Home > Fact Check > Fact Check: गोरखपूरमधील घरावर 'पाकिस्तानी झेंडा' फडकवल्याचं वृत्त खरं आहे का?

Fact Check: गोरखपूरमधील घरावर 'पाकिस्तानी झेंडा' फडकवल्याचं वृत्त खरं आहे का?

Fact Check: गोरखपूरमधील घरावर पाकिस्तानी झेंडा फडकवल्याचं वृत्त खरं आहे का?
X

झी हिंदुस्थानने, दाखवलेल्या एका बातमीमध्ये गोरखपूरच्या चौरी चौरा भागातील एका घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे. या वृत्तांमध्ये पाकचा झेंडा फडकल्याने लोकांमध्ये संताप असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, झी हिंदुस्थानचे पत्रकार तुषार श्रीवास्तव यांनीही ट्विट करत हाच दावा केला आहे.

तसेच, पंजाब केसरीनेदेखील गोरखपूरच्या चौरी चौरा भागात एका घराच्या छतावर पाकिस्तानी झेंडा लावण्यात आल्याची बातमी दिली होती.

याशिवाय नवभारत टाइम्स आणि लोकमत हिंदीनेही हा दावा केला आहे.






दरम्यान, या घटनेबाबत काही लोकांनी देखील ट्विट केलं आहे. ट्विटनुसार, गोरखपूरच्या चौरीचौरा भागात पाकिस्तानी झेंडा लावल्याच्या संशयावरून जमावाने एका घराला वेढा घातला होता. या दाव्यासह एक व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये जमाव 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देताना दिसत आहे.




यासोबतच, उजव्या विचारसरणीच्या मीडिया वेबसाईट ओप इंडियानेही हाच दावा करत वृत्त दिलं आहे.





काय आहे सत्य...? What is reality?

माध्यमांनी दिलेल्या वृत्तातील व्हिडीओमध्ये झेंड्याचं काळजीपुर्वक निरिक्षण केल्यानंतर हा पाकिस्तानी ध्वज नसल्याचे दिसून येते. खालील फोटोमध्ये आपण हे स्पष्टपणे पाहू शकतो. घरावर लावलेल्या झेंड्यावर पाकिस्तानच्या झेंड्यात असलेला पांढरा पट्टा दिसून येत नाही. पाकिस्तानच्या झेंड्याच्या डाव्या बाजूला पांढरा पट्टा असतो.



याशिवाय या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या झेंड्यांचं निरिक्षण केल्यानंतर त्यामध्येही पांढरा पट्टा नसल्याचे स्पष्ट दिसून येते. याशिवाय दोन्ही झेंड्यांमध्ये चंद्र वेगवेगळ्या दिशेला आहे.



दरम्यान, एका फोटोमध्ये एक व्यक्ती पोलिसांना झेंडा दाखवत आहे. मात्र, तो झेंडा इस्लामिक आहे. पाकिस्तानी नाही.

गोरखपूरच्या घरावर कथितपणे पाकिस्तानी झेंडा लावल्याचा दाव्यानंतर अनेक सोशल मीडिया यूजर्सने झेंड्यांचा फोटो शेअर करत सांगितले आहे की, हा झेंडा पाकिस्तानी नाही.



महोदय आप हमे बताए की एंगल से आप को पाकिस्तान का झंडा नजर आ रहा है? https://t.co/OFbBfBnw5E pic.twitter.com/5dyzASdSvz


दरम्यान, गोरखपूर पोलिसांनी या प्रकरणी ट्विट करत, चौरीचौरा शहरातील एका घरावर पाकिस्तानी झेंडा लावल्याच्या बातमीवरून आणि एका व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 4 जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तसेच, झेंडा ताब्यात घेण्यात आला असून याप्रकरणी तीन पथके तयार करून आवश्यक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.



#gorakhpurpolice@Uppolice @AdgGkr @diggorakhpur @IPS_VipinTada pic.twitter.com/3jLnSKWmet


दरम्यान, चौरी चौरा परिसराच्या नगर अधिकाऱ्याशीही चर्चा केली असता, या प्रकरणी पोलिसांनी झेंडा ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, तपासादरम्यान प्रथमदर्शनी असे आढळून आले की, हा पाकिस्तानी झेंडा नसून इस्लामिक ध्वज आहे. तरीही पुढील तपास सुरू आहे. तसेच, या घटनेबाबत स्थानिक पत्रकाराशीही चर्चा केली असता ते म्हणाले,

"चौरी चौरा भागात टेरेसवर ध्वज लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे स्थानिक नेते त्या घराबाहेर जमले. घराबाहेर जमलेल्या जमावाने दगडफेक केली आणि बाहेर उभ्या असलेल्या कारचीही तोडफोड केली. दरम्यान, हा गोंधळ पाहून पोलिसही तेथे पोहोचले आणि त्यांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. जमावात सामील असलेल्या काही लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी झेंडा ताब्यात घेतला आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तसेच, याप्रकरणी 1 जणाला अटकही करण्यात आली आहे.

Alt न्यूजसोबत त्यांनी एफआयआरची प्रत देखील शेअर केली आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ब्राह्मण जनकल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कल्याण पांडे यांना चौरीचौरा भागातील निराला गल्ली येथील रहिवासी तालीम मुल्ला यांच्या घरावर पाकिस्तानचा झेंडा लावण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

त्यामुळे ब्राह्मण जनकल्याण समितीचे कार्यकर्ते तेथे पोहोचले. याबाबतची माहिती त्यांनी प्रशासनालाही दिली. आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.








दरम्यान, बीबीसीने 14 नोव्हेंबर ला गोरखपूर पोलिसांनी देशद्रोहाचा खटला मागे घेतल्याचे वृत्त दिले होते.

अहवालानुसार, "तपासानंतर, गोरखपूर पोलिसांनी म्हटले आहे की, झेंडा इस्लामिक होता तो पाकिस्तानी नव्हता. त्यामुळे देशद्रोहाचा खटला मागे घेतला जाईल." तसेच या प्रकरणी 4 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आल्याचं देखील अहवालात म्हटलं गेलं आहे. मात्र, त्यांना लवकरच सोडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

निष्कर्ष

एकूणच, गोरखपूरच्या चौरीचौरा भागातील एका घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याची चर्चा होती. मात्र, या घटनेबाबत स्थानिक नेते आणि हिंदू संघटनांनी गोंधळ घातला. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी कोणतीही पुष्टी न करता या संपूर्ण घटनेचे वृत्त दिले. मात्र, पोलिसांच्या तपासात हा इस्लामी झेंडा असल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे, झेंडा जवळून पाहिल्यानंतरही तो पाकिस्तानचा ध्वज नसल्याचं समजतं.

या संदर्भात alt news ने वृत्त दिलं आहे. https://www.altnews.in/hindi/media-misreport-gorakhpur-pakistani-flag-hoisted-at-a-roof/

Updated : 17 Nov 2021 7:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top