Home > Fact Check > Fact Check: RSS च्या सदस्याने भारताचा तिरंगा जाळला का?

Fact Check: RSS च्या सदस्याने भारताचा तिरंगा जाळला का?

RSS च्या सदस्याने भारताचा तिरंगा जाळला का? काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?

Fact Check: RSS च्या सदस्याने भारताचा तिरंगा जाळला का?
X

देशात सध्या हर घर तिरंगा मोहिम सुरु आहे. त्याच दरम्यान एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ज्या फोटोमध्ये एक व्यक्ती खुर्चीवर बसून भारताचा राष्ट्रध्वज जाळत आहे. व्हायरल झालेल्या फोटोवर, नव्या भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांना भारताचा राष्ट्रध्वज जाळणं सामान्य गोष्ट आहे. असा मजकूर देण्यात आला आहे. तसंच फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती आरएसएसशी संबंधित असल्याचा दावा केला आहे.
पंकज शर्मा यांनी हा फोटो शेअर केला आहे. आणि हा फोटो ट्वीट करताना हे चित्र पाहून सरकारचं रक्त सळसळत नाही का? असा सवाल केला आहे.

ट्विटर यूजर कुमार आंबेडकरवादी आणि इम्रान कमल यांनी देखील हाच फोटो याच दाव्यासह शेअर केला आहे.फॅक्ट चेक...

या संदर्भात Alt News न्यूज ने फॅक्ट चेक केलं आहे. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार व्हायरल फोटो ट्वीटर युजर गिरीश भारद्वाज यांनी 4 एप्रिल 2018 ला ट्विट केला. फोटोमधील व्यक्ती एम प्रभू नावाच्या तामिळनाडूमधील एका शाळेतील शिक्षक आहे. या शिक्षकाने भारताचा झेंडा जाळून सरकारचा निषेध केला होता.या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता 2018 मध्ये 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'च्या एका वृत्तानुसार, व्हिडिओमधील व्यक्ती 34 वर्षीय एम प्रभू असून तो व्यवसायाने एका शाळेत चित्रकला शिकवतो. सदर व्यक्ती 'तमिल देसिया पेरियाक्कम' या तमिळ राष्ट्रवादी संघटनेशीही संबंधित आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कावेरी प्रबंधन बोर्ड (सीएमबी) स्थापना न झाल्यामुळे संतप्त झालेल्या एम प्रभू यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा निषेध करताना भारताचा ध्वज जाळला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

https://dai.ly/x8c2txe


काय आहे सत्य?

4 वर्षापुर्वीचा फोटो आत्ताचा असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे. तसंच वरील तथ्यावरुन हे देखील स्पष्ट होते की तिरंगा जाळणारा व्यक्ती आरएसएसच्या संबंधीत नाही.

या संदर्भात अल्ट न्यूज ने वृत्त दिलं आहे.

https://www.altnews.in/hindi/2018-image-of-tamil-teacher-burning-naional-flag-falsely-shared-as-rss-worker/

Updated : 2022-09-06T14:42:29+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top