Home > Fact Check > Fact Check : शाहरूख खान ने Pathan ची कमाई पाकिस्तानच्या NGO ला दिली का ?

Fact Check : शाहरूख खान ने Pathan ची कमाई पाकिस्तानच्या NGO ला दिली का ?

Fact Check : शाहरूख खान ने Pathan ची कमाई पाकिस्तानच्या NGO ला दिली का ?
X

सोशल मीडियावर बीबीसी हिंदी चा एक कथित ट्विटचा स्क्रीनशॉट वायरल झाला. या ट्विटच्या नुसार अभिनेता शाहरूख खानने म्हटलंय की, “ पाकिस्तान त्याच दुसरं घर आहे आणि तो आपल्या येणारा चित्रपट पठाण (Pathan) ची पहिल्या दिवसाची कमाई पाकिस्तानच्या एका NGO ला दान करेल”. शाहरूखचा पठाण चित्रपटातील सहअभिनेता जॉन अब्राहम यानेही शाहरूखच्या दान करण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर अभिनेत्री दीपिका पादुकोण म्हणाली की, “ती सोशल मीडियावरील बॉयकॉट गँग ला घाबरत नाही”. ट्विट मध्ये पुढे म्हटलंय की, “ शाहरूख खानचं मोठं वक्तव्य :-पाकिस्तान माझं दुसरं घर, पठाण चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई पाकिस्तानच्या NGO ला दान करणार”.

भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) चा कार्यकर्ता विकास अहिर ने #BoycottBollywood हा हॅशटॅग वापरत या ट्विटचा स्क्रीनशॉट शेयर केला आणि विचारलं की, हे खरं आहे काय ?

Fact Check :

वायरल स्क्रीन शॉट्स ला व्यवस्थित पाहिल्यानंतर खाली ‘Twitter for OKSatire’ लिहिलेलं आहे. या स्क्रीन शॉटला काही फोटोंमध्ये क्रॉप करण्यात आलं आहे. खाली ऑल्ट न्यूजने एका टेक्स्टला हाईलाईट केले आहे.
याविषयी पुढे पडताळणी केली असता ऑल्ट न्यूजला OK Satire नामक व्यंग्य/पैरोडी लेबल असलेले फेसबूक पेज आढळले. या पेज च्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलंय, “पैरोडी ट्विट्स जे खरे वाटतात”. ऑल्ट न्यूज ला पुढे आढळले की, OK Satire ने या वायरल स्क्रीन शॉट ला आपल्या फेसबूक पेजवर १५ डिसेंबर ला अपलोड केले होते. सोशल मीडियावर अशा प्रकारचा फोटो असण्याचं हे पहिलं उदाहरण आहे.
ऑल्ट न्यूज ने या वायरल ट्विट या ट्विट संदर्भात बीबीसी हिंदी च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर जाऊन सर्च केले. मात्र, ऑल्ट न्यूज ला अशाप्रकारचे कुठलेही ट्विट आढळून आले नाही. याशिवाय शाहरूख खान द्वारा पठाण चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई पाकिस्तानच्या NGO ला दान करण्यासंदर्भातील कुठलीही बातमी आढळली नाही.
एकंदरीतच, बीबीसी हिंदी च्या नावाने एका ट्विटचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर वायरल होतोय. ज्यात लिहिलंय की शाहरूख खान आपला चित्रपट पठाण ची पहिल्या दिवसाची कमाई एका पाकिस्तानी NGO ला दान करणार आहे. कित्येक युजर्स ने #BoycottBollywood या हॅशटॅग सोबत तो स्क्रीनशॉट शेयर केला. प्रत्यक्षात तो स्क्रीनशॉट फेसबूकवरील एका व्यंगात्मक पेजवर अपलोड करण्यात आला होता.

Updated : 25 Feb 2023 2:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top