Home > Fact Check > कोळसा टंचाई: प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट केला 8 महिन्यापुर्वीचा कोळसा ट्रेनचा व्हिडिओ

कोळसा टंचाई: प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट केला 8 महिन्यापुर्वीचा कोळसा ट्रेनचा व्हिडिओ

कोळसा टंचाई: प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट केला 8 महिन्यापुर्वीचा कोळसा ट्रेनचा व्हिडिओ
X

राज्यसभेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रेनचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. ज्यात त्यांनी दावा केला आहे की, "पॉवर प्लांटला कोळसा पुरवठा करण्यासाठी चार इंजिन असलेली 4 किमी लांबीची रेक ट्रेन "युद्धपातळीवर" धावत आहे."

दरम्यान, देशात सध्या कोळश्याची टंचाई असल्याच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. कोळसा टंचाई असल्यामुळे देशावर वीज संकट कोसळू शकते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या दरम्यान हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

न्यूज 18 ने जावडेकरांच्या ट्विटवर आधारित एक रिपोर्ट केला आहे. रिपोर्टनुसार, "भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच चार इंजिनांसह चार किलोमीटर लांबीची ट्रेन चालवली आहे.'' असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.आज तकने देखील या ट्विटवर आधारित एक लेख प्रकाशित केला आहे.हा व्हिडिओ भाजपचे दिल्ली सरचिटणीस कुलजित सिंग चहल आणि यूपी भाजपचे प्रवक्ते राजेश चौधरी यांनीही याच दाव्यासह शेअर केला आहे.अभिनेता विंदू दारा सिंहनेही हा व्हिडिओ ट्विट केला आहे.


दरम्यान, भाजप समर्थक असलेले ट्विटर हँडल @RenukaJain6, @PAlearner आणि @KharkhariAmit यांनी देखील हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांच्या या ट्विटला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडिओ फेसबुकवरही मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. Fun Clovita नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या या व्हिडिओला साधारण 60,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

काय आहे सत्य?

8 महिने जुना व्हिडिओ

IRTS असोसिएशनने हा व्हिडिओ 6 जानेवारी 2021 रोजी ट्विट केला होता.त्यावेळी माध्यमांमध्येही याची बातमी आली होती. 7 जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या 'नई दुनिया' च्या एका रिपोर्टनुसार, चार मालगाड्यांमध्ये 16,000 टन कोळसा भरून कोरबा ते भिलाई दरम्यान 280 किमीचा प्रवास केला होता. जो भारतीय रेल्वेसाठी एक नवीन विक्रम होता. ट्रेनमध्ये चार कोळसा भरलेले रॅक होते. ज्यातून कोळसा वेगवेगळ्या पॉवर प्लांट्समध्ये वितरित केला गेला होता. यातील एक रॅक नागपूर विभागाअंतर्गत जबलपूरजवळ मौदा NTPC ला पाठवण्यात आला. दुसरा रॅक गुजरातमध्ये TPHS आणि ESWS ला पाठवण्यात आला आणि उर्वरित महाराष्ट्रातील BRD डहाणू रोडला पाठवण्यात आले.

दरम्यान, त्याच दिवशी, रेल्वे मंत्रालयाकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आले होते, त्यामध्ये ट्रेनच नाव 'सुपर शेषनाग' म्हणून सांगण्यात आलं.


मात्र, प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केलेला व्हिडिओ जानेवारीमध्ये पोस्ट केलेल्या व्हिडिओसारखाच आहे. जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर, दोन्ही व्हिडिओमध्ये प्लॅटफॉर्मवरील घड्याळात 6.35 मिनिटे वेळ झालेली दिसून येते.


निष्कर्ष:

एकूणच, कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचा आठ महिने जुना व्हिडिओ भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी सध्याच्या कोळशाच्या कमतरतेदरम्यान सरकार वीज प्रकल्पांना कोळसा पुरवत असल्याच सांगत ट्विट केला आहे.

या संदर्भात अल्ट न्युजने Fact Check केलं आहे.

Updated : 23 Oct 2021 7:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top