Home > Fact Check > मोदी खूप चांगलं काम करत आहेत असं 'गार्डीयन' नं खरच म्हटलयं का?

मोदी खूप चांगलं काम करत आहेत असं 'गार्डीयन' नं खरच म्हटलयं का?

दुस-या कोरोना लाटेत भारतामध्ये आरोग्य आणीबाणी निर्माण झाली असताना सर्व आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देशाचे नेतृत्व असलेल्या नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. अशा बिकट परिस्थितीत 'द डेली गार्डियन' या इंग्रजी वेबसाइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची, कामाची दखल घेणारा एक लेख छापून आला असून सर्व मोदीप्रेमी मंडळींनी तो व्हायरल केला आहे.

मोदी खूप चांगलं काम करत आहेत असं गार्डीयन नं खरच म्हटलयं का?
X

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मेहनत घेत आहेत. संकटसमयी संयमाने काम करत आहे, असे 'द डेली गार्डियन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या संपादकीय लेखात म्हटले आहे.

https://thedailyguardian.com/pm-modi-has-been-working-hard-dont-get-trapped-in-the-oppositions-barbs/amp/?__twitter_impression=true

'द डेली गार्डियन' या इंग्रजी वेबसाइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची, कामाची दखल घेणारा एक लेख छापून आला आहे.

या लेखाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बहुतांश भाजप नेत्यांना हा लेख आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर सोशल मीडियावर एका वेगळ्या चर्चेलाही सुरूवात झाली आहे.

Raghubar Das (@dasraghubar) Tweeted:

PM MODI HAS BEEN WORKING HARD; DON'T GET TRAPPED IN THE OPPOSITION'S BARBS - The Daily Guardian

https://thedailyguardian.com/pm-modi-has-been-working-hard-dont-get-trapped-in-the-oppositions-barbs/https://twitter.com/dasraghubar/status/1391993677845868547?s=२०


Kiren Rijiju (@KirenRijiju) Tweeted:

I just saw PM MODI HAS BEEN WORKING HARD; DON'T GET TRAPPED IN THE OPPOSITION'S BARBS - Click to see also ☛ https://t.co/eqwxr5s4jQ


पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मेहनत घेत आहेत, विरोधी पक्षांच्या जाळ्यात अडकू नका. देशाला असे पंतप्रधान लाभलेत जे संकटसमयी शांतपणे आपले काम करत आहेत आणि कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देण्यापासून ते दूर आहेत. कारण या सर्व गोष्टींसाठी ही वेळ योग्य नाही. ते आपले लक्ष आणि ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी वापरत आहेत तसेच दुप्पटीने काम करत आहेत, असे नमूद करत इतरांप्रमाणेच त्यांनीदेखील 'क्राय बेबी' बनून प्रश्नांचीच चर्चा केली

तर उत्तरे कोण शोधणार, अशी विचारणा या लेखातून करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे भाजपधर्जिन्या या संकेत स्थळावर लेख प्रसिद्ध होताच सर्व केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या आयटी सेलच्या लोकांनी हा लेख व्हायरल करून जगभरामध्ये मोदींची प्रतिमा वाढत असल्याचा दावा केला आहे.

मोठ्या प्रमाणात हा कौतुक करणारा लेख वायरल झाल्यानंतर इंग्लंडमधील खऱ्या 'द गार्डियन' ला देखील याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी ट्विट करून आमची जगात इतरत्र कुठेही शाखा नाही केवळ नाम ) साधर्म्य लक्षात घेऊन कुणी बुद्धीभेद करत असेल तर आमचा त्याच्याशी संबंध नाही,असे स्पष्टीकरण दिले आहे.

सर्व केंद्रीय मंत्री आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी डेली गार्डन म्हणजेच द गार्डियन असल्याचा दावा करत मोदींची जगभरामध्ये स्तुती केल्याचा खोटा दावा केल्यानंतर तो 'द-गार्डियनने' च‌ तो खोटा ठरवला आणि त्यानंतर नेटिझ्स हे मात्र सर्व भाजप मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची खिल्ली उडवत वेगळे मीम्स सादर करत भाजपच्या दाव्याची पोलखोल केली आहे.


'द डेली गार्डियन' काय आहे?

'द डेली गार्डियन' नावाचं एक संकेत स्थळ असून

ते इंग्लंडमधील 'द गार्डियन' या प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या नावाशी साधर्म्य दाखवणारे आहे.

