Home > Fact Check > Fact Check: नरेंद्र मोदी यांच्या युएई दौऱ्यानंतर तेथील लोकांनी हिंदू संस्कृती स्वीकारली?

Fact Check: नरेंद्र मोदी यांच्या युएई दौऱ्यानंतर तेथील लोकांनी हिंदू संस्कृती स्वीकारली?

Fact Check: नरेंद्र मोदी यांच्या युएई दौऱ्यानंतर तेथील लोकांनी हिंदू संस्कृती स्वीकारली?
X

सोशल मीडियावर काय व्हायरल होईल सांगता येत नाही. आता मोदी यांच्या युएई दौऱ्याबाबत काही दावे केले जात आहेत. "जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी युएईचा दौरा करून आले आहेत, तेव्हापासून शेखांनी मंदिरात जाण्यास, केळीच्या पानांवर जेवण करण्यास, आणि हिंदू प्रार्थना म्हणण्यास सुरवात केली आहे."





ट्विटरवर हे फोटो त्याच दाव्यासोबत प्रचंड व्हायरल होतांना दिसत आहेत.



ट्विटर सोबतच फेसबूकवरही हा दावा व्हायरल होत आहे. दरम्यान अनेकांनी हा दावा शेअर करतांना #घरवापसीकीओर (#Towards_Homecoming) आणि #जयश्रीराम या हॅश टॅगचा वापर केला आहे.




मात्र, व्हायरल होणारे फोटो २०१५ पासून शेअर होत असल्याचं दिसून येत आहे. ज्यात दावा केला जात होता की, अबू धाबी येथील हिंदू मंदिराच्या उद्घाटना दरम्यान स्थानिक "अरब नेत्यांनी" हजेरी लावली आणि त्यावेळी त्यांनी केळीच्या पानावर जेवण सुद्धा केलं.




महेश विक्रम हेडगे नावाच्या ट्विटर हँडलवरून सुद्धा २०१५ ला हे फोटो ट्विट करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय.




काय आहे सत्य -

पहिल्या फोटोची सत्यता पडताळण्यासाठी एक रिव्हर्स इमेज सर्च केले असता तो फोटो २०१८ चा असल्याचं समजलं. जेव्हा नरेंद्र मोदी चार दिवसीय पॅलेस्टाईन, युएई आणि ओमानच्या दौर्‍यावर होते. या दौर्‍यादरम्यान ते अबू धाबी येथे गेले असता, हा फोटो काढण्यात आला होता. दरम्यान अबू धाबी येथील BAPS हिंदू मंदिरासाठी जमीन दान केल्याबद्दल क्राउन प्रिन्सचे आभार व्यक्त करण्यासाठी BAPS भिक्षू आणि मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने क्राउन प्रिन्स यांची भेट घेतली होती.





दुसऱ्या फोटोची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता तो फोटो २०१३ मधील असल्याचं समोर आलं. जेव्हा BAPS भिक्षू युएई, ओमान आणि बहरीनच्या सत्संग दौर्‍यावर होते.







मात्र, या फोटोमध्ये मागे दिसणाऱ्या इमारतीवर अरबीमध्ये 'मजलिस अल नुवाब' असं लिहिलेलं आहे. ज्याचा अर्थ प्रतिनिधी परिषद असा होतो. म्हणजेच हे बहरीनचे संसद भवन आहे. दरम्यान बहरीनच्या संसदेचा इंटरनेटवरीन फोटो आणि या फोटोची तुलना केली असता अनेक साम्य मिळाली.या दौऱ्यांदरम्यान दुबईमध्ये BAPS सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन झालं होतं.





मात्र, मंदिराच्या उद्घाटनाचा कोणताही उल्लेख केला गेला नव्हता. आणि लक्षणीय बाब म्हणजे हा फोटो २०१३ चा असून २०१३ ला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नव्हते. दरम्यान तिसऱ्या फोटोचा शोध घेतला असता हा फोटो सर्वप्रथम २०१५ ला imgur च्या माध्यमाने रेडिट वर अपलोड केल्याचं पाहायला मिळालं. ज्यात दावा करण्यात आला होता की, "दुबईमध्ये अमिरातीचे स्थानिक लोक ओणम साजरा करत आहेत." मात्र, यामध्ये काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत.






बहुतेक व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा फोटो अबू धाबीमधील मंदिर उदघाटनाचा आहे. पण अबू धाबीमध्ये मंदिर बांधण्याची घोषणा पहिल्यांदा ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींच्या युएई दौर्‍यादरम्यान करण्यात आली होती. तसंच मार्च २०१५ मध्ये मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती आणि २०२३ पर्यंत मंदिर पूर्णपणे बनण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मंदिर बांधलं जात असताना शेखांनी मंदिरात जेवण केल्याचा दावा भ्रामक असण्याची शक्यता दिसून येते. दरम्यान केळीच्या पानांवर शेखांनी जेवण केल्याचा फोटो सर्वात जुना असून तो ओणम साजरे करतानाचा आहे. केरळमध्ये आणि बाहेर राहणाऱ्या मलायलींना ओणम उत्सवाच्या निमित्ताने दिले जाणारे हे पारंपरिक शाकाहारी जेवण आहे. तसेच युएईमध्ये केरळची लोकसंख्या मोठी असल्याने 'साध्य' खाण्याची प्रथा २०१५ म्हणजेच मोदींच्या दौऱ्या अगोदरचीच आहे. खाली दिसणारा फोटो हा २०१४ चा आहे.

निष्कर्ष:

एकूणच पंतप्रधान मोदींच्या युएई दौऱ्यानंतर अरबांनी हिंदू संस्कृतीचा अवलंब करण्यास सुरूवात केली असल्याचा दावा खोटा असून व्हायरल होणारे फोटो बनावट दाव्यासह कोणताही संबंध नसतांना शेअर केले जात आहेत.

Updated : 15 July 2021 3:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top