Home > Fact Check > Fact Check: मोदींनी अयोध्येच्या जिर्णोद्धाराचे काम पाहणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे दर्शन घेतले

Fact Check: मोदींनी अयोध्येच्या जिर्णोद्धाराचे काम पाहणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे दर्शन घेतले

Fact Check: मोदींनी अयोध्येच्या जिर्णोद्धाराचे काम पाहणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे दर्शन घेतले
X

सध्या सोशल मिडीयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटो सोबत असा दावा केला जात आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएएस अधिकारी आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या नवीन कामाची जबाबदारी पार पडणाऱ्या मुख्य शिल्पकार आरती डोगरा आहेत. आणि मोदी यांनी त्यांचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावर हा फोटो याच दाव्यासह मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.


भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनीही हा फोटो ट्वीट करताना हाच दावा केला आहे.
त्याच प्रमाणे हा फोटो फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
ऑल्ट न्यूज़ च्या व्हाट्सऐप नंबर (+91 7600011160) अनेकांनी सत्यता पडताळण्यासाठी हा फोटो पाठवला आहे.
काय आहे सत्य?

अनेक बातम्यामध्ये हा फोटो वापरण्यात आला असून त्यामध्ये या महिलेचं नाव शिखा रस्तोगी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

न्यूज 18 नुसार, जेव्हा शिखा रस्तोगी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकल्या तेव्हा पीएम मोदी थांबले आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिखा रस्तोगी यांच्याशी संवाद साधला. शिखा रस्तोगी यांनी न्यूज18 शी संवाद साधला होता. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळीचं हे दृश्य आहेत.

कोण आहेत आरती डोगरा?

आरती डोगरा या 2006 च्या राजस्थान केडरच्या IAS अधिकारी आहेत. त्याची उंची 3 फूट 6 इंच आहे. आरती डोगरा सध्या राजस्थान सरकारच्या विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे वास्तुकार बिमल पटेल आहेत. बिमल पटेल यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा प्लान केला आहे.

निष्कर्ष

म्हणजेच काशी विश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मुख्य शिल्पकार आरती डोगरा यांच्या पायाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्श केल्याचा दावा खोटा असून काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे वास्तुकार बिमल पटेल आहेत. तसंच मोदी यांनी ज्यांच्या पायाला स्पर्श केला असं सांगितलं जात आहे. तो फोटो आरती डोगरा यांचा नसून शिखा रस्तोगी यांचा आहे.

या संदर्भात Alt news ने Fact Check केलं आहे. https://www.altnews.in/hindi/photo-falsely-viral-as-pm-modi-touched-feet-of-ias-officer-aarti-dogra/

Updated : 25 Dec 2021 10:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top