Home > Fact Check > Fact Check: ऑलम्पिक खेळाडूंच्या सत्कार समारंभात मोदींचा फोटो खेळाडूंपेक्षा जास्त वेळ बॅनरवर झळकला का?

Fact Check: ऑलम्पिक खेळाडूंच्या सत्कार समारंभात मोदींचा फोटो खेळाडूंपेक्षा जास्त वेळ बॅनरवर झळकला का?

Fact Check: ऑलम्पिक खेळाडूंच्या सत्कार समारंभात मोदींचा फोटो खेळाडूंपेक्षा जास्त वेळ बॅनरवर झळकला का?
X

टोकिओ ऑलम्पिकचा समारोप सोहळा नुकताच पार पडला. सर्व खेळाडू आपल्या देशात परतले. भारतीय ऑलंम्पिक खेळाडूंचं देखील देशात जंगी स्वागत करण्यात आलं. भारतीय खेळाडूंच्या स्वागतासाठी हॉटेल अशोकामध्ये भव्य समारोह आयोजीत करण्यात आला होता.

या समारंभात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बॅनरवरील फोटो मोठ्या चर्चेचा विषय़ ठरला. स्वागत समारंभाच्या हॉलमध्ये लावलेल्या बॅनरवर मोदी यांची प्रतिमा मोठी असल्य़ाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पत्रकार विनोद कापरी, काँग्रेस सदस्य झाकीया खान, हेमंत ओगले आणि इतर अनेक ट्विटर अकाउंट्सने याबद्दल ट्विट केलं आहे. त्यांच्यामते, बॅकग्राउंडच्या बॅनरवर आणि स्टेजच्या शेजारील दोनही स्क्रीनवर पंतप्रधान मोदींचाच फोटो पाहायला मिळत आहे.





तर भाजप समर्थकांनी बचावात्मक पवित्रा घेत बॅनरवर (LED Screen ) नीरज चोप्राचेच फोटो होते. तसेच त्यांच्यापैकी काहींनी असा दावा सुद्धा केला की, ज्यांनी तो फोटो शेअर केला आहे ते लोक नरेंद्र मोदींविरोधात 'द्वेष मोहीम' चालवत आहेत.

दरम्यान, ट्विटर यूजर @garg_trupti ने दोन्ही फोटो एकत्रित शेअर करत लिहिलं, "ते हे (

चा फोटो) लपवण्यासाठी (मोदींचा फोटो) दाखवत आहेत."

तर ट्विटर यूजर @rishibagree ने विनोद कापरी यांच्यावर नीरज चोप्राचा बॅनरवरील फोटो क्रॉप करत शेअर केल्याचा आरोप केला आहे. मात्र, याअगोदर अनेकदा @rishibagree या हँडलने चुकीची माहिती शेअर केली असल्याचं दिसून आलं आहे.

ट्विटरवर अनेकांनी हा दावा करत फोटो शेअर केला आहे.

काय आहे सत्य...?

दरम्यान, आम्ही सत्कार समारंभाचे दोन फुटेज पाहिले. जे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजवर अपलोड केले होते. त्यात असं दिसून आलं की, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांनी फोटो क्रॉप करून शेअर केला नव्हता.

समारंभाची पहिली 20 मिनिट...

खालील दिसत असलेला स्क्रीनशॉट अनुराग ठाकूर यांच्या फेसबुक पेजवर अपलोड केलेल्या व्हिडिओचा आहे. पहिल्या फ्रेममध्ये, स्टेजच्या समोरील प्रदर्शनात नरेंद्र मोदींचा फोटो असल्याचं दिसून येतं. एलईडी स्क्रीनवर पंतप्रधान मोदी यांचा फोटो हा डीफॉल्ट ग्राफिक होता, जो केवळ एका खेळाडूचा सत्कार झाल्यावर बदलला जायचा.





