Home > Fact Check > Fact Check: पेट्रोल पंपाच्या बिलावर मोदींना मतदान देऊ नका असा संदेश लिहिलाय का?

Fact Check: पेट्रोल पंपाच्या बिलावर मोदींना मतदान देऊ नका असा संदेश लिहिलाय का?

Fact Check:  पेट्रोल पंपाच्या बिलावर मोदींना मतदान देऊ नका असा संदेश लिहिलाय का?
X

सध्या एका पेट्रोल पंपाच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसत आहे. या बिलाच्या फोटोमध्ये खाली "जर तुम्हाला पेट्रोलचे दर कमी व्हावे असं वाटत असेल तर पुन्हा मोदींना मदतान देऊ नका, भेटीसाठी धन्यवाद" या व्हायरल झालेल्या बिलावर पेट्रोल पंपाचे नाव साई बालाजी पेट्रोलियम HPL डीलर विक्रोळी (वेस्ट) मुंबई असं लिहिलेल असून या बिलाचा फोटो शेअर करताना महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. फेसबूक यूजर कमलेश कुमार पांडे यांनी हा फोटो शेअर करत लिहिलं आहे... पाहा मोदींना हरवण्यासाठी कशा प्रकारे षड्यंत्र रचलं जात आहे.

फेसबुक वर अनेकांनी या बिलाचा फोटो शेअर केला आहे.
फेसबुक सोबतच व्हाट्सअप वर सुद्धा या बिलाचा फोटो शेअर केला जात आहे.


दरम्यान हा फोटो 2018 पासून सोशल मीडियावर शेअर केला जात असल्याचं दिसून येते आहे.काय आहे सत्य...?

बिलावर लिहिलेल्या माहितीबद्दल पडताळणी केली असता, अल्ट न्यूजला काही अशा गोष्टी समजल्या ज्यामुळे हे बिल बनावट असल्याचं दिसून आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फोटो खऱ्याखुऱ्या बिलाचा नाही. तसेच बिलावर लिहिलेल्या पेट्रोल पंपाच्या नावाची पडताळणी केली असता त्या नावाचा कोणताही पेट्रोल पंप नसल्याचं समोर आलं आहे. याव्यतिरिक्त बिलावर HPL लिहिलेलं पहायला मिळतं. मात्र, HPL नावाची कोणतीच कंपनी भारतात पेट्रोल सप्लाय करत नाही. तर भारतात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी आहे. ज्याचा शॉर्टफॉर्म HPCL असा आहे. दरम्यान बिलावरील शब्द, अंक, फॉन्ट आणि अलाइनमेंट व्यवस्थित पाहील्यावर त्यामध्ये गडबड असल्याचं पाहायला मिळत आहे. खाली दिलेल्या फोटोमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

याव्यतिरिक्त बिलावर असलेली तारीख ही 4 ऑक्टोंबर 2018 अशी आहे. म्हणजेच जर हे बिल खरं असतं तरी सुद्धा ते आत्ताच नसतं. 2018 मध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांचं युतीचं सरकार होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे भाजपच्या समर्थकांनी आपल्याच भाजप सरकारवर निशाणा साधण्यासाठी असं करणं जवळपास अशक्यच आहे. व्हायरल होणारं हे बिल बनावट असल्याचं अनेक फॅक्ट चेकिंग वेबसाईटने सांगितलं आहे. ज्यामध्ये फॅक्ट चेकिंग वेबसाईट बुम लाईव्ह, लॉजिकल इंडियन आणि सोशल मीडिया होक्स स्लेयर यांचा समावेश आहे.

या रिपोर्टमध्ये एका सॅम्पल बिलाचा फोटो सुद्धा शेअर केला गेला आहे. या सॅम्पल बिलाची वेबसाइट सध्या उपलब्ध नाही. मात्र, सॅम्पल बिल आणि व्हायरल होणाऱ्या बिलामध्ये अनेक समानता पाहायला मिळतात. जसं की पेट्रोल पंपाचे नाव, पत्ता, गाडीचा नंबर तसंच ग्राहकाचं नाव हे सारखंच आहे. निष्कर्ष: पेट्रोल पंपाच्या एका बिलाच्या सॅम्पलला एडिट करून व्हायरल केलं जात आहे. ज्यावर असा दावा केला जात आहे की, पेट्रोलचे दर कमी करायचे असतील तर मोदींना मतदान देऊ नका.

Updated : 1 July 2021 1:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top