Home > Fact Check > पंतप्रधान मोदींनाही सोशल मीडियावरील Fake पोस्टचा फटका

पंतप्रधान मोदींनाही सोशल मीडियावरील Fake पोस्टचा फटका

पंतप्रधान मोदींनाही सोशल मीडियावरील Fake पोस्टचा फटका
X

सोशल मीडियावर व्हायरल होणारा प्रत्येक मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ खरा असतो असाच अनेकांचा समज असतो. पण कोणतीही पोस्ट फॉर्वर्ड करताना ती खरी आहे का याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे, कारण अनेकवेळा खोट्या आणि चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही एका फोटोबाबत असाच प्रकार समोर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मध्य प्रदेशातील अभयारण्यात नामिबियातून आणलेले चित्ते सोडले, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चित्त्यांचे फोटो काढले. त्यानंतर कॅमेऱ्याची लेन्स बंद असूनही मोदी फोटो काढत आहेत, असा एक फोटो व्हायरल झाला. हा फोटो काँग्रेससह ट्विटवरील अनेक ब्लू टीक असलेल्या लोकांनी ट्विट केला. तसेच मोदींवर टीका देखील केली.


There is only one man in the world that is Modi ji who can use this locked camera and take pictures as well . @INCIndia @kkc_india pic.twitter.com/JlfAv0F2uu

पण पंतप्रधान मोदींनी ज्यावेळी अभायरण्यात चित्ते सोडले आणि फोटो काढले तेव्हाचे व्हिडिओ पाहिले तर हा फोटो बनावट असल्याचे दिसते.

यानंतर कॅमेऱ्याच्या लेन्सला जे कव्हर लावले आहे ते कॅननचे असल्याचे दिसते. पण कॅमेरा निकॉन असल्याचा मुद्दा अनेकांनी उपस्थित करत हा फोटो एडिट करुन टाकला गेल्याचे सांगितले. भाजपनेही यावर लगेचच स्पष्टीकरण देत फोटो खोटा असल्याचे सांगितले.एकूणच सोशल मीडियाचा वापर भाजपने फार स्मार्ट पद्धतीने केला, अशी चर्चा कायम असते. पण आता त्याच सोशल मीडियातून भाजपच्या अनेक दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण त्याचबरोबर भाजपला आता फेक पोस्टचाही त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसते आहे.

Updated : 19 Sep 2022 6:05 AM GMT
Next Story
Share it
Top