Home > Fact Check > Fact Check : अब की बार मोदींना नोबेल पुरस्कार? व्हायरल दावा सत्य आहे का?

Fact Check : अब की बार मोदींना नोबेल पुरस्कार? व्हायरल दावा सत्य आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदाच्या नोबेल पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार असल्याचं वक्तव्य नोबेल पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष एसले टोजे यांनी केलं आहे का? एसले टोजे यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या बातम्यांमागचं काय आहे सत्य? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक...

Fact Check : अब की बार मोदींना नोबेल पुरस्कार? व्हायरल दावा सत्य आहे का?
X

नोबेल पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष असले टोजे (Asle Toje) हे भारत दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी हे शांततेच्या नोबेल (Nobel For peace) पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार आहेत. तसेच जगातील सर्वाधिक विश्वसनीय चेहरा आहेत. त्यानंतर काही लोकांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची पुरस्कार जिंकण्याची शक्यता असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

The Times of India ने एक ट्वीट करून म्हटले की, नोबेल समितीचे डीप्टी लीडर एसले टोजे यांनी सांगितले की, शांततेच्या नोबेल पुरस्काराचे पंतप्रधान मोदी हे सर्वात मोठे दावेदार आहेत. मात्र टाईम्स ऑफ इंडियाने हे ट्वीट आता डिलीट केले आहे.




Economic Times ने सुध्दा आपल्या ट्वीटमध्ये अशाच प्रकारे दावा केला आहे. मात्र सध्या हे ट्वीट डिलीट केले आहेत. इकॉनॉमिक टाईम्सने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, असले टोजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीफ करताना जगातील सर्वात विश्वसनीय चेहरा असल्याचे म्हटले आहे.




Times Now च्या एका अँकरने असले टोजे यांचा हवाला देत 2024 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधान मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार आहेत. सोबतच ते जगातील सर्वात विश्वसनीय चेहरा असल्याचेही म्हटले आहे. पुढे अँकरने म्हटले की, पंतप्रधान मोदी हे युध्द थांबवण्यासाठी सर्वात विश्वसनीय नेता होते आणि पंतप्रधान मोदी हेच जगात शांतता स्थापित करू शकतात.

मिंट, वन इंडिया हिंदी, मिड डे, CNBC TV 18, डेलीहंट, झी पंजाब, एबीपी माझा , लोकसत्ता लाईव्ह, एशियानेट सुवर्णा न्यूज, न्यूज 7 तमिल, OTV आणि NDTV तेलुगु यासरख्या इतरही माध्यमांनी हाच दावा केला आहे.

राईट विंग प्रोपगंडा आऊटलेट ऑफ इंडिया आणि RSS द्वारे चालवणाऱ्या पांचजन्यनेही असाच दावा केला आहे. ऑप इंडियाने हिंदी आणि इंग्रजीत ही बातमी दिली आहे.

टाईम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिवशंकरने एक पाऊल पुढे टाकत असले टोजे हा पंतप्रधान मोदी यांचा प्रशंसक असल्याचे म्हटले आहे. तसेच मोदी हे जगातील सर्वात विश्वसनीय चेहरा असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यानंतर त्यांनी हे ट्वीट डिलीट केले आहे.




ट्विटरवर ब्ल्यू टिक असलेल्या @MeghUpdates ने हाच दावा केला आहे. या ट्वीटला 30 हजार लाईक्स आहेत आणि जवळपास 1 हजार 100 लोकांनी रिट्वीट केले आहे. मात्र या ट्विटर हँडलवरून बहुतांश वेळा चुकीचे ट्वीट शेअर केले जातात.



भाजप नेते राम माधव यांनी टाईम्स नाऊचे आर्टिकल शेअर केले. ज्याचे शीर्षक डिप्टी लीडर एसले टोजे यांनी पंतप्रधान मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार असल्याचे म्हटले आहे.




