Home > Fact Check > 3 लाखांच्या कर्जासाठी मोजावे लागणार 36 हजार 500 रुपये’ व्हायरल दाव्यामागचं सत्य काय?

3 लाखांच्या कर्जासाठी मोजावे लागणार 36 हजार 500 रुपये’ व्हायरल दाव्यामागचं सत्य काय?

गेल्या काही दिवसांपासून आधार कार्ड दाखवून प्रत्येक जण 3 लाख रुपयांचे लोन मिळवू शकत असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच यासाठी 36 हजार 500 रुपयांचा चार्ज असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा दावा खरा आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक....

3 लाखांच्या कर्जासाठी मोजावे लागणार 36 हजार 500 रुपये’ व्हायरल दाव्यामागचं सत्य काय?
X

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोदी सरकारच्या विविध योजनासंदर्भात मेसेज व्हायरल होत आहेत. त्यातच आता मुद्रा योजनेंतर्गत आधार कार्डवर ३ लाखांचे कर्ज मिळणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यासाठी 36 हजार 500 रुपयांचा चार्ज भरावा लागणार असल्याचे या व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, मुद्रा योजनेंतर्गत लोन मंजूर होत आहे.

पुढे या व्हायरल फोटोत म्हटले आहे की, मुद्रा जगात आपले स्वागत आहे. आम्ही आपणांस कळवू इच्छितो की आपले 3 लाख रुपयांचे लोन मंजूरीच्या प्रोसेसमध्ये आहे. त्यासाठी आपल्याला 2 टक्के व्याज द्यावे लागेल.

यामध्ये EMI आणि लोनची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये 3 लाख रुपयांच्या कर्जासाठी प्रत्येक महिन्याला 8 हजार 592 रुपये हप्ता असेल, असंही यामध्ये म्हटलं आहे. तसेच हे कर्ज तीन वर्षांसाठी असेल, अशी माहिती व्हायरल फोटोत देण्यात आली आहे.

या फोटोची सत्यता तपासण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रने पीआयबी फॅक्ट चेक या ट्विटर अकाऊंटला भेट दिली. यावेळी हा दावा फेक असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. तसेच Mudra.Org या वेबसाईटवरही

पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत 3 लाखांच्या कर्जावर 36 हजार 500 लिगल इन्शुरन्स असल्याचा दावा फेक असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. त्यामुळे या व्हायरल होणाऱ्या दाव्यावर विश्वास ठेऊ नये.

Updated : 17 Aug 2023 9:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top