Home > Fact Check > Fact Check : स्मृती इराणींचं राहुल गांधींबद्दलचं ते वक्तव्य खोटं?

Fact Check : स्मृती इराणींचं राहुल गांधींबद्दलचं ते वक्तव्य खोटं?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कर्नाटकमध्ये एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी स्वामी विवेकानंद हे गांधी घराण्याचे सदस्य नसल्याने त्यांच्या स्मृतींना वंदन केलं नाही असा दावा केला होता तो खरा आहे की खोटा जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचं हे फॅक्ट चेक!

Fact Check : स्मृती इराणींचं राहुल गांधींबद्दलचं ते वक्तव्य खोटं?
X

गेल्या ८ दिवसांपासून म्हणजेच ७ सप्टेंबर पासून काँग्रेसच्या देशव्यापी भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथुन या भारत जोडो यात्रेला राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरूवात झाली. त्यावेळी कन्याकुमारी येथील स्मृती स्थळामध्ये जाऊन त्यांनी स्वामी विवेकानंद यांना नमन केलं नाही असा दावा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकारला ३ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल बंगळुरूच्या डोड्डाबल्लापुरा इथे झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. स्वामी विवेकानंद हे गांधी घराण्यातील नाहीत म्हणुन राहुल गांधी यांनी त्यांनी प्रणाम केला नाही असा दावा त्यांनी केला आहे.

YOYO TV Kannada यु ट्यूब चॅनलवर असलेल्या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी यांचं भाषण आहे आणि त्यांच्या भाषणात व्हिडीयोच्या ४६ मिनिट ४५ व्या सेकंदा पासून त्या म्हणतात, "आज मी काँग्रेस कुटूंबाला विचारू इच्छिते की तुम्ही भारताला जोडणारी यात्रा करत आहात. अरे मग कन्याकुमारी वरून चालता चालता कमीत कमी स्वामी विवेकानंदांना प्रणाम तरी करायचा होता. पण राहुल गांधी तसं नाही करणार कारण स्वामी विवेकानंद हे राष्ट्रसंत आहेत. गांधी कुटूंबाचे सदस्य नाहीत."

काँग्रेसचं अधिकृत मिडीय़ा प्लॅटफॉर्म INC TV आणि इतर काँग्रेस नेत्यांनी स्मृती इराणी यांच्या या वक्तव्याला खोटं सिध्द करत एक व्हिडीओ प्रसिध्द केला आहे. ज्यात राहुल गांधी हे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला वंदन करून तिला प्रदक्षिणा घालत आहेत. याच सोबत काँग्रेस नेत्यांनी वृत्तसंस्था एएनआय चं एक ट्विट सुध्दा शेअर केलं आहे. ज्यात राहुल गांधींची विवेकानंद स्मृती स्थळाबाबतची बातमी आहे. युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत स्मृती इराणींना खोटं ठरवलं आहे. त्यांनी Chal Jhoothi...इतना 'Silly' झूठ बोलते हुए शर्म नही आती? असं म्हणत स्मृती इराणींचा भाषणातला व्हिडीओ आणि राहुल गांधींची बातमी शेअर केली आहे.

काँग्रेस चं अधिकृत युट्यूब चॅनल वर देखील ७ सप्टेंबरला याचा व्हिडीओ अपलोड केला गेला आहे. ज्यात राहुल गांधी हे स्वामी विवेकानंद यांना वंदकन करून प्रदक्षिणा घालत आहेत.

फॅक्ट चेक : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं नाही असं खोटा दावा केला आहे हे सिध्द झालं आहे.

या संदर्भात अल्ट न्युज ने फॅक्ट चेक केलं आहे.

Updated : 15 Sep 2022 3:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top