Home > Fact Check > Fact Check : NEET च्या परीक्षेची तारीख बदलली आहे का? वाचा व्हायरल दाव्यामागचं सत्य

Fact Check : NEET च्या परीक्षेची तारीख बदलली आहे का? वाचा व्हायरल दाव्यामागचं सत्य

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या NEET परीक्षेची तारीख बदलल्याची नोटीस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र खरंच NEET परीक्षेची तारीख बदलली आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा भरत मोहळकर यांचे फॅक्ट ...

Fact Check : NEET च्या परीक्षेची तारीख बदलली आहे का? वाचा व्हायरल दाव्यामागचं सत्य
X

वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा (NEET)ची तारीख बदलल्याच्या वेगवेगळे मेसेज व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहेत. ही नोटीस 6 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिध्द झाल्याचे म्हटले आहे. ही तारीख रिशेड्यूल करत असल्याचे म्हटले आहे.

व्हायरल होत असलेल्या नोटीसमध्ये 5 मार्च रोजी होणारी परीक्षा रिशेड्यूल (NEET Exam Reschedule) करण्यात आली असून ती 21 मे 2023 रोजी सकाळी 9 वा घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच 31 जानेवारी पर्यंत फॉर्म भरण्यास दिलेली मुदत वाढवून 25 मार्चपर्यंत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 29 मार्च 2023 पर्यंत फॉर्म एडिट करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 26 एप्रिलपर्यंत फायनल एडिट करण्यात येणार आहे. तर 16 मे रोजी परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र दिले जाणार आहे. त्यानंतर 21 मे रोजी परीक्षा होणार असून 20 जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे म्हटले होते. मात्र या नोटीसमधील सत्य जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रने अधिकृत वेबसाईट नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल सायन्सला (National Board of Medical Science) भेट दिली. त्याठिकाणी Examination Section मध्ये NEET PG या ठिकाणी भेट दिली असता त्याठिकाणी परीक्षा पुढे ढकलल्याचा कुठलाही उल्लेख आढळून आला नाही.

NEET परीक्षेसंदर्भात आणखी माहिती तपासली असता PIB ने यासंदर्भात फॅक्ट चेक केल्याचे आढळून आले. PIB ने केलेल्या फॅक्ट चेकनुसार NEET 2023 या परीक्षेसंदर्भात व्हायरल होत असलेली नोटीस फेक असल्याचे म्हटले आहे.

NEET परीक्षेचे वेळापत्रक (NEET Time Table)

NEET परीक्षेसंदर्भात PIB ने म्हटले आहे की, National Board of Examination च्या नावाने NEET-PG 2023 पुढे ढकलून 21 मे रोजी घेण्यात येणार असल्याचा दावा व्हायरल होत आहे. मात्र हा दावा खोटा असून परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत.

NEET 2023 चं वेळापत्रक (Original Schedule of NEET 2023)

NEET PG 2023 साठी अर्ज करण्याची तारीख 7 जानेवारी ते 27 जानेवारी 2023 होती. तर 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म एडिट करता येणार होता. त्यानंतर 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला अंतिम चुका एडिट करता येणार आहेत. यामध्ये तुमचा फोटो, सही आणि अंगठ्याचा ठसा बदलता येणार आहे. यानंतर 27 फेब्रुवारी रोजी तुम्हाला परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र मिळणार आहे. 5 मार्च रोजी परीक्षा होणार असून 31 मार्च 2023 रोजी निकालाची घोषणा करण्यात येणार आहे.

Updated : 13 Feb 2023 12:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top