द डेली गार्डियन' हे ITV नेटवर्क या कार्तिकेन शर्मा यांच्या मालकीचे संकेतस्थळ असून हे हरियाणातील राजकीय नेते विनोद शर्मा यांचे पुत्र आहेत हा ग्रुप न्यूजेक्स टीव्ही आणि संडे गार्डियन साप्ताहिक अशी स्थानिक वर्तमानपत्रे चालवतो.


मोदींची स्तुती करणाऱ्या लेखाचे लेखक कोण?

'द डेली गार्डियन' या मोदींवर स्तुतिसुमनं उधळणाऱ्या संपादकीय लेखाचे लेखक आहेत सुदेश वर्मा. हे लेखक भाजपच्या राष्ट्रीय मीडिया टीमचे सदस्य असून अनेक टीव्ही चॅनलच्या माध्यमातून भाजपच्या प्रवक्त्या ची भूमिका वठवत असतात. सुदेश वर्मा यांनी यापूर्वी 'नरेंद्र मोदी: गेमचेंजर' नामक पुस्तकाचे लेखन देखील केले आहे.

द गार्डीयनच्या धर्तीवर अनेक परदेशी वृत्तपत्र आणि संकेतस्थळांशी नामसाधर्म्य असणारी देशी भाजपीय संकेतस्थळं निर्माण करण्यात आलीत.
आज तक यांनी यापूर्वी ट्विट केले होते की फिलिपिन्सच्या एका मीडिया हाऊसने पंतप्रधान मोदींचा लेख लिहिला आहे, ज्यात त्यांचे कौतुक केले गेले आहे. एक फिलिपिनो मीडिया वेबसाइट आहे जी याच नावाने अस्तित्वात आहे, डेली गार्डियन. नंतर, आज तक यांनी हे ट्विट हटवले, तर लेख अजूनही आहे आणि मथळ्यामध्ये फक्त एक लेख इंग्रजी वेबसाइटवर प्रकाशित झाल्याचा उल्लेख आहे आणि फिलीपिन्स हा शब्द या लेखातून पूर्णपणे वगळला आहे. त्याचप्रमाणे 'ऑस्ट्रेलिया टुडे' नावाची आणखी एक वेबसाइट आहे.

साइटच्या ट्विटर बायो मध्ये "ऑस्ट्रेलिया आणि जगाच्या बातम्या आणि भुमिका बहुराष्ट्रीय सांस्कृतिक समुदायांवर केंद्रित आहेत." वेबसाइटचे ट्विटर अकाउंट जानेवारी 2021 मध्ये तयार केले गेले होते. बहुतेक लेख आणि प्रचार उजव्या विचारसरणीतील वैचारिकांमध्ये लोकप्रिय आहे;.

उदाहरणार्थ, १२ मे रोजी प्रकाशित झालेल्या बातमीचे शीर्षक आहे, "कोविड -१९ व्यतिरिक्त, भारत गिधाड पत्रकारांशीही लढा देत आहे, जे साथीच्या रोगांपेक्षा निराशा पसरवत आहेत". व्हॉइस-लुकअप वर वेबसाइटच्या तपशीलांचा शोध घेतला असता आयपी ठिकाण न्यू साउथ वेल्स, सिडनी, ऑस्ट्रेलिया आहे आणि जिथर्थ जय भारद्वाज या नावाने नोंदणीकृत आहे. आम्ही जितरथ जय भारद्वाजच्या ट्विटर प्रोफाइलकडे पाहिले आणि त्यांना कपिल मिश्रांना फॉलो केले आहे.

त्याने यापूर्वी न्यूजएक्स, न्यूज 18 इंडिया आणि झी न्यूजमध्ये काम केल्याचेही त्यात नमूद केले आहे. ऑस्ट्रेलियन पत्रकार जेम्स ओटेन यांनी ट्विटरवर माहिती दिली की ही वेबसाइट ऑस्ट्रेलियन बातमीपत्र नाही.

त्यांनी ट्वीट केले की, "हे वास्तव ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र नाही. परंतु व्हॉट्सअॅपवर वायरल झाल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच नरेंद्र मोदींचे कौतुक करणारे आणि पत्रकारांनी कोरोनव्हायरसवरील त्यांच्या भूमिकेबद्दल टीका करणारे हे दोन लेख केवळ प्रचार आणि प्रपोगंडा आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार भाजप आणि आयटीसेल कडून देशात आणि परदेशात अनेक दिग्गज वृत्तसंस्थांची साधर्म्य दाखवणारी संकेतस्थळं निर्माण केली असून ती भाजपधर्जिनं प्रचार साहीत्य तयार करुन एकाच वेळी टुलकिटच्या माध्यमातून प्रसारीत करुन भारतीय मनाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतात.


Updated : 2021-05-28T19:54:29+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top