे एक ब्रिटिश इतिहासकार आहेत. त्यांनी 22 मे 2018 रोजी 2 फोटो ट्विट केले होते. आणि सांगितले होते की, पंजाबच्या कसूरमध्ये लोकांना सार्वजनिकरित्या चाबकाचे फटके मारण्यात आले. बेंजामिन हॉर्निमनने 1920 मध्ये गुप्तपणे हे फोटो भारतातून आणले होते आणि छापले होते. बेंजामिन हे एक ब्रिटिश पत्रकार आहेत.

दरम्यान, भारतीय इतिहासकार मनन अहमद यांनी 10 फेब्रुवारी 2019 रोजी काही फोटो ट्विट केले होते. ज्यात या फ़ोटोचाही समावेश होता. तर, शिख विद्यार्थी-सैनिकांना सार्वजनिकपणे चाबकाचे फटके मारण्यात आल्याचे या फोटोंसह सांगण्यात आलं होतं.

भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी झाला होता. म्हणजेच 1919 मध्ये भगतसिंग यांचे वय फक्त १२ वर्षे इतकंच असेल. त्यामुळे हे स्पष्ट होते की, ज्या व्यक्तीला ब्रिटिश पोलिसांकडून चाबूककाने मारलं जात होतं ते भगतसिंग नाहीत.

दरम्यान, २०२० मध्येच, द लॉजिकल इंडियन, इंडिया टुडे आणि फॅक्ट क्रेसिंडोने या फोटोबद्दल फॅक्ट चेकिंग रिपोर्ट केलेले आहेत.

निष्कर्श:

एकंदरीत, व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ज्या व्यक्तीला चाबकाने मारलं जात आहे, ते भगतसिंग नाहीत.

या संदर्भात alt news ने फॅक्ट चेक केलं आहे. https://www.altnews.in/hindi/1919-image-shared-with-false-claim-that-bhagat-singh-was-flogged/

Updated : 14 Sep 2021 3:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top