Home > Fact Check > Fact Check: अमरावतीमध्ये 2 दहशतवाद्यांना बॉम्बसह पकडले?

Fact Check: अमरावतीमध्ये 2 दहशतवाद्यांना बॉम्बसह पकडले?

Fact Check: अमरावतीमध्ये 2 दहशतवाद्यांना बॉम्बसह पकडले?
X

सोशल मीडियावर अमरावतीमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस बसमधून मास्क घातलेल्या 2 लोकांना पकडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना अमरावती मधील बसस्थानकावरून 2 दहशतवाद्यांना बॉम्बसह पकडण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. संतोष राष्ट्रवादीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

इतर फेसबुक युजर्सनीही हाच दावा करत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.








हा व्हिडीओही याच दाव्याने ट्विटरवर ट्विट करण्यात आला आहे.

काही यूट्यूब चॅनलनेही हाच दावा करत हा व्हिडिओ अपलोड केला आहे.

काय आहे सत्य?

या संदर्भात Alt News ने की वर्ड टाकून सर्च केले असता YouTube वर एक व्हिडीओ सापडला. व्हायरल व्हिडिओचा काही भाग या रिपोर्टमध्ये दिसत आहे. 'गावरान 90' या यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ 14 ऑक्टोबर रोजी परतवाडा बसस्थानकावर झालेल्या मॉकड्रील चा असल्याचा म्हटलं आहे.

विदर्भ प्रभात नावाच्या यूट्यूब चॅनलने या व्हिडिओबाबतचा व्हिडिओ अपलोड केला आहे. 8 मिनिटांच्या या अहवालात 5 मिनिटे 35 सेकंदांनी पोलिसांचे म्हणणे ऐकू येईल. परतवाडा पोलिसांनी ही मॉक ड्रील केल्याचं पोलीस सांगत आहेत.


या व्हिडीओची सत्यता आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी परतवाडा पोलिसांशी संपर्क साधला असता परतवाडा पोलिस निरीक्षक एस मानकर यांनी, "बसस्थानकावरून दहशतवादी पकडले गेल्याचे कोणतेही प्रकरण नाही. 14 ऑक्टोबर ला परतवाडा ग्रामीण पोलिसांनी एक मॉक ड्रील केले होते. त्याचा हा व्हिडीओ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

निष्कर्ष:

एकूणच अमरावतीच्या बस डेपोतून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी करण्यात आलेल्या मॉक ड्रीलचा व्हिडिओ खरा असल्याचं सांगत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहे.

या संदर्भात Alt news ने फॅक्ट चेक केलं आहे. https://www.altnews.in/hindi/video-of-mock-drill-amravati-maharashtra-shared-as-real/

Updated : 2 Nov 2021 3:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top