Home > Fact Check > Fact Check: Cold Drink मध्ये इबोला विषाणू संक्रमीत व्यक्तीचे रक्त? काय आहे सत्य?

Fact Check: Cold Drink मध्ये इबोला विषाणू संक्रमीत व्यक्तीचे रक्त? काय आहे सत्य?

Fact Check: Cold Drink मध्ये इबोला विषाणू संक्रमीत व्यक्तीचे रक्त? काय आहे सत्य?
X

सोशल मीडियावर अनेक गोष्टींची पडताळणी न करता त्या व्हायरल केल्या जातात. अशाच काही व्हाट्सअपवर व्हायरल झालेल्या पोस्ट फॅक्ट चेक टीमला (Alt news) वाचकांनी पाठवल्या होत्या.

या पोस्टमध्ये कोल्डड्रिंक तयार करणार्‍या कंपनीत काम करणाऱ्या लोकांनी कोल्डड्रिंक मध्ये इबोला संक्रमीत रक्त मिसळल्याचा दावा केला जात आहे. एनडीटीव्हीने (NDTV) या संदर्भात प्रथम वृत्त दिल्याचा दावा देखील केला जात आहे. तसंच या दाव्यात हैदराबाद पोलिसांनी लोकांना सतर्क राहून काही काळ कोल्ड ड्रिंक खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे.

याव्यतिरिक्त अनेक फोटो या दाव्यासह शेअर केले जात आहेत. या अगोदरही हा दावा करत फोटो शेअर केले जात होते. जुन्या दाव्यानुसार शेअर केला जाणारा मेसेज तुम्ही खाली पाहू शकता.

हा मेसेज फेसबूकवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


अनेक वर्षांपासून केला जातोय दावा...

या प्रकरणाची सत्यता पडताळताना एक साधारण गूगल सर्च केले असता अनेक तथ्य समोर आली. गेल्या काही वर्षांत, अनेक आउटलेट्सने या बनावट मेसेजचे सत्य समोर आणले आहेत. तरीही काही दिवसांनी पुन्हा हा बनावट मेसेज शेअर केला जातो. इतकेच नव्हे तर या दाव्यासह असणाऱ्या फोटोंची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत असल्याने ही गंभीर बाब बनत चालली आहे.

काय आहे दावा?

कोल्ड ड्रिंकमध्ये कोणीतरी इबोला व्हायरस संक्रमीत रक्त मिसळलं...

शेअर केल्या जाणाऱ्या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे की, कोल्ड ड्रिंक तयार करणार्‍या कंपनीत काम करणाऱ्या काही लोकांनी कोल्ड ड्रिंकमध्ये इबोला संक्रमित रक्त मिसळले आहे. या मेसेजची सत्यता पडताळली असता पुढील तथ्य समोर आली आहेत.

इबोला विषाणू १९७६ मध्ये प्रथम कांगोमध्ये आढळला होता. त्यानंतर, हा विषाणू वेळोवेळी लोकांमध्ये संक्रमीत होऊन लोकांच्या मृत्यूचे कारण बनला. मात्र २०१४ ते २०१६ च्या दरम्यान, इबोला विषाणू आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक स्वरुपता आढळला. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल & प्रिवेंशन (CDC) च्या माहितीनुसार या तीन वर्षांत तीन आफ्रिकन देशांमध्ये ११,३१० लोक या विषाणूमुळे मरण पावले आहेत. परंतु अद्याप भारतात एखादं अर्ध प्रकरण सोडता फार प्रमाणात या व्हायरसचा प्रसार झालेला नाही.