गुजरात भाजपचे प्रदीपसिंह जडेजा यांनी हाच दावा केला आहे. त्यामध्ये हा भारतासाठी गौरवाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे राज्य सचिव तजिंदर सिंह सरां आणि भाजप दिल्लीचे पूर्व अध्यक्ष आदेश गुप्ता यांनीही हाच दावा केला आहे.

पडताळणी (What is Fact )

16 मार्च रोजी पत्रकार राणा आयुब यांनी असले टोजे यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माध्यमांमध्ये त्यांच्या नावाने एक खोटं वक्तव्य शेअर केलं जात आहे. तसेच या ट्वीटला हवा दिली जात असल्याचंही असले टोजे यांनी म्हटले. त्यानंतर त्यांनी केलेल्या ट्वीटमधील मिळतं-जुळतं वक्तव्य करण्यास साफ नकार दिला. एक फेक न्यूज ट्वीट करण्यात आले होते. त्याला सर्वांनी फेक न्यूज मानायला हवी, असंही म्हटले आहे.

राणा आयुब यांच्या ट्वीटनंतर हे स्पष्ट होत नाही की असले टोजे कोणत्या गोष्टीला नकार देत आहेत. कारण जो प्रश्न विचारण्यात आला आहे. तो या व्हिडीओमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे अल्ट न्यूजने ANI च्या टाईमलाईनवर हा व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र टाईमलाईनवरही हा व्हिडीओ मिळाला नाही. त्यानंतर अल्ट न्यूजला एका न्यूज चॅनलचा सोर्स मिळाला. ज्यामध्ये ANI चे फीड होते. त्यामध्ये एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात येत आहे. ज्यामध्ये असले टोजे यांच्या मुलाखतीची क्लिप शेअर करण्यात येत आहे. त्यानंतर दाखवण्यात आलेल्या टेक्स्टनुसार असले टोजे हे पंतप्रधान मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे दावेदार असल्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देत आहेत.




14 मार्चला ABP न्यूजचे वरिष्ठ संपादक अभिषेक अपाध्याय यांनी असले टोजे यांच्यासोबत केलेल्या मुलाखतीचे चार स्क्रीनग्रॅब ट्वीट केले. त्यामध्ये त्यांनी विचारले आहे की, मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे दावेदार आहेत का? याच ट्वीटनुसार अल्ट न्यूजला या दाव्यासंदर्भातील पहिला धागा मिळाला.

कदाचित याच ट्वीटचा संदर्भ घेऊन इतर मुख्य प्रवाहातील माध्यमांनी बातम्या केल्या असण्याची शक्यता आहे.

ABP न्यूजसोबत बोलताना रिपोर्टरने असले टोजे यांना पूर्ण उकसावण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पंतप्रधान मोदी नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदार अशल्याचे म्हटले नाही.

या मुलाखतीतील 3 मिनिट 45 सेकंदावर मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने असले टोजे यांना विचारले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात रशिया- युक्रेन युध्द थांबवता येऊ शकतं का? यावर असले टोजे यांनी उत्तर दिले की, ठीक आहे. तुम्ही विचारत आहात की, पंतप्रधान मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे दावेदार आहेत का? त्यावर मला असा विश्वास आहे की, जे काम नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी आवश्यक आहे ते काम प्रत्येक देशाचा नेता करू शकतो. मी पंतप्रधान मोदी यांच्यासाठीही हिच आशा करतो. हे सत्य आहे की, मी त्यांच्या प्रयत्नांचे अनुसरण करत आहे. आपण सर्व करत आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की, त्यांची ही कारकीर्द यशस्वी होईल.

