Home > Fact Check > पाकिस्तान क्रिकेट टीमच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या श्रीनगर मेडिकल कॉलेजच्या 100 विद्यार्थिनींची डीग्री रद्द?

पाकिस्तान क्रिकेट टीमच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या श्रीनगर मेडिकल कॉलेजच्या 100 विद्यार्थिनींची डीग्री रद्द?

पाकिस्तान क्रिकेट टीमच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या श्रीनगर मेडिकल कॉलेजच्या 100 विद्यार्थिनींची डीग्री रद्द?
X

24 ऑक्टोबर रोजी झालेल्या टी-20 विश्वचषक भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान ने भारताचा पराभव केला. दरम्यान या विजयानंतर काश्मीरमधील श्रीनगर येथील मेडिकल कॉलेजमध्ये कथितरित्या पाकिस्तान समर्थक https://youtu.be/Gsqs3tZK6xg घोषणा दिल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. यासोबतच, श्रीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील 100 विद्यार्थिनींच्या पदव्या सरकारने रद्द केल्याचा दावा देखील सोशल मीडियावर केला जात आहे.

'पूजा हिंदू सनातनी बेटी' या ट्विटर युजरने हा दावा केला आहे. दाव्यासह एक फोटो देखील शेअर केला गेला आहे. ज्यामध्ये काही बुरखा घातलेल्या महिला दिसत आहेत. तसेच, या ट्विटला आत्तापर्यंत 1800 पेक्षा जास्त वेळा रिट्विट केले गेले आहे.

न्यूज 18 इंडियाच्या ब्रॉडकास्टचा एक व्हिडिओ देखील याच दाव्यासह शेअर केला जात आहे. परंतु व्हिडिओमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पदव्या रद्द करण्याबाबत काहीही नमूद केलेले नाही.

न्यूज१८ च्या या व्हिडिओमध्ये, लिहिण्यात आलं आहे की, "पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या मुली", आणि "गर्ल्स हॉस्टेलमध्ये पराभवाचा उत्सव" "पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा". याशिवाय, व्हिडिओमध्ये अँकर सांगत आहे की, पाकिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्या लोकांवर UAPA गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा दावा ट्वीटर आणि फेसबुकवर व्हायरल आहे. तसेच, व्हॉट्सअॅपवर देखील मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

काय आहे सत्य...? What is reality?

दरम्यान या दाव्याचं पुष्टीकरण करणारा कोणताही रिपोर्ट कोणत्याही मीडियाने प्रसिद्ध केलेला नाही. दरम्यान, आम्ही काही कीवर्ड सर्च केले असता आम्हाला कोणताही अहवाल सापडला नाही. ज्यामध्ये अशा कोणत्याही निर्णयाचा उल्लेख आहे.

याशिवाय, कोणत्याही क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मूल्यमापनानंतरच संबंधित पदवी मिळते. वैद्यकीय विद्यार्थ्यांची पदवी रद्द करण्यात आल्याचे दाव्यात स्पष्टपणे लिहिले आहे. मात्र, जर हे विद्यार्थी असतील तर त्यांना पदवी कशी मिळणार?

मात्र, श्रीनगरमधील मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर UAPA गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासोबतच कॉलेज प्रशासनाविरुद्ध देखील UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, "जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स श्रीनगर (SKIMS) सौरा वसतीगृहात राहणारे विद्यार्थी, कॉलेज व्यवस्थापन आणि वसतिगृह वॉर्डन यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत."

रिपोर्टनुसार, जम्मू-काश्मीर स्टुडंट्स युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते नासिर खुहमी यांनीही या कारवाईवर टीका केली आहे. नासिर खुहमी यांनी, विद्यार्थी माफीनामा लिहिण्यास तयार आहेत. मात्र, असं केल्याने कॉलेज प्रशासन त्यांना बरखास्त करेल. अशी भीती त्यांना होती. दरम्यान, काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही या कारवाईला विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, SKIMS कॉलेजशी संपर्क साधला. सध्या तरी विद्यार्थ्यांबाबत असा कोणताही निर्णय झालेला नाही, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. दाव्यासोबत व्हायरल होत असणारा बुरखा घातलेल्या महिलांचा फोटो कधीचा आहे?

रिव्हर्स इमेज सर्च केले असता आम्हाला हा फोटो 2017 च्या एका ब्लॉगमध्ये सापडला. 'इंडिया न्यू इंग्लंड न्यूज' नावाच्या वेबसाइटने 12 नोव्हेंबर 2017 रोजी हा फोटो उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातील फातिमा गर्ल्स इंटर कॉलेजचा सांगत शेअर केला होता. दुसर्‍या एका वेबसाइटने देखील हा फोटो नोव्हेंबर 2017 मध्ये उत्तर प्रदेशचा असल्याचं सांगत शेअर केला होता.

निष्कर्ष:

एकूणच, पाकिस्तान क्रिकेट टीमच्या विजयाचा आनंद साजरा केल्याने श्रीनगर मेडिकल कॉलेजच्या 100 विद्यार्थिनींची डीग्री रद्द केल्याचा दावा खोटा आहे.

या संदर्भात Alt News ने Fact Check केलं आहे. https://www.altnews.in/fact-check-srinagar-medical-college-girls-degree-canceled-false-claim/

Updated : 7 Nov 2021 2:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top