दरम्यान शेअर केल्या जाणाऱ्या दाव्यामध्ये एनडीटीव्ही ने या बद्दलची माहिती दिल्याचं म्हटल जातं आहे. मात्र, एनडीटीव्हीने अशी कोणतीही बातमी न दिल्याचं आम्हाला दिसून आलं. हैदराबाद पोलिसांनी जुलै २०१९ मध्ये केलेल्या ट्विटमध्ये या खोट्या दाव्याबद्दल माहिती देताना सांगितलं आहे की, हैद्राबाद पोलिसांनी याबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

व्हायरल केले जाणारे फोटो -


हे दोन फोटो भारतातले नसून पाकिस्तानमधील आहेत. हे फोटो पाकिस्तानच्या गुजरानवाला येथील बेगपूर या गावातले आहेत. जिथे २०१५ साली जिल्हा प्रशासनाने नकली कोल्ड ड्रिंक्स बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला होता. या घटनेचे बरेचसे फोटो पाकिस्तानी आउटलेट Pak101 वर सुद्धा पाहायला मिळतील.


हे फोटो गेल्या वर्षी मार्चमधील असून सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेशमधील राप्ती नदीत एक गाडी बुडाल्याचे आहेत. रिपोर्टनुसार या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता आणि कार चालवणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात आलं होत. तर एका अल्पवयीन मुलाचा शोध लागला नव्हता. तुम्ही खाली व्हिडिओ रिपोर्ट पाहू शकता.

गोरखपूर टाईम्स आणि झी टीव्ही न्यूजच्या स्थानिक बातम्यांमधून याचे व्हिज्युअलस पाहायला मिळतात.


सहावा फोटो नोव्हेंबर २०१४ मध्ये वाघा बॉर्डरजवळ बॉम्बस्फोटात ठार झालेल्यां लोकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा आहे. संध्याकाळच्या वेळी वाघा बॉर्डरवर होणारा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या गर्दीत बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ५२ जण ठार झाले होते. हा बॉम्बस्फोट पाकिस्तानच्या सीमेजवळ घडला होता.


हा फोटो उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील रस्ता अपघातात ठार झालेल्या लोकांच्या मृतदेहाचा आहे. २८ एप्रिल २०१८ रोजी लखीमपूरच्या उचोलिया भागात ट्रक आणि कारमध्ये धडक झाली, ज्यामध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेची माहिती धौरहरा खासदार रेखा वर्मा यांनी एका फेसबूक पोस्टमध्ये दिली होती. या पोस्टमध्ये हा फोटो सुद्धा पाहायला मिळतो.


फोटोमध्ये दिसणारे मृतदेह तेलंगणाच्या ममिल्लागड्डातील एका कुटुंबाचे आहेत. कर्जाची परतफेड न करता आल्याने कुटुंबातील 6 सदस्यांनी आत्महत्या केली होती. डेक्कन हेराल्ड आणि द हिंदू यांनी या घटनेविषयी केलेल्या रिपोर्टमध्ये हा फोटो पाहायला मिळतो.
अल्ट न्यूजने या फोटोबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या फोटोबद्दल काही माहिती हाती आली नाही.

काय आहे सत्य?

इबोला विषाणूयुक्त रक्त असलेल्या कोल्ड ड्रिंकचा दावा खोटा असून हे फोटो त्या संबंधी नसल्याचं समोर आलं.

त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या लोकांनी कोल्ड ड्रिंक मध्ये इबोला संक्रमित रक्त मिसळले असल्याचा दावा खोटा आहे. hoaxorfact.com या वेबसाईटने २०१५ रोजीच हा दावा खोटा असल्याचा रिपोर्ट केला होता.

रिपोर्टनुसार, २०१४ मधील इबोला साथीच्या आजारानंतर असे बनावट दावे तयार करून शेअर केले जात होते. एक अशीही भीती व्यक्त केली गेली होती की, एचआयव्ही (HIV) पॉझिटिव्ह कर्मचार्‍याने त्याचे रक्त फ्रुटीमध्ये मिसळले आहे. त्यामुळे असे दावेअंदाधुंदपणे शेअर केले जात होते.

Updated : 2021-06-24T20:54:15+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top