Home > Fact Check > Fact Check : लोकप्रियतेच्या बाबतीत राहुल गांधी यांनी मोदींना मागे टाकले का?

Fact Check : लोकप्रियतेच्या बाबतीत राहुल गांधी यांनी मोदींना मागे टाकले का?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेत मोठा प्रतिसादही मिळत आहे. याच दरम्यान राहुल गांधी यांची लोकप्रियता पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा जास्त झाल्याचा दावा करत एक ग्राफिक्स व्हायरल होत आहे. पण खरंच राहुल गांधी यांची लोकप्रियता पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा वाढली आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे फॅक्ट चेक...

Fact Check : लोकप्रियतेच्या बाबतीत राहुल गांधी यांनी मोदींना मागे टाकले का?
X

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. तामिळनाडू, केरळ मार्गे भारत जोडो यात्रा कर्नाटकात पोहचली आहे. या यात्रेत राहुल गांधी यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सोशल मीडिया समन्वयक अरुण रेड्डी यांनी 26 सप्टेंबर रोजी एक स्क्रीनशॉट ट्वीट केला. ज्यामध्ये भारतीय राजकारणात काही प्रमुख नेत्यांची तुलना करणारे टाइम्स नाऊचे ग्राफिक्स दिसत होते. यामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकल्याचा दावा करण्यात आला होता. पण राहुल गांधी यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान मोदी यांना मागे टाकले आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे फॅक्ट चेक...

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सोशल मीडिया समन्वयक अरुण रेड्डी यांनी 26 सप्टेंबर रोजी टाइम्स नाऊ या चॅनलचा स्क्रीनग्रॅब ट्वीट केला. ज्यामध्ये राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमख अखिलेश यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियतेची तुलना करण्यात आली होती. त्यापैकी 66 टक्क्यांसह राहु गांधी प्रथम क्रमांकावर, 15 टक्क्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या स्थानावर, 7 टक्क्यांसह ममता बॅनर्जी तिसऱ्या स्थानावर तर 5 टक्क्यांसह अखिलेश यादव चौथ्या स्थानावर आणि 4 टक्क्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पाचव्या स्थानावर असल्याचा दावा करण्यात आला होता. सोबतच या कार्यक्रमाचे निवेदक टाइम्स नाऊचे आनंद नरसिम्हा दिसत आहेत. हा स्क्रीनशॉट राहुल गांधी यांचे कौतूक करत शेकर करण्यात येत आहे.

राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेच्या संदर्भाने हा स्क्रीनशॉट शेअर करण्यात येत आहे. ही भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर दरम्यान 150 दिवसांची असणार आहे. ही यात्रा सुरुवातीपासूनच विरोधी पक्षाच्या निशाण्यावर आहे. त्यातच या यात्रेबाबत अनेक भ्रम पसरवले जात आहेत. त्याबाबत अल्ट न्यूजने काही फॅक्ट चेक केले आहेत.

राजस्थान युथ काँग्रेसने एक फोटो ट्वीट करत राहुस गांधी यांची स्तुती केली आहे. ( ट्वीटची अर्काइव लिंक)ट्वीटर हँडल @CSBSiinm ने ट्वीट केलेला फोटो काँग्रेस महासचिव दिग्वीजय सिंह यांनी ट्वीट केला आहे.
ट्वीटर हँडल '@UnitedWithINC'ने सुध्दा हाच फोटो ट्वीट केला आहे. (अर्काइव्ह लिंक)

फेसबुकवर हा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.सत्य पडताळणी (What is Fact )

मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांनी लक्षात घ्यायला हवे की, या स्क्रीनशॉटमध्ये दिसणारे आनंद नरसिम्हा हे आधी टाइम्स नाऊचे अँकर होते. मात्र सध्या आनंद नरसिम्हा न्यूज 18 मध्ये सिनियर अँकर पदावर काम करत आहेत. त्यामुळेच अल्ट न्यूजला हा स्क्रीनशॉट जुना असण्याची शंका आली.
मॅक्स महाराष्ट्रने हा फोटो रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केला. त्यामध्ये द टाइम्स ऑफ इंडियाचा 2017 चा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टमध्ये टाइम्स नाईचे फुटेज एम्बेड केले आहे.


पुढे दिलेल्या फोटोमध्ये मुळ स्क्रीनशॉटची तुलना केली आहे. ज्यामध्ये दोन्ही फोटोतील फरक स्पष्टपणे दिसून येत आहे.
द टाइम्स ऑफ इंडियाने हे हा व्हिडीओ 18 डिसेंबर 2017 मध्ये अपलोड केला आहे.तसेच या व्हिडीओ रिपोर्टमध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणूकीची चर्चा केली जात आहे.

2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूकीचा निकाल 18 डिसेंबर 2017 मध्ये जाहीर झाला होता. त्यामध्ये भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळीच हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूकीचे निकालही जाहीर करण्यात आले होते. ज्यामध्ये भाजपला 44 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसच्या जागांची संख्या 21 होती.

वरील सर्व बाबींवरून 2017 मध्ये गुजरात-हिमाचल विधानसभा निवडणूकीच्या काळात टाइम्स नाईने प्रसारित केलेल्या कार्यक्रमातील एक स्क्रीनशॉट सध्या एडिट करून व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काँग्रेसचे अनेक समर्थक राहुल गांधी यांचे कौतूक करत हा स्क्रीनशॉट व्हायरल करत आहेत. यावरून हे स्पष्ट होत आहे की, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा लोकप्रिय असल्याचा दावा करण्यात येत आहे तो फेक आहे. तसेच जुना स्क्रीनशॉट एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे.


या विषयावर अल्ट न्यूजने सविस्तर फॅक्ट चेक केले आहे. ते वाचण्यासाठी क्लिक करा.

मॅक्स महाराष्ट्र आवाहन- कोणत्याही दाव्याची सत्यता पडताळल्याशिवाय फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज फॉरवर्ड किंवा शेअर करू नये.

Updated : 2022-10-07T15:39:31+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top