Home > Fact Check > भक्तांचा देव खोटा आहे का?

भक्तांचा देव खोटा आहे का?

भक्तांचा देव खोटा आहे का?
X

राजकीय नेते जेव्हा भाषण करतात. तेव्हा कार्यकर्ते ते खरंच आहे. असं मानून त्यांचं भाषण व्हायरल करतात. कोणी त्याबाबत काही बोललं तर त्याला अरेरावी ने उत्तर दिलं जातं. अलिकडे देशात ही संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही दावा केला... तरीही काही कार्यकर्ते ते खरंच आहे. असं मानतात. त्यांना सोशल मीडियावर भक्त म्हटलं जातं. मात्र, हे भक्त ज्यांना देव मानतात... तो देव खरा आहे का? भक्तांच्या या देवाच्या बोलण्यात खरंच किती तथ्य आहे?

उत्तर प्रदेश मध्ये २०२२ ला विधानसभा निवडणूका होत आहेत. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होणाऱ्या निवडणुकांच्या प्रचाराला राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या काळात, सध्याच्या सरकारने आपल्या सत्ताकाळात केलेल्या विकासकामांच कौतुक करणं ही एक सामान्य गोष्ट आहे.. १५ जुलै ला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ३० मिनिटांच्या भाषणांमध्ये अनेक दावे केले. ज्यातील काही दावे हे भ्रामक आणि खोटे होते.

मोदींनी केलेला पहिला दावा...

उत्तर प्रदेश सरकार हे देशातील सर्वात जास्त कोरोना चाचण्या आणि लसीकरण करणार राज्य आहे.

भाषण करताना मोदी म्हणतात, "आज उत्तर प्रदेश सगळ्यात जास्त कोरोना चाचण्या करणारं राज्य आहे." तुम्ही मोदी यांच्या व्हिडीओमध्ये ७ मिनट १५ सेकंदानंतर हे पाहू शकतात.

COVID19India.org च्या मते, यूपी हे सर्वात जास्त कोरोना चाचण्या करणार राज्य आहे. मात्र, देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले देखील हे राज्य आहे.


Mo HFW च्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, ही माहिती देशातील इतर राज्यातील प्रती लाखा प्रमाणे पाहिली असता चित्र काही वेगळंच दिसतं.

आधार कार्डधारकांच्या संख्येच्या आधारावर राज्यभरातील प्रत्येक लाख लोकसंख्येमध्ये दोन्ही डोस घेणाऱ्या लोकांच्या संख्येचं विश्लेषण केलं असता, उत्तर प्रदेशमध्ये प्रति लाख लोकांमध्ये ३,५१६.८९ लोकांनी लसीचे दोनही डोस घेतल्याचं दिसून आलं. जो आकडा राष्ट्रीय लसीकरणाच्या ७,५७५.८४ च्या दरापेक्षा खूपच कमी आहे.

मात्र, त्यामुळं पंतप्रधान जरी उत्तर प्रदेशमध्ये लसीकरण अधिक झाल्याचा दावा करत असले तरी लोकसंख्या आणि लसीकरणाच्या प्रमाणाचा विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दावा किती खरा मानायचा?

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाला रोखण्यासाठी योगी सरकारने केलेल्या प्रयत्नांना "अभूतपूर्व" असल्याचं म्हटलं आहे. मात्र, ते गंगेत वाहणाऱ्या मृतदेहाचा आणि स्मशानघाटात जळणाऱ्या मृतदेहांचा उल्लेख करायला विसरले.

दरम्यान मोदींनी आपल्या भाषणात आणखी एक दावा केला जो वास्तवापासून खूपच लांब असल्याच पाहायला मिळालं.


मोदींनी केलेला दुसरा दावा...

योगी सरकारने यूपीमध्ये मेडिकल कॉलेजची संख्या चार पटीने वाढली असल्याचा दावा केला.

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, "चार वर्षां अगोदर उत्तर प्रदेशमध्ये डझनभर मेडिकल कॉलेज होते आता त्याची संख्या चार पटीने वाढली आहे."

दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. MoHFW च्या आकडेवारीनुसार, २०१६ पर्यंत उत्तर प्रदेश मध्ये ३८ कॉलेज होते.


तर २०२१ मध्ये ही संख्या ५७ झाली. दरम्यान २०१६ चा आकडा आणि २०२१ चा आकडा पाहता चार पटीने कॉलेजची संख्या वाढलेली दिसून येत नाही. कारण चार पटीने म्हणजेच उत्तरप्रदेशमध्ये १५२ मेडिकल कॉलेज असायला हवे होते.


मोदींनी केलेला तिसरा दावा...

जल जीवन मिशन प्रकल्प वेगाने प्रगती करत आहे.

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केला की, उत्तर प्रदेश सरकार लोकांच्या घरात स्वच्छ पाणी पोहोचवण्यासाठी वेगाने काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप सरकारच्या २०१९ च्या जल जीवन मिशनबद्दल बोलत होते. या योजनेचं उद्दिष्ट २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरामध्ये पाण्याचे नळ पुरवणे हे होते.


