Home > Fact Check > FACT CHECK: केरळमध्ये खरंच मुस्लिम देश स्थापनेचे प्रयत्न केले जात आहेत का?

FACT CHECK: केरळमध्ये खरंच मुस्लिम देश स्थापनेचे प्रयत्न केले जात आहेत का?

FACT CHECK: केरळमध्ये खरंच मुस्लिम देश स्थापनेचे प्रयत्न केले जात आहेत का?
X

काही मुलांचा मल्याळम भाषेत प्रतिज्ञा घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओ सोबतच असा दावा केला जात आहे की 'युनायटेड मलप्पुरम' मध्ये केरळच्या 6 जिल्ह्यांनी एकत्र येऊन इस्लामीक पंतप्रधानाची निवड केली आहे. तसेच स्वतंत्र सैन्य स्थापन केले आहे. या व्हिडिओवर लिहिलेले आहे- "युनायटेड मलप्पुरमचे कुंजलिकुट्टी पंतप्रधान".

ट्वीटर हँडल '@ MLDhar4' ने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. मात्र, आता त्यांचं ट्वीट ट्वीटरने काढून टाकलं आहे.




त्याचबरोबर @MeghUpdates या ट्विटर हँडलने देखील व्हिडिओ ट्विट केला होता. MeghUpdates यांच्या ट्विटला जवळपास १८३० इतके रिट्विट्स आहेत. त्याचबरोबर 30 हजार लोकांनी त्यांचं ट्विट पाहिलं होत. बऱ्याच ट्वीटर वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.




1.5 लाख फ़ॉलोअर्स असलेला फेसबुक ग्रुप 'I SUPPORT NRC घुसपैठिये भगाओ' मध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.



काय आहे सत्य...?

केरळमधील 6 जिल्ह्यांत 'युनायटेड मलप्पुरम' च्या निर्मितीबाबत कुठल्याही माध्यमांनी बातमी दिलेली नाही. जर हे सत्य असतं तर सर्व माध्यमांनी ही बातमी कव्हर केली असती. या अगोदरही मलप्पुरमच्या दुभाजनाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांबद्दल चुकीची माहिती शेअर केली गेली होती. मलप्पुरम हा केरळचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

मुस्लिम यूथ लीगचे राष्ट्रीय सरचिटणीस फैसल बाबू यांनी ऑल्ट न्यूजला सांगितले की, हा व्हिडिओ 2008 चा आहे. सोबत त्यांनी या व्हिडिओ मधील प्रतिज्ञेचं इंग्रजी भाषांतर सुद्धा पाठवलं. अल्ट न्यूजने मल्याळम बोलणाऱ्या एका व्यक्तीकडून या भाषांतराची पडताळणी सुद्धा केली.

भाषांतरानुसार प्रतिज्ञा,

"गौरवशाली पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी शपथ घेत आहे की, मी माझा वेळ आणि संसाधने मुस्लिम आणि इतर मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच वापरेल. मी शपथ घेत आहे की, आपल्या देशातील ऐक्य, अखंडता, शांतता आणि जातीय समानता कायम राखून मी राजकीय प्रगती करेन. मला हे समजले आहे की सूड, अतिरेकी, दहशतवादाचे राजकारण हानिकारक आहे आणि यामुळे आपल्या देशाचे सामाजिक सुख नष्ट होऊ शकते. मी सर्व क्षेत्रातील विविधतेत एकतेची कल्पना राखण्याचे वचन घेतो. माझी नैतिकता, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त राजकीय प्रणालीवर ठाम विश्वास आहे आणि यामुळे कल्याणकारी राज्य निर्माण होईल. मी माझ्या देशाचे पूर्ण समर्थन करतो आणि मला माझ्या देशावर प्रेम आहे."

दरम्यान यावरून असं समजतं की, व्हायरल व्हिडीओ मध्ये सांगण्यात आलेली माहिती खोटी आहे. या व्हिडिओतील इस्लामी पंतप्रधान पद निर्माण करण्यात आलं आहे. अथवा त्या सोबत मुस्लिम मुलांनी देश विरोधी शपथ घेतली ही बाब खोटी असल्याचं स्पष्ट होतं.

हा व्हिडिओ २०१८ साली सुद्धा फेसबुकवरील 'കൊണ്ടോട്ടി പച്ചപട' या पेज वर पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये दावा केला होता की, सीटी साहेब मेमोरियल परेडमध्ये ग्रीन आर्मीतर्फे मलप्पुरमचे पंतप्रधान पी. के. कुन्हालीकुट्टी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. कोंडोट्टी हे मलप्पुरम मधील एक शहर आहे.



पीके कुन्हालीकुट्टी कोण आहेत?

पीके कुन्हालीकुट्टी हे इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (IUML) राष्ट्रीय महासचिव आहेत. यापूर्वी त्यांनी कुट्टीपुरम, वेंगारा आणि मलप्पुरममधून निवडणूका जिंकल्या होत्या. ते लोकसभेचे सदस्यही होते.