5 मिनिट 6 सेकंदाला रिपोर्टरने विचारले की, तुम्ही नोबेल समितीचे डिप्टी लीडर आहात आणि तुम्ही शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी संभावित व्यक्ती शोधत आहात. त्यापार्श्वभुमीवर माझा प्रश्न आहे की, पंतप्रधान मोदी रशिया युक्रेन युध्द संपवू शकतात का? असले टोजे यांनी उत्तर देतांना सांगितले की, भारताच्या पंतप्रधानांसमोरील अडचणी निर्माण करणे माझं काम नाही. पण मला असं वाटतं की, जगातील प्रत्येक नेत्याने शांततेसाठी काम करायला हवं. मोदींसारख्या ताकदवान नेत्यांकडे संधी आणि क्षमता जास्त आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे आपला वेळ फक्त भारताच्या हितासाठीच नाही तर भारतीय अर्थव्यवस्था विकसित करण्याला सुध्दा प्राधान्य देत आहेत. याबरोबरच मोदी हे त्या गोष्टींना वेळ देत आहेत. जे देशाच्या तितके जवळचे नाहीत. मात्र देश हितामध्ये वैश्विक समुदाय आणि जगाच्या शांतीसाठी त्यांनी वेळ द्यायला हवा.

आम्ही 14 मार्चला आयोजित ADM एंड पीस गोलमेजचं युट्यूब लाईव्ह स्ट्रीम पाहिलं. त्यामध्ये असले टोजे पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्यावेळी टोजे यांनी जागतिक राजकारणात भारताच्या भूमिकेबाबत बराच वेळ मुद्दे मांडले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, भारतात येणं माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव आहे. मी या देशातील शांततेच्या परंपरेविषयी आणि उर्जेविषयी जाणून घेण्यासाठी आलो होतो. भारत वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे जागतिक राजकारणात भारताचे महत्व वाढत आहे. त्यामुळे भारताने हे निश्चित करावे की, कोणत्या प्रकारे महाशक्ती बनायचं आहे. भारत महाशक्ती बनू इच्छित आहे का? कारण महान आहे. भारत आपल्या इतिहासाकडे पाहतो. आपल्या सिध्दांतांकडे पाहतो आणि आपला धर्म आणि संस्कृतीपासून धडा घेतो. त्यामुळे भारत जगाला एक महान उपहार देईल, ही आशा आहे, असं टोजे यांनी म्हटलं आहे.

मात्र या संपूर्ण भाषणादरम्यान टोजे यांनी नोबेल शांती पुरस्काराचा उल्लेखही केला नाही.

50 वर्षांचा गुप्तता नियम (secrecy Rule of 50 Years )

नोबेल समिती स्वतः नामनिर्देशित व्यक्तींची नावं जाहीर करत नाही. ही नावं प्रसारमाध्यमे आणि ज्यांनी नोबेलसाठी अर्ज केले आहेत त्यांनाही देत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी पुरस्काराची घोषणा होण्यापुर्वी अगाऊ अनुमानाच्या माध्यमातून अंदाज लावले जातात. मात्र ही यादी नोबेल समितीने दिलेली नसते. ती माहिती एकतर नोबेल पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीनी दिली असू शकते किंवा अंदाज असू शकतो. मात्र नोबेल गेल्या 50 वर्षांपासूनची पुरस्कारासाठीची नामांकने किंवा पुरस्कार न मिळालेल्यांची माहिती सार्वजनिक करत नाही. हा नोबेल समितीचा गुप्ततेचा नियम आहे.




नोबेल पारितोषकाच्या 50 वर्षाच्या गुप्तता नियमानुसार पुरस्काराची घोषणा होण्यापुर्वी फक्त एक तास विजेत्यांना नोटीस दिली जाते. त्यामध्ये पुरस्काराच्या विजयाबद्दल माहिती असते, असं टोजे यांनी 2022 च्या पुरस्कारावेळी म्हटले होते.

काय आहे सत्य? (What is Reality)

वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर नोबेल समितीचे उपाध्यक्ष असले टोजे हे सार्वजनिकरित्या नोबेल पुरस्काराच्या स्पर्धेतील लोकांची नावं जाहीर करू शकत नाहीत.

त्यामुळे असले टोजे यांनी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे दावेदार असल्याचे म्हटले नाही. मात्र भारतातील प्रमुख माध्यमांनी असले टोजे यांचे चुकीचे कोट वापरून फेक न्यूज पसरवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर या माध्यमांनी त्यांचे ट्वीट डिलीट केल्याचं सुध्दा दिसून येत आहे.

Updated : 23 March 2023 2:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top