दरम्यान JJM मिशनच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २ वर्षांमध्ये यूपीच्या ग्रामीण घरांमध्ये एकूण पाण्याचं कनेक्शन १.९६% ते ११.९९% इतकीच वाढ झाली आहे. मात्र, या कालावधीत, बिहारमध्ये पोहोचलेल्या नळ जोडणीच्या संख्येत १.८४% ते ८५.७४% इतकी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, बिहारमध्ये १,४४,१५,०५० कनेक्शन आहेत, जे सर्वाधिक आहेत. मात्र, उत्तर प्रदेश २६,३२,७६१ कनेक्शन पोहोचले आहेत. या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश देशात चौथ्या क्रमांकावर आहे.

मोदींनी केलेला चौथा दावा...

योगी आदित्यनाथ यांच्या शासनात उत्तर प्रदेश हे महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या "कायदा आणि प्रशासनाचचं" सुद्धा कौतुक केलं. ते म्हणाले की, "उत्तरप्रदेशमधील आई वडील त्यांच्या मुलींच्या सुरक्षिततेबद्दल घाबरत होते. पण आता हे बदललं आहे. ते म्हणाले की जे लोक आपल्या मुली आणि बहिणींना त्रास देत होते. त्यांना आता माहीत आहे की ते आता कायद्यापासून वाचू शकत नाही'.

दरम्यान हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर काही महिन्यांनीच पंतप्रधान मोदी यांनी असा दावा केला आहे. मात्र, या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.

तसेच महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये, बहुतांश दलित महिलांच्या प्रकरणांमध्ये सरकार योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप सुद्धा यूपी सरकार वर वारंवार करण्यात आला.

२०१७ च्या उन्नाव बलात्कार प्रकरणादरम्यानही, उत्तर प्रदेश सरकारवर अत्याचारांच्या प्रकरणांबाबत सवाल उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणात, दोन वर्षानंतर भाजप नेते आणि आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. तसेच मुलीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. या संपूर्ण प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू झाला होता.

नॅशनल क्राइम ब्युरो (NCRB) च्या ताज्या आकडेवारीनुसार, (२०१९) देशभरातील महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये उत्तरप्रदेश अव्वल (१४.७%) आहे. मागील अहवालातील आकडेवारीवरीत देखील हेच दिसून आले होते.

रिपोर्टनुसार, यूपीमध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेल्या व्यक्तीचं प्रमाण ५५.२ आहे, जे यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर मिझोरम या यादीत सर्वात वर आहे, ज्याचा आकडा ८८.३ इतका आहे. मणिपूर दुसऱ्या स्थानावर (५८) आणि तिसऱ्या स्थानावर मेघालय (५७.३) आहे. (इथे पहा)

उत्तर प्रदेशमध्ये महिलांविरोधातील एकूण गुन्ह्यांची संख्या १९९,५५३ आहे. हा आकडा संपूर्ण देशात तिसऱ्या क्रमांकावर येतो. या यादीत पश्चिम बंगाल (२६३,८५४) प्रथम असून महाराष्ट्र (२२०,४३५) दुसऱ्या स्थानावर आहे. (इथे पहा)


दरम्यान एनसीआरबी च्या नवीन आकडेवारीनुसार सुद्धा यूपीमधील परिस्थिती गंभीर दिसून येते.

१. यूपी मध्ये कोठडीत महिलांवर बलात्कार होण्याची संख्या (२२) सर्वाधिक आहे. यामध्ये १० प्रकरणांचे गुन्हेगार हे सरकारी नोकर आहेत. तर १२ प्रकरणांमधील गुन्हेगार हे प्रशासन / तुरुंग कर्मचारी / रिमांड होम / कोठडीच्या ठिकाणचे आहेत. (इथे पहा)

२. उत्तर प्रदेश मध्ये हुंड्यामुळे होणाऱ्या हत्यांची संख्या प्रति लाख २.२ इतकी आहे. हा आकडा संपूर्ण देशाच्या सरासरी आकडेवारीपेक्षा २ पट अधिक आहे.(इथे पहा)

३. यूपीमध्ये गर्भपात आणि अॅसिड हल्ल्यांची संख्या सुद्धा सर्वाधिक आहे.(इथे पहा)

४. २० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या (आरओटीसी) प्रकरणांमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पुढे आहे. पण यूपीच्या ३ शहरांमध्ये ROTC ची संख्या महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त आहे. तसेच, लखनौमध्ये ROTC प्रकरणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर आरओटीसीची सर्वाधिक प्रकरणे जयपूर, राजस्थानमध्ये आहेत. (इथे पहा)

५. बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांच्या नोंदणीच्या बाबतीत उत्तर प्रदेश देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत राजस्थान पहिल्या स्थानावर आहे. (इथे पहा)

एकूणच, पंतप्रधान मोदी यांनी यूपी सरकारचे कौतुक करताना काही दावे केले. यूपी सरकारची कामगिरी आणि यूपी सरकारच्या कामाचं कौतुक करताना त्यांनी अतिशयोक्तीपणे दावे केले. मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे झालेल्या लोकांच्या मृत्यूची संख्या आणि प्रदेशात ऑक्सिजनच्या अभावामुळे लोकांचा झालेला मृत्य याबाबत त्यांनी अचूक आकडे न देता योगी आदित्यनाथ यांची स्तुती केली.

यूपीमध्ये महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे बरीच जास्त आहेत. त्यामुळे पंतप्रधांनानी अतिशोक्ती वर्णन करत योगी सरकारची खोटी स्तुती केल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात Alt news ने वृत्त दिलं आहे.

Updated : 20 Aug 2021 1:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top