समारंभाच्या पहिल्या 20 मिनिटांमध्ये 2 मिनिटे 4 सेकंदांनंतर, पुढील 57 सेकंदांसाठी (राष्ट्रगीत वाजत असताना), नरेंद्र मोदींचा फोटो स्क्रीनवर दाखवण्यात आला. राष्ट्रगीत सुरु असतांना भारतीय ध्वज दाखवण्यात आला आणि राष्ट्रगीत समाप्तीच्या दोन सेकंदातच पुन्हा स्क्रीनवर नरेंद्र मोदींचा फोटो दिसू लागला.



दरम्यान, जेव्हा खेळाडू मंचावर बोलण्यासाठी आले, तेव्हा स्क्रीनवर त्या - त्या खेळाडूचा फोटो दाखवण्यात आला. मात्र एका खेळाडूचा सत्कार होताच लगेच मोदींचा फोटो स्क्रीनवर दाखवला जायचा. मोदींचा फोटो तोपर्यंत स्क्रीनवर राहायचा जोपर्यंत पुढील खेळाडू सत्कारासाठी पुढे येत नसे.







तर रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया व्हिडिओमध्ये 22 मिनिटांपासून 23 मिनिटे 22 सेकंदांपर्यंत बोलत होते.

त्यांनतर लगेचच 23 मिनिटे 27 सेकंदाला मोदींचा फोटो पुन्हा स्क्रीनवर आला. तसेच बॉक्सिंग कांस्यपदक विजेती लवलिना बोर्गोहेन आणि तिचे प्रशिक्षक यांचे फोटो 23 मिनिटे 34 सेकंद ते 27 मिनिटे 04 सेकंदात दाखवण्यात आले. 2 सेकंदांनंतर, नरेंद्र मोदींचा फोटो पुन्हा स्क्रीनवर आला. यावरून असं दिसून येतं की, संपूर्ण समारंभात अशाचप्रकारे काम सुरु होतं.





समारंभाचा शेवटचा भाग...

समारंभाच्या शेवटी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला 51 मिनिटे 15 सेकंदादरम्यान पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी सुद्धा, नीरज बोलत असतांनाच त्याचा फोटो स्क्रीवर होता. त्यांनतर काही वेळाने भारताचे कायदा आणि न्याय मंत्री किरन रिजिजू यांनी भाषण केलं. 52 मिनिटे 48 सेकंदावर, आपण पुन्हा पाहू शकतो की नरेंद्र मोदींचा फोटो स्क्रीनवर दिसून येतो. त्यांनतर व्हिडिओच्या शेवटच्या फ्रेमपर्यंत (1 तास 2 मिनिटे 55 सेकंदात) एलईडी स्क्रीनवर नरेंद्र मोदींचाच फोटो होता.





ऑल्ट न्यूज प्रेज़ेंटेशन टीममध्ये सहभागी असलेल्या एका व्यक्तीशी संपर्क केला असता. ते म्हणाले - "एकूणच, दोनही स्क्रीनवर दाखवण्यात आलेल्या फोटोंमध्ये मोदीच होते." शिवाय राष्ट्रगीत सुरु असतांना आणि खेळाडूंचा सत्कार होत असतांना भारतीय राष्ट्रध्वज दाखवण्यात आला. मी हे देखील नमूद करू इच्छितो की, मंचाच्या मध्यभागी बॅनरमध्ये नरेंद्र मोदींचा प्रचंड मोठा फोटो होता. पंतप्रधान मोदींच्या तुलनेत खेळाडूंचा फोटो स्टॅम्पच्या आकाराचा होता.





दरम्यान, ऑलिम्पिक विजेत्यांच्या सत्कार समारंभावेळी पंतप्रधान मोदींचे लावण्यात आलेल्या मोठं मोठ्या फोटोंपासून बचाव करण्याचा भाजप समर्थकांनी चांगलाच प्रयत्न केला. खेळाडूंचे देखील फोटो दाखवण्यात आले. हे सांगण्यासाठी त्यांनी स्क्रीनशॉट्स देखील शेअर केले. मात्र, सत्य हे आहे की केवळ काही मिनिटांसाठी खेळाडूंचे फोटो दाखवण्यात आले.

Updated : 14 Aug 2021 12:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top