अल्ट न्यूजशी बोलताना ते म्हणाले, मलाप्पपुरमचे पंतप्रधान म्हणून मला गार्ड ऑफ ऑनर मिळालेला दावा खोटा आहे. (व्हिडिओमध्ये ते दिसत आहेत)

या व्यतिरिक्त MYL राष्ट्रीय सरचिटणीस फैजल बाबू म्हणाले की, हा व्हिडिओ २००८ चा असून त्यावेळी उपस्थित आययूएमएल युथ विंग व्हिडिओमध्ये दिसत आहेत. एकता आणि समाजसेवा लक्षात घेऊन व्हाइट गार्डची निर्मिती 2018 मध्ये करण्य़ात आली होती. केरळमध्ये या संघटनेशी जवळ जवळ 1 लाख लोक जोडलेले आहे. MYL ही एक अधिकृत स्वयंसेवी संस्था आहे.

ते पुढे म्हणाले, व्हाईट गार्डचा गणवेश हा पांढरा शर्ट आणि पँट असा आहे. परंतु काम करताना हे लोक हलके हिरवे शर्ट घालतात. केरळमधील मीडिया आउटलेटने व्हाइट गार्डच्या अधिकृत गणवेशाचे छायाचित्र शेअर केले असल्याचं सुद्धा ते म्हणाले.



गेल्या वर्षी, द हिंदूंने बातमी दिली होती की, मुस्लिम युथ लीगने राज्यातील रूग्णांना लवकरात लवकर औषधे मिळवून देण्यासाठी व्हाईट गार्डची मिड - चेन सुरू केली आहे. त्याचप्रमाणे व्हाइट गार्ड अजूनही एक माध्यम साखळी म्हणून काम करत आहे आणि कोरोनाच्या उर्वरित मदतकार्यातही मदत करीत आहे.

केरळमधील मानवता आणि सामाजिक विज्ञान या विषयातील पीएचडी घेतलेल्य़ा एका स्कॉलरने नाव सांगण्याच्या अटीवरुन या संदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले.

त्यांनी आम्हाला सांगितले, व्हिडिओमध्ये IUML चे सदस्य दिसत आहेत. आतापर्यंत IUML मध्ये ग्रीन आर्मी नावाचा कोणताही विभाग नव्हता. त्यांची अधिकृत युवा स्वयंसेवक संस्था व्हाइट गार्ड म्हणून ओळखली जाते. IUML ध्वजाच्या हिरव्या रंगामुळे, तरुण सदस्य स्वत: ला 'ग्रीन आर्मी' म्हणून संबोधतात.

परंतु विरोधक निशाणा साधण्यासाठी 'हिरवा' रंग वापरतात. जेव्हा विरोधक ग्रीन आर्मी म्हणतात. तेव्हा त्यांचा मुख्यतः निशाणा पाकिस्तानकडे असतो. त्यामुळे अनेक बनावट सोशल मीडिया अकाउंट्स त्यांना ग्रीन आर्मी म्हणतात.

मलप्पुरमचा संक्षिप्त राजकीय इतिहास

मलप्पुरममध्ये 138 गावे, 7 तालुके आणि 2 उपजिल्हे आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार हा जिल्हा मुस्लिम बहुल जिल्हा आहे. 2013 मध्ये, IUML ने प्रशासकीय आणि विकासाच्या कारणांचा उल्लेख करून मलप्पुरम जिल्ह्याच्या विभाजनासाठी दबाव निर्माण केला होता. मात्र, उद्योगमंत्री ई.पी. जयराजन यांनी ते नाकारले.

द हिंदूच्या मते, जयराजन यांनी या प्रस्तावाला अवैज्ञानिक म्हटले होते, यामुळे सामाजिक आणि राजकीय उलथापालथ होऊ शकते असं त्याचं मत होतं. मलप्पुरम प्रश्नांवर जयराजन यांच्या मते, या प्रश्नावर ग्राउंड स्तरावर लोकांना चांगली सुविधा देणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

2019 मध्ये द न्यूज मिनिटने मलप्पुरमच्या राजकीय मुद्द्यांवरील सखोल रिपोर्ट केला होता. त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं होत, "मलप्पुरमच्या फाळणीच्या मागणीचे राजकारण आहे आणि त्यावर जातीयवादाचे आरोप आहेत. या जिल्ह्याला राज्य सरकारकडून अधिक संसाधन मिळायला हवे. हे दाखवण्यासाठी पुरेशी माहिती देखील उपलब्ध आहे."

IUML नेत्याने TNM ला सांगितले की, "ही मागणी SDPI ने केली असल्याने आपण ती नाकारू शकत नाही. आम्ही समजू शकतो की, त्यांचा सांप्रदायीक अजेंडा आहे. परंतु बहुतेक राजकीय पक्ष ज्या विभाजनाबद्दल बोलत आहेत ते कोणत्याही जातीय कारणांमुळे नाही तर ते सर्व समाजातील लोकांमध्ये या संदर्भात बोललं जात आहे.

इथे 2 जिल्हे असायला हवेत. मात्र, शासनाला योग्य तपास करून निर्णय घ्यावा लागेल. जेणेकरून आपण आपल्या विविधतेतील एकता गमावणार नाही.

निष्कर्ष काय?

IULM चे राष्ट्रीय सरचिटणीस पी के कुन्हालीकुट्टी यांचा सोशल मीडियावर मलप्पुरमचे पंतप्रधान म्हणून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आल्याचा दावा करणारा हा व्हिडीओ खोटा आहे. हा व्हिडिओ 2008 चा आहे.

Updated : 17 Jun 2021 8:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top